Vidhan Sabha 2019 : बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर आशिष देशमुख यांची घणाघाती टीका, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 01:27 PM2019-09-23T13:27:30+5:302019-09-23T13:28:52+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - काँग्रेसच्या गोटात सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. 

Maharashtra Vidhan Sabha 2019 : Congress Leader Ashish Deshmukh criticize Balasaheb Thorat leadership | Vidhan Sabha 2019 : बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर आशिष देशमुख यांची घणाघाती टीका, म्हणाले... 

Vidhan Sabha 2019 : बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर आशिष देशमुख यांची घणाघाती टीका, म्हणाले... 

Next
ठळक मुद्दे काँग्रेसच्या गोटात सारे काही आलबेल नसल्याचे संकेत काँग्रेसचे विदर्भातील नेते आशिष देशमुख यांनी पक्षाला घरचा आहेर देतान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पाच कार्याध्यक्षांवर घणाघाती टीकाप्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे केवळ संगमनेरपुरते प्रदेशाध्यक्ष आहेत की काय, अशी चर्चा

नागपूर - राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेने सर्वस्व पणाला लावले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारही महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पण काँग्रेसच्या आघाडीवर मात्र निवडणुकीबाबत म्हणावा तसा उत्साह दिसून आलेला नाही. त्यातच काँग्रेसचे विदर्भातील नेते आशिष देशमुख यांनी पक्षाला घरचा आहेर देतान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पाच कार्याध्यक्षांवर घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. 

आज एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना आशिष देशमुख यांनी बाळासाहेब थोरात आणि पाच कार्यांध्यक्षांवर टीका केली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे केवळ संगमनेरपुरते प्रदेशाध्यक्ष आहेत की काय, अशी चर्चा सुरू आहे, अशी टीका आशिष देशमुख यांनी केली. तसेच निवडण्यात आलेल्या पाच कार्याध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरही आशिष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. 

भाजपाची विचारसरणी ही संघाची आहे. त्यावर गोळवलकर, हेडगेवार यांच्या विचारांचा पगडा आहे. हे विचार देशाच्या किती उपयोगी आहेत, हा प्रश्न आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसमध्ये सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पक्ष सोडण्याचा विचार करताय का, असे विचारले असता पक्ष सोडण्याचा आपला कुठलाही विचार नाही. मी काँग्रेससोबतच राहीन, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच समाज कार्य करताना निवडणूक लढवणेच गरजचेचे नाही, असे सांगत देशमुख यांनी निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर संभ्रम कायम ठेवला. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 : Congress Leader Ashish Deshmukh criticize Balasaheb Thorat leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.