Vidhan Sabha 2019: ‘त्या’ विजेत्यांना एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत राहण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 04:09 AM2019-09-22T04:09:47+5:302019-09-22T06:33:17+5:30
१२ विजेत्यांना मिळणार संधी
मुंबई : राज्यातील युवकांना कोणते प्रश्न महत्वाचे वाटतात, राज्यातील जनतेला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, अशा विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी ‘मैं भी नायक’ स्पर्धेतील १२ तरुण विजेते आता एक दिवसाचे मुख्यमंत्री बनणार आहेत.
प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून युवकांनी या स्पर्धेत भाग घेतला. यात ५ लाख पेक्षा जास्त लोकांनी मत देऊन २० पैकी १२ अंतिम विजेत्यांची निवड केली. या अंतिम १२ विजेत्यांमध्ये शहजाद मणियार, पृथ्वीराज एकळे, प्रगती सांगळे, प्रशांत राठोड, अनुश्री हिरादेवे, विजय अंजन, आशिष कांबळे, अजिंक्य बोराडे, मंजुश्री घोणे, स्वप्निल खरात, वैभव देरकर, शुभम हेनगडे यांचा समावेश आहे. हे सगळे आता ‘एका दिवसाचे मुख्यमंत्री’ होणार आहेत. या बारा जणांना राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेश अशा काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत एक दिवस राहून त्यांचे कामकाज बघण्याचा आणि विकासावर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.