शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
अजित पवार गट टेन्शनमध्ये! येवल्यातून भुजबळ, अणुशक्ति नगरमधून नवाब मलिक पिछाडीवर
3
झारखंडमध्ये एनडीए आणि ‘इंडिया’त टफफाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय असं चित्र
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर दक्षिणमध्ये मोठी घडामोड, अमल महाडिक २०१२ मतांनी आघाडीवर; कोण मारणार बाजी ?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 बविआला राडा भोवणार! नालासोपाऱ्यात भाजपाचा उमेदवार आघाडीवर, क्षितिज ठाकूरांचा गेम होणार? 
6
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
8
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : Video - "पुन्हा एकदा..."; निकालाच्या दिवशी नेतेमंडळी सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक
10
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
11
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
12
व्हॉट्सॲप ग्रुपवरून ज्ञान, घरीच केली प्रसूती; चेन्नईतील खळबळजनक घटना
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
14
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
16
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
18
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
19
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
20
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!

राज्यात पशुवैद्यकीय प्रवेशाचा पुन्हा श्रीगणेशा, ‘नीट’च्या नव्या गुणपत्रिकेचा आधार

By अविनाश कोळी | Published: August 01, 2024 1:20 PM

१४ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी

अविनाश कोळीसांगली : ‘नीट’ ची सुधारित रँकिंग जाहीर होण्यापूर्वीच घाई गडबडीत राज्यातील पशुवैद्यकीय प्रवेश रेटण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या गोंधळावर ‘लोकमत’ ने प्रकाशझोत टाकला होता. त्याची दखल घेत आता महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे आता नव्या गुणपत्रिकेच्या आधारावर नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.नीट परीक्षेसंदर्भात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असतानाही महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया घाईघाईने राबविण्यात आली. यासाठी २५ जून ते ७ जुलैदरम्यान पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्याचवेळी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत १,५६३ विद्यार्थ्यांची नीटची फेर परीक्षा घेऊन सर्व विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल ३० जून रोजी जाहीर केला. या निकालानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक बदलली.पशुवैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी ही नव्याने आलेली गुणपत्रिका ग्राह्य धरणे अपेक्षित होते. पण असे न होता महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे जुनेच गुण आणि ऑल इंडिया रँक ग्राह्य धरून दि.१८ जुलै रोजी पशुवैद्यकीय प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली होती. फेर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचे विद्यार्थी नसल्याने याचा फारसा परिणाम गुणवत्ता यादीवर झाला नव्हता, मात्र, दि.२३ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार भौतिकशास्त्र विषयाच्या एका वादग्रस्त प्रश्नाचे ग्राह्य धरलेले दोन पर्याय रद्द करून नवीन निकालानुसार एकच पर्याय बरोबर असल्याचे ग्राह्य धरण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची रँक बदलली. गुणांमध्येही बदल झाले.

पशुवैद्यकीय प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणल्यानंतर रँक बदलल्याने विद्यार्थ्यांना गोंधळ निर्माण झाला. ही बाब ‘लोकमत’ने मांडली. त्यानुसार आता महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.१४ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादीपशुवैद्यकीय प्रवेशाकरिता पूर्वीच्या वेळापत्रकानुसार अंतिम गुणवत्ता यादीची तारीख ३१ जुलै होती. ती आता १४ ऑगस्ट करण्यात आली आहे. एनटीएकडून विद्यार्थ्यांचे नवे गुणपत्रक घेऊन ही प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीdoctorडॉक्टर