मुंबई – कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने महाराष्ट्रात आता अनलॉकच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. राज्यात ५ टप्प्यात अनलॉक केलं जाणार असून यामुळे नागरिक आणि व्यापारांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या ७ जूनपासून म्हणजे सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने मध्यरात्री याबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे.
कसे असणार हे ५ टप्पे आणि त्यात काय सुरू अन् काय बंद राहणार जाणून घ्या
क्रमांक | कामे | पहिला टप्पा | दुसरा टप्पा | तिसरा टप्पा | चौथा टप्पा | पाचवा टप्पा |
१ | अत्यावश्यक दुकानं | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | संध्याकाळी ४ वाजेपर्यंत | संध्याकाळी ४ वाजेपर्यंत | संध्याकाळी ४ वाजेपर्यंत, विकेंडच्या दिवशी बंद |
२ | अत्यावश्यक नसलेली दुकानं | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | सोम ते शुक्र ४ वाजेपर्यंत | बंद | बंद |
३ | मॉल, थिअटर्स, नाट्यगृह | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | ५० टक्के क्षमतेने | बंद | बंद | बंद |
४ | रेस्टॉरंट | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | ५० टक्के क्षमतेने | संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने, त्यानंतर घरपोच सेवा | टेक अ वे आणि होम डिलिव्हरी | फक्त होम डिलिव्हरी |
५ | लोकल ट्रेन | नेहमीप्रमाणे, परंतु स्थानिक प्राधिकरण निर्बंध लावू शकतात | केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला यांना प्रवासाची सवलत | केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला यांना प्रवासाची सवलत | केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी | केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी |
६ | सार्वजनिक जागा, खुली मैदानं, वॉकिंग, सायकलिंग | नेहमीप्रमाणे | नेहमीप्रमाणे | दरदिवशी पहाटे ५ ते ९ वाजेपर्यंत | सोम ते शुक्र पहाटे ५ ते ९ वाजेपर्यंत | बंद |
७ | खासगी कार्यालये | १०० टक्के | १०० टक्के | ५० टक्के उपस्थितीत संध्याकाळी ४ वाजेपर्यंत | २५ टक्के उपस्थितीत काही कार्यालयांना सूट | १५ टक्के उपस्थितीत काही कार्यालयांना सूट |
८ | क्रिडा | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | पहाटे ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ काळात इनडोअर गेम्स, आऊटडोर गेम्स नेहमीप्रमाणे सुरू राहतील | पहाटे ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ पर्यंत आऊटडोर गेम्ससाठी परवानगी | पहाटे ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ पर्यंत आऊटडोर गेम्स फक्त सोम ते शुक्र कालावधीत | बंद |
९ | सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | ५० टक्के उपस्थितीत | ५० टक्के उपस्थितीत केवळ सोम ते शुक्रपर्यंत संध्याकाळी ४ वाजेपर्यंत करता येतील | बंद | बंद |
१० | लग्न समारंभ | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | ५० टक्के क्षमतेने कमाल १०० जणांच्या उपस्थितीत | ५० जण | २५ जण | केवळ कुटुंबियांसाठी |
११ | अंत्ययात्रा | निर्बंध नाहीत | निर्बंध नाहीत | २० जणांची उपस्थिती | २० जणांची उपस्थिती | २० जणांची उपस्थिती |
१२ | स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रम | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | ५० टक्के उपस्थितीत | ५० टक्के उपस्थितीत | ५० टक्के उपस्थितीत | फक्त ऑनलाईन |
१३ | बांधकाम | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | फक्त ४ वाजेपर्यंत बांधकाम ठिकाणी मजुरांना परवानगी | बांधकामठिकाणी मजुरांना परवानगी | महत्त्वाच्या बांधकामाला परवानगी |
१४ | ई कॉमर्स व्यवहार | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | फक्त अत्यावश्यक | फक्त अत्यावश्यक |
१५ | जीम, सलून, ब्यूटी पार्लर | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | ५० टक्के क्षमतेने | ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने, एसी बंद | ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने, केवळ लस घेतलेल्यांसाठी | बंद |
१६ | सार्वजनिक वाहतूक | नेहमीप्रमाणे सुरू राहतील | १०० टक्के क्षमतेने परंतु उभं राहून प्रवास करण्यास मनाई | १०० टक्के क्षमतेने परंतु उभं राहून प्रवास करण्यास मनाई | ५० टक्के क्षमतेने परंतु उभं राहून प्रवास करण्यास मनाई | ५० टक्के क्षमतेने परंतु उभं राहून प्रवास करण्यास मनाई |
१७ | आंतरजिल्हा प्रवास | नेहमीप्रमाणे परंतु ५ टप्प्यातील नागरिकांसाठी प्रवास करणं ई पास असणं बंधनकारक | नेहमीप्रमाणे परंतु ५ टप्प्यातील नागरिकांसाठी प्रवास करणं ई पास असणं बंधनकारक | नेहमीप्रमाणे परंतु ५ टप्प्यातील नागरिकांसाठी प्रवास करणं ई पास असणं बंधनकारक | नेहमीप्रमाणे परंतु ५ टप्प्यातील नागरिकांसाठी प्रवास करणं ई पास असणं बंधनकारक | ई पास असणं बंधनकारक, केवळ अत्यावश्यक कामांसाठी |
५ टप्प्यांचे निकष
पहिल्या टप्प्यात – ५ टक्के पॉझिटिव्हीटी रेट आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड्स व्यापलेले असावेत
दुसऱ्या टप्प्यात – ५ टक्के पॉझिटिव्हीटी रेट आणि २५ ते ४० टक्क्यांमध्ये ऑक्सिजन बेड्स व्यापलेले असावेत
तिसऱ्या टप्प्यात – ५ ते १० टक्क्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट आणि ४० टक्क्यापेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स व्यापलेले असावेत
चौथ्या टप्प्यात – १० ते २० टक्क्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट आणि ६० टक्क्यापेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स व्यापलेले
पाचव्या टप्प्यात – २० टक्क्याहून अधिक पॉझिटिव्हीटी रेट आणि ७५ टक्क्यापेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स व्यापलेले
वाचा तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात?
पहिला टप्पा – अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ
दुसरा टप्पा – नंदूरबार, हिंगोली,
तिसरा टप्पा – अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, गडचिरोली, मुंबई, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम
चौथ्या टप्पा – बुलढाणा, कोल्हापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
पाचवा टप्पा – एकाही जिल्ह्याचा समावेश नाही, परंतु पॉझिटिव्हीटी रेट २० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर तुमचा जिल्हा रेड झोनमध्ये येऊ शकतो.