Vidhan Sabha 2019: पश्चिम महाराष्ट्र- बालेकिल्ल्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 03:14 AM2019-09-22T03:14:58+5:302019-09-22T03:20:06+5:30

भाजपचे सर्वच पक्षांसमोर कडवे आव्हान

Maharashtra Vidhan Sabha 2019 Congress NCP in trouble in Western Maharashtra | Vidhan Sabha 2019: पश्चिम महाराष्ट्र- बालेकिल्ल्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी अडचणीत

Vidhan Sabha 2019: पश्चिम महाराष्ट्र- बालेकिल्ल्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी अडचणीत

Next

- वसंत भोसले 

कोल्हापूर : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील ५८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वच पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे हा कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचा गड राहिला आहे. त्यांच्या पक्षातील अनेक मोहरे लढण्यापूर्वीच भाजपला शरण गेल्याने दोन्ही कॉँग्रेस पक्ष अडचणीत सापडले आहेत.

पश्चिम महाराष्ट हा सधन विभाग मानला जातो. सहकार हा येथील राजकारणाचा कणा असल्याने नेहमीच कॉँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, राष्टÑवादी कॉँग्रेसची स्थापना झाल्यानंतर कॉँग्रेसची पीछेहाट झाली. गतनिवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या. त्यात राष्ट्रवादीला सोळा तर कॉँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या. येत्या निवडणुकीत त्याहून वाईट स्थिती होईल, अशी शक्यता आहे.

सलग दोन्ही लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसने केवळ तीन जागा लढवून त्या सर्व गमावल्या. पश्चिम महाराष्टÑातून कॉँग्रेसचा एकही खासदार नाही. राष्टÑवादीने छोटा गड का असेना पुणे आणि साताºयात राखला आहे. याउलट भाजपने आपली ताकद वाढविली आहे. राष्टÑवादी कॉँग्रेससाठी सोलापूर, सातारा आणि सांगली हे जिल्हे सातत्याने दोन-चार आमदार देणारे आहेत. त्यापैकी जयंत पाटील, सुमनताई पाटील, हसन मुश्रीफ, शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर, मकरंद पाटील आदी समर्थक उमेदवारवगळता दमछाकच होणार आहे. हीच अवस्था काँग्रेसची आहे. भाजपला पुणे शहरातून पुन्हा कौल मिळेल; असे वातावरण आहे. जिल्ह्यातील तेरा जागांवरही या पक्षाने मातब्बर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. शिवसेनेकडे तेरा आमदार आहेत, स्वतंत्रपणे लढले तरी सेना स्पर्धेत राहणार आहे. भाजप-सेना युती झाली तर मात्र कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीचा टिकाव लागणे कठीण, अशी परिस्थिती तरी सध्या आहे.एमआयएमशाी फारकत घेतल्याने वंचित आघाडीचा फारसा प्रभाव जाणवणार नाही.

प्रचाराचे मुद्दे
महापुराने कृष्णा आणि भीमा नदीच्या काठावर हाहाकार उडाला असला तरी पश्चिम महाराष्टÑाच्या पूर्वेकडीलच्या दुष्काळी पट्ट्यातील पाणीप्रश्न गंभीर आहे. तो यशस्वीपणे हाताळण्यात फडणवीस सरकारलाही यश आलेले नाही.
साखर कारखाने अनेक कारणांनी अडचणीत आल्याने ऊसकरी शेतकरी संकटात आहे. त्याला मदत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात सरकारला अपयश आले आहे, हा मुद्दा प्रचारात येऊ शकतो.
मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि लिंगायत समाजाला ‘स्वतंत्र धर्मा’ची मान्यता या प्रश्नावर समाधानकारक तोडगा निघाला नाही, त्याची नाराजी राहणार आहे.
राष्टÑवादाच्या मुद्द्यावरच मोदींसाठी मतदान करा, याच्याआधारेच भाजप-सेना प्रचारावर भर देण्याची शक्यता आहे, अन्यथा सांगण्यायोग्य काही मुद्देच नाहीत.

पश्चिम महाराष्ट्रातील सध्याचे बलाबल
एकूण जागा- ५८
भाजप-२१
शिवसेना-१३
काँग्रेस-७
राष्ट्रवादी-१६
इतर-१

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Congress NCP in trouble in Western Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.