शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

Vidhan Sabha 2019 : नेत्यांची अन् मतांची गळती कशी रोखणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 4:33 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या महागळतीमुळे आघाडीला २०१४ मध्ये मिळालेले पावणेदोन कोटी मतांचे गाठोडे टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असणार

- धनंजय वाखारेनाशिक : भाजप-शिवसेनेला रोखण्यासाठी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या महागळतीमुळे आघाडीला २०१४ मध्ये मिळालेले पावणेदोन कोटी मतांचे गाठोडे टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. गेल्या निवडणुकीत कॉँग्रेस व राष्टÑवादीने स्वतंत्रपणे लढताना दोन्ही मिळून १ कोटी ८६ लाख मते घेतली होती, तर भाजप-शिवसेनेनेही स्वतंत्र लढत २ कोेटी ४९ लाखांहून अधिक मते मिळविली होती.२०१४ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली तसेच कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीही दुभंगली होती. हे चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी भाजपने २६० जागा लढविताना १ कोटी ४७ लाख ९ हजार २७६ मते घेतली होती. भाजपच्या मतांची टक्केवारी २७.८१ टक्के इतकी सर्वाधिक राहिली. त्याखालोखाल शिवसेनेने २८२ जागा लढताना १ कोटी २ लाख ३५ हजार ९७० मते मिळविली होती. सेनेची मतांची टक्केवारी १९.३५ टक्के इतकी होती. कॉँग्रेसने २८७ जागांवर उमेदवार उभे केले होते. कॉँग्रेसने ९४ लाख ९६ हजार ९५ मते घेतली. त्यांच्या मतांची टक्केवारी १७.९५ इतकी होती, तर राष्टÑवादीने २७८ जागा लढताना ९१ लाख २२ हजार २८५ मते घेतली. राष्टÑवादीची मतांची टक्केवारी १७.२४ टक्के इतकी नोंदविली गेली होती. सेना-भाजपला एकूण २ कोटी ४९ लाख ४५ हजार २४६ मते मिळाली होती, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीला १ कोटी ८६ लाख १८ हजार ५८० मते मिळाली होती.मागील निवडणुकीत उधळलेला सेना-भाजपचा वारू रोखण्यासाठी यंदा कॉँग्रेस-राष्टÑवादीने चंग बांधला असला तरी गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षांतून प्रमुख नेते-पदाधिकाऱ्यांची सुरू असलेली महागळती रोखण्यात त्यांना अपयश आले आहे. एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये युतीची चर्चा सुरू असतानाच कॉँग्रेस-राष्टÑवादीने मात्र आघाडी करीत प्रत्येकी १२५ जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. आघाडीमुळे गेल्यावेळी मिळालेला जनाधार टिकवून ठेवण्याचे आव्हान समोर असतानाच मोठ्या प्रमाणावर झालेल्या आउटगोइंगमुळे मतांची गळती होणार नाही, याची काळजी आता आघाडीला वाहावी लागणार आहे.>पवार कुणाकडे बघणार?महागळतीमध्ये राष्टÑवादी सर्वाधिक डॅमेज झालेली आहे. त्यामुळे शरद पवारांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. अशातच शरद पवार यांनी सोलापूरमध्ये बोलताना मला आता काही लोकांकडे बघायचे आहे, असे सांगत पक्ष सोडणाऱ्यांना एकप्रकारे गर्भीत इशाराच दिला आहे. पवार यांच्या एकूणच राजकारणाची हातोटी पाहता पवार यांच्याकडून नेमके कुणाचे हिशेब चुकते होणार, याची उत्सुकता आता आख्ख्या महाराष्टÑाला लागली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार