पुणे : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हा मित्रपक्षांना ५५ ते ६० जागा हव्या आहेत़ आघाडीतील नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत ही मागणी केली आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली़ यावेळी आम्ही जागा मिळण्यावरून वाद घालणार नाही, ही संख्या कमी-जास्तही होऊ शकते, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.शेट्टी म्हणाले, जातीयवादी शक्तींनी तोंड वर काढले असून लोकशाही धोक्यात आहे़ अशावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आम्ही राहणार असून, या आघाडीचे बळ वंचित कार्यकर्त्यांना मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे़ विनाकारण आम्ही अव्वाच्या सव्वा जागा मागत नसून, वंचित कार्यकर्त्याला विधानसभेत स्थान मिळाले पाहिजे, ही आमची मागणी आहे़ याकरिता स्वाभिमानी संघटनेसह इतर १६ संघटना व मित्र पक्षांना ५५ ते ६० जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे़ स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आपले उमेदवार उभे करणार असून, हे उमेदवार मित्रपक्षांना मिळालेल्या जागांमधूनच उभे राहतील़ विधानसभेकरिता मी निवडणूक लढवावी म्हणून आघाडीतील नेत्यांनी मला सांगितले आहे़ याबाबत येत्या चार पाच दिवसात मी निर्णय घेईन.
Vidhan Sabha 2019 : आघाडीकडे ६० जागांची मागणी : राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 5:37 AM