शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : युवापर्व; मात्र घराणेशाहीतच सर्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 04:38 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राजकीय पटलावर पुन्हा एकदा प्रस्थापित घराण्यांकडेच उमेदवारीचा रतीब घातला जात असल्याचे चित्र आहे.

पोपट पवार कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांकडून सध्या युवकांना संधी देण्याचा डांगोरा पिटला जात असला तरी ज्यांना आखाड्यात उतरविण्याची तयारी केली जात आहे, अशा बहुतांश युवकांची पार्श्वभूमी तपासली तर राज्याच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा प्रस्थापित घराण्यांकडेच उमेदवारीचा रतीब घातला जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, विधानसभेच्या रणांगणातच अनेकांनी वंशपरंपरेने लाँचिंग करण्याची धडपड चालविल्याने चांद्यापासून बांद्यापर्यंत घराणेशाहीची मुळे प्रबळ होताना दिसत आहेत.‘पवार पर्व’ सुरू राहण्यासाठी नातू रोहित पवार यांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली आहे. यासाठी त्यांनी नगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघाची निवड केली आहे. रोहित यांनी दोन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या शिवसेनेच्या ‘युवराजां’नाही सुरक्षित मतदारसंघ देण्यासाठी सेनेच्या आमदारांमध्ये चढाओढ लागली आहे. राज्याच्या राजकीय सारिपाटावर ‘आदित्योदय’ करण्यासाठी जळगाव ग्रामीण, मालेगाव पूर्व व वरळी विधानसभा मतदारसंघांतून ‘आवतण’ दिले गेले आहे. तिकडे माजी मंत्री सुनील तटकरे यांनाही आपला वारसदार विधानसभेत पाठविण्याची घाई झाली आहे. श्रीवर्धन मतदारसंघातून कन्या आदिती तटकरे यांच्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.काँग्रेसमधून भाजपवासी झालेले जिंतूरचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनाही कन्येच्या राजकीय कारकिर्दीला आयाम द्यायचा आहे. जिंतूर मतदारसंघातून मेघना यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. औरंगाबादच्या गंगापूर मतदारसंघातून माजी आमदार अण्णासाहेब माने यांचे पुत्र संतोष यांचे नावही शिवसेनेकडून आघाडीवर आहे.>बीडमध्ये वारसदारांच्या लाँचिंगसाठी धडपड सुंदरराव सोळुंके, गोपीनाथ मुंडे, केशरकाकू क्षीरसागर अशा मातब्बर नेत्यांचा जिल्हा असलेल्या बीडमध्ये घराणेशाहीची परंपरा नेटाने चालविली जात आहे. माजी मंत्री विमलताई मुंदडा यांच्या सूनबाई नमिता यांना केजमधून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गेवराईतही माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी पुत्र विजयसिंह यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. स्वत: भाजपकडून विधान परिषदेचे सदस्य असूनही आष्टीच्या सुरेश धस यांना पुत्र जयदत्त यांच्या करिअरची चिंता लागून राहिली आहे. आष्टी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न आहे.>रामदासकदम यांनाहीपुत्राची काळजीखेड-गुहागर मतदारसंघात पराभव पदरी पडल्याने मागील दाराने जात मंत्रिपद मिळविणारे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना दापोलीतून पुत्र योगेश कदम यांच्यासाठी उमेदवारी हवी आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aditya Thackreyआदित्य ठाकरे