Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024 Live : महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, जयंत पाटलांना धक्का, मिलिंद नार्वेकरांनी मारली बाजी!

LIVE

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2024 02:27 PM2024-07-12T14:27:29+5:302024-07-12T19:59:28+5:30

मुंबई : राज्यात शुक्रवारी  विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. या विधान परिषदेच्या निवडणुकीत ११ जागांसाठी तब्बल १२ उमेदवार रिंगणात ...

maharashtra vidhan parishad election 2024 result live udates mahayuti vs mva prestigious fight for milind narvekar, jayant patil, devendra fadnavis, ajit pawar, uddhav thakceray   | Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024 Live : महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, जयंत पाटलांना धक्का, मिलिंद नार्वेकरांनी मारली बाजी!

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024 Live : महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, जयंत पाटलांना धक्का, मिलिंद नार्वेकरांनी मारली बाजी!

मुंबई : राज्यात शुक्रवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. या विधान परिषदेच्या निवडणुकीत ११ जागांसाठी तब्बल १२ उमेदवार रिंगणात उतरले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने झाले. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूने आमचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा केला जात होता. त्यामुळे नेमका कोणाचा उमेदवार पराभूत होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, या निवडणुकीच्या निकालात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीतील मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. तर शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे.  

LIVE

Get Latest Updates

12 Jul, 24 : 07:44 PM

काँग्रेसची काही मतं फुटली - जयंत पाटील

माझी १२ मतं मला मिळाली असून काँग्रेसची काही मतं फुटली असल्याची प्रतिक्रिया शेकापचे जयंत पाटील यांनी सांगितले. 
 

12 Jul, 24 : 07:41 PM

काँग्रेसने दिलेल्या सूचनांचे पालन केले - झिशान सिद्दीकी

काँग्रेसने दिलेल्या काही सूचनांचे पालन केल्याचे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे. प्रज्ञा सातव यांच्या विजयाचा आनंद असल्याचे देखील झिशान सिद्दीकी म्हणाले. 

12 Jul, 24 : 07:41 PM

ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी

ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे विजयी झाले आहे. तर शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. 

12 Jul, 24 : 07:16 PM

विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे विजयी उमेदवार 

भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत 
शिवसेना : भावना गवळी, कृपाल तुमाणे  
राष्ट्रवादी काँग्रेस : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर 

12 Jul, 24 : 07:09 PM

जयंत पाटील मतदान केंद्रातून निघून गेले

ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात विजयासाठी चुरस आहे. मिलिंद नार्वेकर फक्त एका मताने विजयापासून लांब आहेत. तर, जयंत पाटील यांना १२ मते मिळाली आहेत. त्यांना आणखी ११ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे जयंत पाटील हे पराभवाच्या छायेत आहे. हे पाहता जयंत पाटील मतदान केंद्रातून निघून गेले आहेत.

12 Jul, 24 : 06:51 PM

मिलिंद नार्वेकर अन् जयंत पाटील यांच्यात चुरस

महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले असून अकराव्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात चुरस आहे. 

12 Jul, 24 : 06:49 PM

काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय 

या निवडणुकीत काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव या आघाडीवर होत्या. मात्र, नंतर अचानक भाजप उमेदवार आघाडीवर आले. यानंतर अखेर प्रज्ञा सातव यांनी २३ मतांचा कोटा पूर्ण केला आणि विजय मिळवला.
 

12 Jul, 24 : 06:45 PM

अजितदादा गटाचे दोन्ही उमेदवार विजयी

अजितदादा गटाचे राजेश विटेकर हे २३ मतांनी आणि  शिवाजीराव गर्जे हे २४ मतांनी विजयी झाले आहेत. 

12 Jul, 24 : 06:42 PM

महायुतीचे ९ उमेदवार विजयी

विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे सदाभाऊ खोत यांनी दुसऱ्या पसंतीची अधिक मतं घेऊन विजय मिळवला आहे.

12 Jul, 24 : 06:36 PM

भावना गवळी २४ मतं मिळवत विजयी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भावना गवळी यांना २४ मतं  मिळाली असून त्या विजयी झाल्या आहेत. 

12 Jul, 24 : 06:28 PM

भाजपचे तीन उमेदवार विजयी

विधान परिषद निवडणुकीमध्ये योगश टिळेकर, पकंजा मुंडे आणि परिणय फुके विजयी झाले आहेत. मात्र अधिकृत घोषित करण्यात आले नाही.

12 Jul, 24 : 06:27 PM

पंकजा मुंडे पहिल्या पसंतीत विजयी

भाजपच्या पंकजा मुंडे पहिल्या पसंतीत विजयी झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांना २६ मतं मिळाली आहेत.

12 Jul, 24 : 06:22 PM

जयंत पाटील यांना सर्वात कमी मतं

आतापर्यंत उमेदवारांना मिळालेली मतं खालील प्रमाणे....
योगेश टिळेकर : २३
परिणय फुके : २०
राजेश विटेकर : २१
अमित गोरखे : २२
शिवाजीराव गर्जे : २०
पंकजा मुंडे : १८
मिलिंद नार्वेकर : १७
प्रज्ञा सातव : १९
सदाभाऊ खोत : १०
कृपाल तुमाने : १६
भावना गवळी : १०
जयंत पाटील : ०६

12 Jul, 24 : 06:19 PM

पहिल्या पसंतीत भाजपचे योगेश टिळेकर विजयी

भाजपचे योगेश टिळेकर हे पहिल्या पसंतीत विजयी झाले आहे. मात्र अधिकृत घोषित करण्यात आले नाही.

12 Jul, 24 : 06:13 PM

योगेश टिळेकर यांना २२ मतं

भाजपचे योगेश टिळेकर पहिल्या पसंतीत विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. योगेश टिळेकर यांना २२ मतं मिळाली आहेत.
 

12 Jul, 24 : 06:08 PM

पंकजा मुंडे यांना १० मतं

भाजपचे योगेश टिळेकर, कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर आघाडीवर आहेत. सातव आणि टिळेकर यांना प्रत्येकी १४ मते मिळाली आहेत. तर भाजपच्या पंकजा मुंडे यांना १० मतं मिळाली आहेत.

12 Jul, 24 : 06:01 PM

मतमोजणीत १ मत बाद

आत्तापर्यंतच्या मतमोजणीत १ मत बाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

12 Jul, 24 : 05:59 PM

एका मतपत्रिकेवरून मतमोजणीवेळी गोंधळ

इंग्रजी आकड्यावरून सर्वपक्षीय निरिक्षक आक्रमक, एका मतपत्रिकेवरून मतमोजणीवेळी गोंधळ 

12 Jul, 24 : 05:46 PM

पहिलं मत योगेश टिळेकरांना

पहिलं मत भाजपच्या योगेश टिळेकर यांना मिळाले आहे. तर दुसरं मत राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जे यांना पडलं आहे.

12 Jul, 24 : 05:32 PM

विधान परिषदेची मतमोजणी सुरु 

विधान परिषदेची मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणीसाठी २५-२५ मतांचे गठ्ठे करण्यात आले आहे. 

12 Jul, 24 : 05:14 PM

पंकजा मुंडे यांचा गेम हा भाजपच्याच नेत्यांनी केला - भास्कर जाधव 

विधान परिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर विधानभवनाच्या परिसरात भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मागील दोन निवडणुका पंकजा मुंडे यांचा गेम हा भाजपच्याच नेत्यांनी केला. मात्र, या निवडणुकीत त्या निवडून येतील. कारण आतापर्यंत ज्या नेत्याने पंकजा मुंडे यांचा गेम केला. त्याच्यामुळे विधानपरिषद निवडणुकीतही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर त्या राजकीय नेत्याची कारकीर्दच बरबाद होईल. त्यामुळे ते नेते पंकजा मुंडे यांच्यावरील प्रेमापोटी नाही तर आपली राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी पंकजा मुंडे यांना निवडून आणतील, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

12 Jul, 24 : 04:02 PM

आदित्य ठाकरे यांनी विधान भवनाला केलं वंदन 

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विधान भवनाला वंदन केलं आहे. विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी जाता जाता पायरीला स्पर्श करत विधान भवनाला वंदन केलं.

12 Jul, 24 : 03:48 PM

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान, २७४ आमदारांनी बजावला हक्क!

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान झाले आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी २७४ आमदारांनी मतदान केले असून आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. पुढच्या काही तासांत निकाल लागणार आहे.  
 

12 Jul, 24 : 03:42 PM

काँग्रेसची किती मतं फुटणार? विजय वडेट्टीवारांनी स्पष्टचं सांगितलं

काँग्रेसची तीन ते चार मते फुटतील अशी चर्चा होती. त्यात जितेश अंतापूरकर, जिशान सिद्धीकी यांची नावेही घेतली जात होती. मात्र या सर्व चर्चांना विजय वडेट्टीवार यांनी पूर्णविराम दिला आहे. काँग्रेसचे एकही मत फुटणार नाही. उलट काँग्रेसची मते वाढतील असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. शिवाय जितेश अंतापूरकर आणि जिशान सिद्धीकी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. त्यांनी काँग्रेसला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती दिली. तसेच, महाविकास आघाडीचे तिनही उमेदवार जिंकतील असा दावाही त्यांनी यावेळी केला.

12 Jul, 24 : 03:24 PM

विधानपरिषदेसाठी दुपारपर्यंत २४६ आमदारांचं मतदान

विधानपरिषदेसाठी एकूण २७४ आमदारांचं मतदान होणार असून दुपारी १.३० वाजेपर्यंत एकूण २४६ आमदारांचं मतदान झालं आहे.

12 Jul, 24 : 03:17 PM

मनसेच्या आमदाराचं मत कुणाला?

विधान परिषदेच्या निवडणुकीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील आणि बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

12 Jul, 24 : 03:15 PM

संजय राऊत - चंद्रकांतदादांच्या भेटीने चर्चांना उधाण

आज विधिमंडळात परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. या भेटीत संजय राऊत यांनी उच्चारलेल्या एका वाक्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.  विधिमंडळाच्या पायऱ्यांवर चंद्रकांत पाटील दिसताच संजय राऊत हे त्यांच्या दिशेने गेले आणि पाटील यांना मिठी मारत हस्तांदोलन केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी हसत-हसत गप्पाही मारल्या. चंद्रकांत पाटील यांना पाहताच राऊत गमतीशीरपणे म्हणाले की, अरे...आपण तर पुन्हा एकत्र यायलाच हवं. त्यावर पाटील यांनी म्हटलं की, तुमचं हे वाक्य आजची लाइन होईल. त्यावर उत्तर देत मी नेहमी लाइनच देत असतो, असं राऊत म्हणाले.

12 Jul, 24 : 02:59 PM

गणपत गायकवाड यांना मतदान करण्याची परवानगी

भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी दिली आहे. दरम्यान, रमेश कदम तुरुंगात असतानाही त्यांना मतदानाचा अधिकार दिला होता, त्याच पार्श्वभूमीवर गणपत गायकवाड यांना परवानगी दिल्याचे म्हटले जात आहे.
 

12 Jul, 24 : 02:42 PM

महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील - संजय राऊत

महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

12 Jul, 24 : 02:42 PM

विधानपरिषदेत महायुतीच्या सर्व आमदारांचे मतदान

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत विधान परिषदेतच्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व आमदारांचे मतदान झाले आहे.

12 Jul, 24 : 02:39 PM

शिंदे गटाच्या ४७ आमदारांचं मतदान पूर्ण

शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या ४७ आमदारांनी मतदान केलं आहे. शिंदे गटातील उमेदवाराला अतिरिक्त ५ ते ६ मते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

12 Jul, 24 : 02:34 PM

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार

मिलिंद नार्वेकर

12 Jul, 24 : 02:34 PM

शेतकरी कामगार पक्षचा उमेदवार (शरद पवार गटाचा पाठिंबा)

जयंत पाटील

12 Jul, 24 : 02:33 PM

काँग्रेसचे उमेदवार

डॉ. प्रज्ञा राजीव सातव

12 Jul, 24 : 02:32 PM

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार

राजेश विटेकर
शिवाजीराव गर्जे

12 Jul, 24 : 02:32 PM

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार

भावना गवळी
कृपाल तुमणे

12 Jul, 24 : 02:31 PM

भाजपाचे उमेदवार

पंकजा मुंडे
परिणय फुके
अमित बोरखे
योगेश टिळेकर
सदाभाऊ खोत

Web Title: maharashtra vidhan parishad election 2024 result live udates mahayuti vs mva prestigious fight for milind narvekar, jayant patil, devendra fadnavis, ajit pawar, uddhav thakceray  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.