संगमनेर (जि. अहमदनगर) : विधानसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्ष तयार असून आर्थिक मंदी, बेरोजगारीसह शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही मैदानात उतरणार आहोत. राज्यातील अनेक नेते कॉँग्रेसच्या संपर्कात असून ते लवकरच पक्षात प्रवेश करणार आहेत, असे कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना सांगितले.ते म्हणाले, गेली पाच वर्ष राज्यात कॉँग्रेसचे काम सातत्याने सुरू होते. आम्ही दोनदा यात्रा काढल्या. अनेक आंदोलने केली. या सरकारकडे एक अपयशी सरकार म्हणून पाहिले जाते आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत. बेरोजगारी देखील वाढली आहे. अशा अनेक बाबींमुळे या सरकारबद्दल नाराजीचा सुरू आहे. त्यामुळे राज्यातील जनता आमच्यासोबत आहे. काँग्रेस सोडून अनेक जण गेले. मात्र, आज सकाळपासून अनेकांचे फोन येत आहेत. साहित्यिक लहू कानडे यांनी शिवसेनेतून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य हिरामण खोसकर, वाघेरा ठाणपाडा येथील भारती रघुनाथ भोये यांसह नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आदी तालुक्यातील राष्टÑवादी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Vidhan Sabha 2019: अनेक नेते कॉँग्रेसच्या संपर्कात- बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 3:44 AM