Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024: विधान परिषद निवडणुकीत महायुतीची बाजी! काँग्रेसची ७ मते फुटली? कुणाला मिळाली? पाहा मतांचे गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 09:33 PM2024-07-12T21:33:09+5:302024-07-12T21:34:53+5:30
Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Nikal 2024 Live Updates: महायुतीचे सर्वच्या सर्व ९ जण विजयी, मविआतील शेकापचे जयंत पाटील पराभूत
Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024: विधान परिषदेच्या निवडणुकीत ( Maharashtra MLC Election Result 2024 ) महायुतीने मतांचे गणित जुळवून आणत बाजी मारली. विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. महायुतीने ९ तर महाविकास आघाडीने ३ उमेदवार दिले होते. गुप्त पद्धतीने मतदान झाले आणि निकाल लागला. यात भाजपाचे पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके आणि पुरस्कृत सदाभाऊ खोत तर महायुतीतील शिवसेनेच्या भावना गवळी व कृपाल तुमाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर असे सर्व ९ उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत शेकाप नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला.
#WATCH | BJP leader Pankaja Munde celebrates with her supporters she wins Maharashtra MLC polls
— ANI (@ANI) July 12, 2024
All 9 Mahayuti candidates have won Maharashtra MLC polls.
(Video source: Pankaja Munde's Office) pic.twitter.com/WwzsdjqXYY
विधान परिषदेच्या ११ विजयी उमेदवारांना किती मते मिळाली?
- योगेश टिळेकर (भाजपा) - २६
- पंकजा मुंडे (भाजपा) - २६
- परिणय फुके (भाजपा) - २६
- अमित गोरखे (भाजपा)- २६
- सदाभाऊ खोत (भाजपा)- २६
- भावना गवळी (शिंदे गट)- २४
- कृपाल तुमाने (शिंदे गट)- २५
- राजेश विटेकर (दादा गट)- २३
- शिवाजीराव गर्जे (दादा गट)- २४
- प्रज्ञा सातव (काँग्रेस)- २५
- मिलिंद नार्वेकर (ठाकरे गट)- २४
पराभूत उमेदवार
जयंत पाटील (शेकाप- शरद पवार गट पुरस्कृत)- १२
9/9 👍 #MLCElection#VidhanParishad#Maharashtra
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 12, 2024
काँग्रेसची फुटलेली ७ मते कुठे गेली?
- काँग्रेसची ७ मते फुटल्याचा संशय सध्या तरी बांधला जातोय. काँग्रेसकडे एकूण ३७ मते होती. काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची २५ मते मिळाली.
- सातवांना २५ मते दिल्यानंतर काँग्रेसकडे १२ मते शिल्लक राहिली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे १७ मते होती, त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांना काँग्रेसच्या ६ मतांची गरज होती.
- नार्वेकरांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे १७ आणि काँग्रेसची ५ अशी पहिल्या पसंतीची फक्त २२ मते मिळाली. म्हणजेच काँग्रेसची १२ पैकी ७ मते फुटली.
- अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४२ मते होती पण त्यांच्या दोनही उमेदवारांना मिळून ५ मते जास्त मिळाली. म्हणजेच काँग्रेसच्या ७ पैकी ५ मते अजितदादांच्या राष्ट्रवादीने फोडली असा अंदाज आहे.
- भाजपाकडे ११५ मते होती आणि भाजपाच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची एकूण ११८ मते मिळाली.
- भाजपाला एकूण ३ मते जास्त मिळाली. त्यापैकी एक मत हे मनसेचे असू शकते. याचाच अर्थ उर्वरित दोन अधिकची मते ही भाजपाला काँग्रेसकडून मिळाल्याचा अंदाज आहे.
- एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यासह पहिल्या पसंतीची ४६ मते होती. शिंदेंच्या शिवसेनेला ४९ मते मिळाली. म्हणजेच त्यांनाही समाजवादी पार्टी आणि MIM ची मते मिळाल्याची शक्यता आहे.