Vidhan Sabha 2019: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने केली कोंडी; वंचितशी फारकत घेतल्याने एमआयएमसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 03:28 AM2019-09-22T03:28:56+5:302019-09-22T03:29:26+5:30

चुरशीच्या लढती होणार; अशोक चव्हाण, संभाजी पाटील, मुंडे बहीण-भावाकडे लक्ष

Maharashtra Vidhan Sabha 2019 BJP slams Shiv Sena boycott; Challenge facing MIM by dealing with deprivation | Vidhan Sabha 2019: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने केली कोंडी; वंचितशी फारकत घेतल्याने एमआयएमसमोर आव्हान

Vidhan Sabha 2019: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने केली कोंडी; वंचितशी फारकत घेतल्याने एमआयएमसमोर आव्हान

googlenewsNext

- सुधीर महाजन 

मराठवाड्यात भाजपने शिवसेनेवर केलेली कुरघोडी हे गेल्या विधानसभा निवडणुकीचे फलित म्हणता येईल. सेनेची केवळ पीछेहाटच झाली नाही, तर बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबादमधील एक जागा ‘एमआयएम’ने हिसकावून घेतली. ही ओहोटी सेनेला रोखता आली नाही आणि आता लोकसभेची औरंगाबादची जागा जिंकून एमआयएमने तर सेनेच्या अस्तित्वालाच आव्हान दिले आहे. चंद्रकांत खैरेंसारखा उमेदवार पराभूत होण्याची नामुष्की सेनेवर आली, यावरूनच सेनेच्या अवस्थेची कल्पना येते आणि आता या पार्श्वभूमीवर सेना निवडणुकीला सामोरी जात आहे. पाच वर्षांच्या राजकारणात भाजपने शिवसेनेची ठिकठिकाणी कोंडी केली.

या निवडणुकीसाठी अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, या लढतींकडे सर्वांचे लक्ष असेल. अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढतील का? बीडमध्ये पंकजा आणि धनंजय या बहीण-भावाच्या लढतीकडे साºया राज्याचे लक्ष असेल. अशीच लढत बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यामध्ये अपेक्षित आहे. एमआयएम आणि वंचित आघाडी यांच्यामुळे एमआयएमला औरंगाबादेत सेनेचा पराभव करता आला; पण आता विधानसभेसाठी ही आघाडी तुटल्याने औरंगाबाद शहरातील राजकीय समीकरण बदलू शकते.

प्रचाराचे मुद्दे
दुष्काळ हा प्रमुख प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो. पाच वर्षांपासून सततचा दुष्काळ हा मोठा प्रश्न आहे. त्या अनुषंगाने जगण्याचेच प्रश्न मोठे आहेत.
पीक विमा हा एक प्रश्न आहे. पीक विमा वाटपात घोटाळा झाला. मिळालेली मदत समन्याय पद्धतीने मिळाली नाही. प्रत्येक जिल्ह्यासाठी निकष बदलले. शिवाय सर्वांनाच विम्याचा लाभ मिळाला नाही.
पिण्याचे पाणी हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो. अपुºया पावसामुळे एक जायकवाडी वगळता मराठवाड्यातील सर्व जलसाठे कोरडे आहेत. ऐन पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आहे.

मराठवाड्यातील सध्याचे बलाबल
एकूण जागा- ४६
भाजप-१८
शिवसेना-१०
काँंग्रेस-०९
राष्ट्रवादी-०८
एमआयएम-०१

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 BJP slams Shiv Sena boycott; Challenge facing MIM by dealing with deprivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.