मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १९ किंवा २० सप्टेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी विविध बैठका होत आहेत.बुधवारी सकाळी ९.३० वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे राजकीय पक्षांसमवेत बैठक होईल. सकाळी ११.१५ आणि दुपारी २.३० ला विभागीय आयुक्त, जिल्हा निवडणूक अधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत बैठक होईल. दुपारी ४.४५ ला निवडणूक खर्च देखरेखविषयक विभागांसोबत बैठक होईल. त्यात उत्पादन शुल्क, आयकर आदी विभागांचा समावेश असेल. सायंकाळी ५.१५ ला राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, गृह विभागाचे प्रधान सचिव आणि राज्य शासनाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांंसमवेत बैठक होईल.दौºयामध्ये वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा आणि संदीप सक्सेना, उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन आणि चंद्र भूषण कुमार, महासंचालक धीरेंद्र ओझा, संचालक (वित्त) विक्रम बात्रा, पीआयबीच्या अतिरिक्त महासंचालक शेफाली शरण, सचिव ए. एन. दास आणि अवर सचिव आय. सी. गोयल आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
Vidhan Sabha 2019 : निवडणूक आचारसंहिता उंबरठ्यावर; आयोगाचा दिवसभर बैठकींवर भर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 4:18 AM