सावंतवाडी : माझे आणि मुख्यमंत्र्याचं ठरलंय. भाजपमध्ये प्रवेश निश्चित आहे. पण प्रवेशाची तारीख ज्योतिषी बघून सांगेन, असे मिश्कील उत्तर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांना दिले. नाणार प्रकल्पाबाबत भूमिका जाहीर करायला हा प्रकल्प दोन तीन दिवसात होणार नाही. त्यामुळे नाणारबाबत भाजपमध्ये गेल्यावर भूमिका जाहीर करेन, असे सांगत राणे यांनी नाणार बाबतची भूमिका गुलदस्त्यातच ठेवली.राणे म्हणाले, मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, याची माहिती माझ्या कार्यकर्त्यांना असावी यासाठी आज सावंतवाडीत येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तुम्ही तेथे आम्ही, असे अभिवचन कार्यकर्त्यांनी दिले आहे. माझा भाजप प्रवेश कधी होईल याची तारीख अद्याप ठरली नाही.मुख्यमंत्र्याशी माझी चर्चा झाली आहे. ते लवकर सांगतील. माझ्यावर जे स्थानिक नेते टीका करत आहेत त्यांच्या टिकेला कोणतेही उत्तर देणार नाही. ते माझ्या पातळीचे नाहीत. भाजप प्रवेशाला कोणत्याही अटी शर्थी घातल्या नाहीत. सध्याची राजकीय परिस्थिती तशी दिसत नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे संपूर्ण कोकणात शिवसेना, काँग्रेस वाढवली तशी भाजप वाढवेन. दोन्ही आमदार भविष्यात आमदार, खासदार भाजपचे दिसतील, असा दावाही राणे यांनी केला.>आधी घरात तर जाऊ द्याआपल्या समर्थकांना राज्यात उमेदवारी मागणार काय, यावर राणे यांनी मिश्कील उत्तर दिले. मला घरात तरी जाऊ द्या. घरात गेल्यावर दरवाजा खिडक्या कुठे आहेत ते बघतो, संसार मांडतो, असे सांगितले.
Vidhan Sabha 2019: भाजप प्रवेशाची तारीख ज्योतिषी बघून सांगेन- नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 5:06 AM