शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

Vidhan Sabha 2019: पक्षांतरामुळे कॉँग्रेस खस्ता; ‘युती’त बळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 3:23 AM

युती मजबूत; पण बंडखोरीची धास्ती

- किरण अग्रवाल नाशिक : गेल्या निवडणूकीत भाजपाशिवसेना ‘युती’ ने प्राबल्य राखलेल्या उत्तर महाराष्ट्रात नगर व धुळे नंदुरबारसह नाशिकमध्ये बऱ्यापैकी अस्तित्व टिकवून ठेवलेल्या कॉँग्रेस- राष्ट्रवादीला यंदा पक्षांतराचे ग्रहण लागल्याने कॉँग्रेसची हालत खस्ता तर युतीला बळ लाभून गेलेले दिसून येत आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला होता. त्या पाठोपाठ आगामी विधानसभेच्या दृष्टीने नंदुरबारमध्ये गेल्या सुमारे ५० वर्षांपासून कॉँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनीही भाजपचे कमळ हाती धरले आहे, तर पुत्री निर्मला गावित यांनी कॉँग्रेस आमदारकीचा राजीनामा देत शिवबंधन हाती बांधले आहे. नगर जिल्ह्यातील कॉँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत तर राष्टÑवादीचे वैभव पिचड भाजपात प्रवेशकर्ते झाले आहेत. त्यामुळे संख्याबळात प्रत्येकी सहा जागा मिळवून गेल्यावेळी नगर जिल्ह्यात समसमान राहीलेल्या युती व आघाडीच्या बळात यंदा फरक पडला आहे. कॉँग्रेस- राष्टÑवादीची स्थिती काहीशी कमजोर झाली असून, भाजपा शिवसेना मजबूत स्थितीत आली आहे. नंदुरबार जिल्हा आजवर कॉँग्रेससाठी अनुकूल राहत आला आहे. परंतु तेथेही या पक्षात पडझड झाली आहे. शिवाय लगतच्या शहादा मधील मातब्बर नेते पी. के. अण्णा पाटील यांचे पुत्र दीपक पाटील हे देखील भाजपात गेले आहेत. त्यामुळे या आदिवासी पट्ट्यात भाजप मजबूत बनली आहे. खान्देशात जळगावमध्ये ११ पैकी सहा जागा जिंकलेल्या भाजपची स्थिती सर्वात चांगली असली तरी, लोकसभा निवडणुकीवेळी तिकीटावरून पदाधिकाऱ्यांत जाहीरपणे झालेली मारहाण पहाता यंदा विधानसभेला त्याचे काय पडसाद उमटतात ते पहाणे औत्सुक्याचे ठरले आहे. नाशकातही शहरातील तीनही जागा भाजप राखून असला तरी यंदा उमेदवारी बदलली जाण्याचे संकेत आहेत. एकूण उत्तर महाराष्टÑात युती सध्यातरी मजबूत असली तरी ऐनवेळी होणारी बंडखोरी चित्र बदलू शकते.प्रचारात मुद्दे काय?नंदुरबार, नाशिक व नगर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात वन हक्क दाव्यांचा प्रश्न लोंबकळला आहे. त्यामुळे या परीसरात सदरचा मुद्दा प्रचारात प्रभावी ठरेल.गिरीश महाजन, जयकुमार रावल, दादा भुसे व राम शिंदे यांच्यासारखे मंत्री असताना उत्तर महाराष्टÑात नवा उद्योग किंवा मोठ्या प्रमाणात रोजगार देऊ शकणारा प्रकल्प येऊ शकलेला नाही.नाशिकच्या कांद्यापासून जळगावच्या केळी पर्यंत सर्व शेतमालाच्या भावाचा प्रश्न कायम आहे. शेतकºयांच्या आत्महत्या कमी झालेल्या नसून कर्जमाफी फोल ठरल्याची भावना आहे.उत्तर महाराष्ट्रातील सध्याचे बलाबलएकूण जागा- ४७भाजप-१९शिवसेना-८काँग्रेस-११राष्ट्रवादी-७इतर-२

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस