मुंबई : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. राष्ट्रवादीचा जाहीरनामा तयार होता; परंतु घटक पक्षांनी आग्रह केल्यामुळे एकत्रितपणेच जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.काही पक्ष आमच्यासोबत येणार आहे. त्यांचे जागा वाटप लवकरच होईल. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत शरद पवार यांच्याविषयी विधान केले. परंतु त्यांनी कलम ३७० वरुन जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु केले आहे. काश्मीरमध्ये तिरंगा फडकविण्यात आला आहे. पण तो तेथे पहिल्यापासून फडकत आहे. दोन झेंडे होते, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही आंदोलने केल्यावर आरएसएसच्या कार्यालयावर तिरंगा फडकवला गेला आहे. काश्मीरमध्ये अजून कर्फ्यू का काढण्यात आला नाही? काश्मीरातील मोक्याच्या जागा आता पर्यटकांच्या नावाखाली खरेदी केली जाणार असून अदानी, अंबानी यांना देण्याचा कट आहे, असा थेट आरोपही मलिक यांनी केला.
Vidhan Sabha 2019: काँग्रेस-राष्ट्रवादी करणार संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 3:34 AM