Vidhan Parishad Election: मोठी घडामोड! भाजपा नेता अचानक अजित पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 12:51 PM2022-06-20T12:51:57+5:302022-06-20T12:52:42+5:30

Maharashtra Vidhan Parishad Election Update: विधान परिषद निवडणुकीत आतापर्यंत २०३ आमदारांनी मतदान केले आहे. भाजपाने १०४ हून अधिक आमदारांचे मतदान झाले आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election: Big developments! BJP leader Chandrashekhar Bawankule came to meets Ajit Pawar; Discussions with Eknath Khadse | Vidhan Parishad Election: मोठी घडामोड! भाजपा नेता अचानक अजित पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Vidhan Parishad Election: मोठी घडामोड! भाजपा नेता अचानक अजित पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

googlenewsNext

राष्ट्रवादीने आपल्या पाच महत्वाच्या नेत्यांची मते मागे ठेवलेली असताना एक मोठी बातमी हाती येत आहे. एक भाजपा नेते, फडणवीसांच्या काळातील महत्वाचे मंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 

Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीने पाच महत्वाच्या नेत्यांचे मतदान मागे ठेवले; दग्याफटक्याची शक्यता? कारण काय?

भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. यातच आमदार रवी राणा विधान भवनात पोहोचले आहेत. यामुळे बावनकुळे हे नेमके कशासाठी अजित पवारांना भेटण्यासाठी गेलेत हे समजू शकलेले नाही. दरम्यान, अजित पवार, एकनाथ खडसे आणि बावनकुळेंमध्ये चर्चा सुरु असल्याचे समजते. 

आमचेच उमेदवार जिंकतील असे सांगत बावनकुळे यांनी फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सर्वांसाठी उपलब्ध असायचे. आताचे मुख्यमंत्री कुठे असतात, कोणाला भेटतात. यामुळे आमदारच त्याचा बदला घेतील असे बावनकुळे म्हणाले. 

शिवसेनेच्या आमदारांची बस लेट झाली होती. वाहतूक कोंडीत अडकली होती. यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी भाजपा, राष्ट्रवादीनंतर मतदान करण्यास सुरुवात केली. शिवसेनेच्या २० आमदारांनी आतापर्यंत मतदान केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारांना कोणाला, कसे मतदान केले याचे मार्गदर्शन केले. परंतू दोन आमदार विधान भवनात आलेच नव्हते. आणखी दोन आजी-माजी मंत्री तुरुंगात असल्याने ही दोन मते देखील राष्ट्रवादीला मिळणार नाहीएत. 

विधान परिषद निवडणुकीत आतापर्यंत २०३ आमदारांनी मतदान केले आहे. भाजपाने १०४ हून अधिक आमदारांचे मतदान झाले आहे. तर राष्ट्रवादीने देखील आपल्या आमदारांचे मतदान पार पाडले आहे. परंतू, पाच महत्वाचे नेते मागे राहिल्याने ही नेमकी खेळी कशासाठी या बाबत चर्चांना उधाण आले आहे. 

Web Title: Maharashtra Vidhan Parishad Election: Big developments! BJP leader Chandrashekhar Bawankule came to meets Ajit Pawar; Discussions with Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.