Vidhan Sabha 2019: काँग्रेसने विदर्भवादी भूमिका घ्यावी - श्रीहरी अणे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 04:03 AM2019-09-23T04:03:00+5:302019-09-23T04:03:25+5:30
विदर्भवादाची भूमिका घेतल्यास काँग्रेस पुन्हा बळकट होईल, असे प्रतिपादन राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी केले
नागपूर : २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर सत्ता मिळविली. पण आजही विदर्भावर अन्याय सुरू आहे. आजही विदर्भात तळागाळात काँग्रेस मजबूत आहे. विदर्भवादाची भूमिका घेतल्यास काँग्रेस पुन्हा बळकट होईल, असे प्रतिपादन राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी रविवारी केले.
काँग्रेस कमिटीतर्फे देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात अणे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या सांगण्यावरून काँग्रेस पक्षश्रेष्ठी विदर्भातील कार्यक र्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात. परंतु सध्याच्या स्थितीत विदर्भच काँग्रेसला नवसंजीवनी देऊ शकते. यासाठी विदर्भवादाची भूमिका घ्यावी, स्वतंत्र विदर्भ प्रदेश काँग्रेस गठित करून विदर्भाची चळवळ उभी केल्यास काँग्रेस पुन्हा बळकट होईल, असे ते म्हणाले. विदर्भाच्या घोषणांनी देवडिया भवन दणाणले होते.