शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

Vidhan sabha 2019 : राजकीय भाऊबंदकी; निवडणूक रिगणात उतरली भावंडं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 5:13 AM

विधानसभा निवडणुकीत दोन सख्खे भाऊ वेगवेगळ्या मतदारसंघात एकाच पक्षातर्फे तर सख्खे भाऊ-बहीण दोन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये आणि वेगवेगळ्या पक्षांतर्फे रिंगणात उतरले आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत दोन सख्खे भाऊ वेगवेगळ्या मतदारसंघात एकाच पक्षातर्फे तर सख्खे भाऊ-बहीण दोन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये आणि वेगवेगळ्या पक्षांतर्फे रिंगणात उतरले आहेत.माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख हे लातूर शहर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आहेत. २०१४ मध्ये त्यांनी भाजपचे शैलेश लाहोटी यांचा ४९४६५ मतांनी दारुण पराभव केला होता. काँग्रेसने अमित यांना पुन्हा रिंगणात उतरविले आहे. बाजूच्या लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसने अमित यांचे बंधू धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. धीरज हे राजकारणात आधीपासूनच सक्रिय असून लातूर जिल्हा परिषदेचे सदस्यदेखील आहेत. लातूर ग्रामीणमध्ये २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे त्रिंबक भिसे विजयी झाले होते. पक्षाने यावेळी त्यांच्याऐवजी धीरज यांना संधी दिली आहे. अमित आणि धीरज या दोन बंधुंच्या निवडणुकीच्या निमित्ताने देशमुख घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.इगतपुरी (जि.नाशिक) येथील काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. आता त्या इगतपुरीतून शिवसेनेच्या उमेदवार आहेत. निर्मला या माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांच्या कन्या. माणिकराव हे नंदुरबारचे तब्बल नऊ वेळा खासदार होते. त्यांचे पुत्र भरत गावित यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. आता भाजपने त्यांना नवापूर विधानसा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे या भावंडांमध्ये पुन्हा एकदा चुरशीचा सामना रंगणार आहे.खासदारांच्या पत्नी रिंगणातचंद्रपूरचे काँग्रेस खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने वरोरा मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्ये बाळू धानोरकर शिवसेनेच्या तिकिटावर जिंकले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा पराभव केला.नांदेड दक्षिण मतदारसंघात २०१४ मध्ये विजयी झालेले शिवसेनेचे हेमंत पाटील हिंगोलीचे खासदार झाल्यामुळे आता नांदेड दक्षिण या मतदारसंघात शिवसेनेने त्यांच्या पत्नी जयश्री यांना उमेदवारी दिली आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019