शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
4
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
5
किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
6
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
7
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
8
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
9
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
10
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
11
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
12
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
13
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
14
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
15
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
16
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
17
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
18
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
19
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
20
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2024 15:36 IST

Maharashtra Election 2024 Live Updates : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी आज, बुधवारी (दि.२०)  मतदान होत आहे. राज्यात एकूण ...

20 Nov, 24 03:36 PM

तीन वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात ३५ टक्के मतदान

20 Nov, 24 03:34 PM

वर्धा : जिल्ह्यातील चार मतदारसंघात ३ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी

४९.६८ टक्के मतदान.

20 Nov, 24 03:33 PM

43 टक्के मतदान

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी एकूण 43 टक्के मतदान झालेले आहे

20 Nov, 24 03:30 PM

जळगाव : १) सायगाव ता. चाळीसगाव आणि २) वरणगाव ता. भुसावळ येथे बुधवारी दुपारी तीन वाजेनंतर मतदानासाठी मतदारांची रांग लागली होती.

20 Nov, 24 03:27 PM

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी व विश्राम कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

20 Nov, 24 03:24 PM

गडचिराेली - मतदानामुळे बसस्थानक परिसरात शुकशुकाट

20 Nov, 24 03:11 PM

पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.

20 Nov, 24 03:02 PM

गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान

20 Nov, 24 02:58 PM

केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल

20 Nov, 24 02:51 PM

पुण्यात पहिल्या ६ तासात २९.०३ टक्के मतदान

पहिल्या सहा तासांत अर्थात दुपारी १ पर्यंत जिल्ह्यात २९.०३ टक्के मतदान झाले आहे. ग्रामीण भागात मतदारांचा उत्साह दिसून येत असून आंबेगाव मतदारसंघात सर्वाधिक ३५.६३ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान पिंपरी मतदारसंघात २१.३४ टक्के मतदान झाले आहे. 

20 Nov, 24 02:31 PM

मंत्री गुलाबराव पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

20 Nov, 24 02:28 PM

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व महायुतीचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या गावी पाळधी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत त्यांनी मतदारांना लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

20 Nov, 24 02:27 PM

गडचिराेली जिल्ह्यात १ वाजेपर्यंत ५०.८९ टक्के मतदान

20 Nov, 24 02:24 PM

लाेकशाहीच्या उत्सवात नागरिक दंग; गडचिराेलीच्या बाजारपेठेत शुकशुकाट

20 Nov, 24 02:12 PM

146 ओवळा माजिवाडा - सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतची आकडेवारी

20 Nov, 24 02:07 PM

जिल्हा पालघर - सरासरी टक्केवारी : 33.40%

मतदानाची 2 तासाची टक्केवारी

मतदारसंघ टक्केवारी

1) 128- डहाणू :40.02 %

2) 129-विक्रमगड : 32.1%

3) 130-पालघर : 34.22%

4) 131-बोईसर :32.5%

5) 132-नालासोपारा : 30.35%

6) 133-वसई : 34.53%

20 Nov, 24 02:04 PM

मविआचे केदार दिघे, पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

20 Nov, 24 02:01 PM

ठाण्यात दुपारी १ वाजेपर्यंत एकूण २८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले

ठाण्यात दुपारी १ वाजेपर्यंत एकूण २८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले

20 Nov, 24 01:55 PM

कोल्हापुरात भगवी टोपी घालण्यावरून वाद

कोल्हापुरातील शिरोलीत भगवी टोपी घालण्यावरुन हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे

20 Nov, 24 01:51 PM

लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान

लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान

  • लातूर ग्रामीण- ३६.२२ 
  • लातूर शहर- ३४.७७
  • अहमदपूर- २९.३१
  • उदगीर- ३३.४६
  • निलंगा- ३३.६१
  • औसा- ३१.९९

20 Nov, 24 01:50 PM

भंडारा जिल्हा मतदानाची टक्केवारी - दुपारी १:०० वाजेपर्यंत ३५.०६ टक्के

भंडारा जिल्हा मतदानाची टक्केवारी - दुपारी १:०० वाजेपर्यंत ३५.०६ टक्के

  • तुमसर ३७.३७ टक्के
  • भंडारा ३२.९८ टक्के
  • साकोली ३६.३३ टक्के

20 Nov, 24 01:49 PM

बुलढाणा जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी मतदान ३२.९१ टक्के

जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी मतदान : ३२.९१ टक्के

  • बुलढाणा: ३०.७६
  • चिखली: ३१.३९
  • जळगाव जामाेद : ३०.१८
  • खामगाव : ३५.४१
  • मलकापूर : ३१.४२
  • मेहकर : ३६.७९
  • सिंदखेड राजा : ३४.३१


सकाळी ११ वाजेपर्यंत बुलढाणा जिल्ह्यात सरासरी १९.२३ टक्के मतदान झाले होते.

20 Nov, 24 01:47 PM

दुपारी एक वाजेपर्यंतची चारकोप, कांदिवली, बोरिवली मतदानाची आकडेवारी

दुपारी एक वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी

  • चारकोप - २७.६९
  • कांदिवली पूर्व - ३१.४६
  • बोरिवली - ३०.३१

20 Nov, 24 01:46 PM

अकोला पूर्व: दुपारपर्यंत १८ टक्के मतदान; कर्तव्य बजावण्यासाठी नागरिकांची होतेय गर्दी

अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला (पश्चिम), अकोला (पूर्व) व मुर्तिजापूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात दुपारी बारा वाजेपर्यंत एकूण १८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे.

20 Nov, 24 01:44 PM

सोलापूर: दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी एकूण २९.४४ % मतदान

सोलापूर: जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी एकूण २९.४४ % मतदान झालेले आहे.

20 Nov, 24 01:43 PM

११३ वर्षांच्या कांचनबेन यांनी मलबार हिल केंद्रावर जाऊन केले मतदान

नेपियन सी मार्ग येथील रहिवासी ११३ वर्षांच्या कांचनबेन नंदकिशोर बादशाह यांनी मलबार हिल केंद्रावर जावून मतदान केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करताना शतायुषी मतदारांचा उत्साह तरुणांनाही मागे टाकेल, असा होता.

 

20 Nov, 24 01:36 PM

हेमा मालिनी, राकेश रोशन यांसह अनेक सेलिब्रिटींनी केलं मतदान

ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी, इशा देओल, ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते राकेश रोशन यांनी सपत्निक मतदान केले.

20 Nov, 24 01:30 PM

मतदारांनी मतोत्सवात सहभागी होवून मतदानाचा हक्क बजावा- प्रफुल पटेल

खासदार प्रफुल पटेल यांनी गोंदिया येथे NMD महाविद्यालयात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. "आज संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाहीचा मतोत्सव असून मतदारांनी या मतोत्सवात सहभागी होवून प्रत्यकाने मतदानाचा हक्क बजावावा. महाराष्ट्रात महायुती सरकारने राबविलेल्या जनहित व लोककल्याणकारी योजनामुळे राज्यातील मतदार पुन्हा महायुतीला संधी देतील आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार बहुमताने स्थापन होईल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

20 Nov, 24 01:19 PM

भुसावळ: रेल्वे विभागाच्या DRM इति पांडेय यांनी केले मतदान

भुसावळ रेल्वे विभागाच्या DRM इति पांडेय यांनी डी.एस. हायस्कूल केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.

20 Nov, 24 01:13 PM

काँग्रेसचे राजकुमार बडोले यांनी केले मतदान

काँग्रेसचे राजकुमार बडोले यांनी केले मतदान

20 Nov, 24 01:07 PM

आमदार राजू कारेमोरे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

आमदार राजू कारेमोरे, त्यांची पत्नी रंजिता कारेमोरे, मुलगी वैभवी, मुलगा वैभव यांनी मूळ गाव एकलारी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

20 Nov, 24 12:52 PM

मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब मतदान केले

केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

20 Nov, 24 12:48 PM

चंद्रकांत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना केले आवाहन

मतदान करणे हे आपले कर्तव्य आणि लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. विकसित भारताच्या निर्मितीसाठी, महाराष्ट्राला प्रगतीपथावर आरुढ ठेवण्यासाठी तसेच आपली भारतीय लोकशाही समृध्द करण्यासाठी अवश्य मतदान करा, असे आवाहन केले.

20 Nov, 24 12:45 PM

हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

इंदापूर: हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आणि मोठ्या मताधिक्याने विजयाचा विश्वास व्यक्त केला.

20 Nov, 24 12:43 PM

९१ वर्षीय आजींनी बजावला मतदानाचा अधिकार, आरोग्यसुविधांबाबत व्यक्त केले समाधान

अंधेरी पश्चिम मतदारसंघ बर्फिवाला विद्यालय मतदान केंद्रात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून त्यांना स्वयंसेवकांची मदतही मिळत आहे. मतदान केंद्रावर आरोग्य कक्षाची सुविधा असून मतदारांची तपासणीही केली जात होती. ज्येष्ठ नागरिक चंदन मेहता वय (९१ ) वर्ष यांनी मतदान केंद्रावरील सुविधा आणि कर्मचारी यांच्या कामाबाबत समाधानी असल्याचं सांगितले.

20 Nov, 24 12:39 PM

१०३ वर्षांचे स्वातंत्र्यसैनिक जी. जी. पारिख यांनी केलं मतदान

१०३ वर्षांचे स्वातंत्र्यसैनिक जी. जी. पारिख यांनी मलबार हिल मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला.

20 Nov, 24 12:34 PM

मुंबई: २१ वर्षीय अंध प्रणव पालवे याने पहिल्यांदा केलं मतदान

मुंबई: मुलुंड म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रणव पालवे या २१ वर्षीय तरुणाने दोन्ही डोळ्यांनी दिसत नसताना, पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. 'मी मतदान केले, तुम्हीही करा' असे आवाहन त्याने केले.

20 Nov, 24 12:27 PM

गिरीश महाजन, त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेरमध्ये केलं मतदान

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.

20 Nov, 24 12:23 PM

अकोला पूर्व: दुपारपर्यंत १८ टक्के मतदान; कर्तव्य बजावण्यासाठी नागरिकांची होतेय गर्दी

अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला (पश्चिम), अकोला (पूर्व) व मुर्तिजापूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात दुपारी बारा वाजेपर्यंत एकूण १८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे.

20 Nov, 24 12:14 PM

वाशिम जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सुमारे १६.२२ टक्के मतदान

वाशिम जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सकाळी ११ वाजेपर्यंत १६.२२ टक्के इतकी दिसून आली.

20 Nov, 24 12:12 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे आणि कुटुंबातील इतर सदस्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शिवसेनेचे इतर प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.

20 Nov, 24 12:07 PM

सोलापूर: जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.६६ % मतदान

सोलापूर जिल्ह्यातील विविध ११ विधानसभा मतदारसंघात मिळून सकाळी सात ते ११ या चार तासांच्या कालावधीत १५.६६ % मतदान झाले आहे.

20 Nov, 24 12:04 PM

सांगली: जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात १८.५५ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान इस्लामपुरात

  • मिरज १७.७
  • सांगली १९.६
  • इस्लामपूर २२.२६
  • शिराळा २०.४९
  • पलूस-कडेगाव १७.३४
  • खानापूर १६.२५
  • तासगाव-कवठेमहांकाळ १८.६७
  • जत १६.५२

----------------------

  • एकूण १८.५५

20 Nov, 24 12:02 PM

नाशिकमध्ये दुसऱ्या सत्रात वाढला मतदानाचा टक्का

नाशिक: मतदानाच्या दुसऱ्या सत्रात सकाळी ९ नंतर मतदानाला वेग येण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.४२ टक्के इतके मतदान झाले होते. त्यातही दिंडोरी मतदारसंघात थेट २६ .४१ टक्के तर मालेगाव मध्य मतदारसंघात २२.७६ टक्के इतके मतदान झाले असून सर्वात कमी मतदान हे नाशिक पूर्व मतदारसंघात १३.९० टक्के इतकेच झाले.

  • नांदगाव- १६.४६ टक्के
  • मालेगाव मध्य- २२.७६ टक्के
  • मालेगाव बाह्य- १७.३७ टक्के
  • बागलाण- १८.२३ टक्के
  • कळवण- १८.२४ टक्के
  • चांदवड- २१.३० टक्के
  • येवला- २०.९२ टक्के
  • सिन्नर- २१.२०
  • निफाड- १७.६४ टक्के
  • दिंडोरी- २६.४१ टक्के
  • नाशिक पूर्व- १३.९० टक्के
  • नाशिक मध्य- १८.४२ टक्के
  • नाशिक पश्चिम- १६.३२ टक्के
  • देवळाली- १५.०१ टक्के
  • इगतपुरी- २०.४३ टक्के

20 Nov, 24 11:59 AM

पॅरालिसिसमुळे हात उचलता येत नव्हता, पण आज मतदानासाठी हात उठला...

पावणे तीन वर्षापूर्वी पॅरालिसिसमुळे डावा हात उचलता येत नाही. मात्र, मतदानासाठी हात उठल्याचे रश्मी रामराव कदम (७७) यांनी सांगितले. रश्मी कदम या निवृत्त सहायक पोलिस आयुक्त रामराव कदम यांच्या पत्नी आहे. मतदान करणे हे आपले कर्तव्य असून सर्वांनी मतदान करायला हवे, असेही रश्मी यांनी सांगितले. रश्मी यांनी कुटुंबासह मुलुंडच्या केंद्रात मतदान केले.

 

20 Nov, 24 11:53 AM

नाशिक: जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८२ टक्के मतदान

नाशिक: जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८२ टक्के मतदान झाले. शहरात सर्वाधिक मध्य मतदारसंघात १८.४२ टक्के मतदानाची नोंद झाली तर जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघात २६.४१ टक्के आणि मालेगाव मध्यमध्ये २२.७६ टक्के मतदान झाले.

20 Nov, 24 11:52 AM

गोंदिया जिल्ह्यात ७ ते ११ वाजेपर्यंत २३.३२ टक्के मतदान

गोंदिया जिल्ह्यात ७ ते ११ वाजेपर्यंत २३.३२ टक्के मतदान

  • अर्जुनी मोरगाव : २७.४ टक्के 
  • तिरोडा : १९.५४ टक्के 
  • गोंदिया : १८.४७ टक्के 
  • आमगाव : २९.०६ टक्के

20 Nov, 24 11:52 AM

राज्याला उज्ज्वल भवितव्याकडे घेऊन जाणारा दिवस, जास्तीत जास्त मतदान करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्रासाठी हा उत्सवाचा दिवस आहे. राज्याला उज्ज्वल भवितव्याकडे घेऊन जाणारा हा दिवस आहे. देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा हा उत्सव आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येणारं सरकार हे महायुतीचं बहुमताचं सरकार असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

20 Nov, 24 11:46 AM

रायगड: जिल्ह्यात ७ ते ११ या कालावधीत २०.४० टक्के मतदान

रायगड जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघ सकाळी ७ ते ११ या कालावधीत २०.४० टक्के मतदान झाले

20 Nov, 24 11:41 AM

वर्सोवा: महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती लव्हेकर यांनी केलं मतदान

वर्सोवा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती लव्हेकर यांनी आज सकाळी चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत मतदानाचा हक्क बजावला.

20 Nov, 24 11:33 AM

"माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदानाला निघण्यापूर्वी पत्नी लता शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी त्यांचे औक्षण केले. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून ते उमेदवार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासह मतदानासाठी आले. यावेळी, त्यांचे वडील म्हणाले की, माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार!

20 Nov, 24 11:29 AM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहपरिवार टाऊन हॉल येथे बजावला मतदानाचा हक्क

नागपुरचे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहपरिवार सबोत टाऊन हॉल महाल या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

20 Nov, 24 11:27 AM

सकाळच्या दोन तासात नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान

नाशिक : नाशिक शहरामध्ये सकाळी ७ पासून मतदान केंद्रांवर मतदानासाठी सुरुवात झाली. मात्र, प्रारंभीच्या दोन तासांच्या टप्प्यात मतदानाचा वेग कमी होता. शहरातील ४ मतदारसंघांमध्ये सकाळी सरासरी ६ टक्के मतदान झाले. त्यातही सकाळी नाशिक मध्य मतदारसंघात थोड्या अधिक प्रमाणात मतदानाचा वेग वाढला होता. त्यामुळे सकाळी ९ वाजेपर्यंत नाशिक मध्य मतदारसंघात ७.५५ टक्के, नाशिक पूर्व मतदारसंघात ६.४३ टक्के, नाशिक पश्चिममध्ये ६.२५ टक्के तर देवळाली मतदारसंघात ४.४२ टक्के इतकेच मतदान झाले होते. 

20 Nov, 24 11:15 AM

मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार

मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सकाळी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

20 Nov, 24 11:23 AM

तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले आणि गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा अधिकार

20 Nov, 24 11:22 AM

जळगाव जिल्ह्यातील पळासखेड (ता. भडगाव) येथे सकाळी १०.३० वाजेपर्यंत १८०० पैकी ३० जणांनी मतदानाचा हक्क बजावला. तर जामठी (ता. बोदवड) येथे ९० वर्षांच्या आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावून सर्वांचेच लक्ष वेधले.

20 Nov, 24 11:18 AM

तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले आणि गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा अधिकार

20 Nov, 24 11:18 AM

तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले आणि गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा अधिकार

20 Nov, 24 11:15 AM

दोन विद्यमान आमदारांनी केलं मतदान

तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले आणि गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा अधिकार

20 Nov, 24 10:55 AM

बाळासाहेब थोरात यांचे कुटुंबियांसमवेत मतदान

संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी कुटुंबियांसमवेत त्यांच्या जोर्वे गावात शिर्डी विधानसभा मतदारसंघात मतदान केले. आमदार थोरात यांच्या पत्नी कांचनताई थोरात, कन्या कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, कन्या सविता पारीख यांसह थोरात कुटुंबातील इतरही सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. 

20 Nov, 24 10:47 AM

देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

नागपूर : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

20 Nov, 24 10:44 AM

पुणे जिल्ह्यात सकाळी 9 पर्यंत 5.53 टक्के मतदान.

पुणे जिल्ह्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत 5.53 टक्केमतदान झाले आहे. पुणे शहरातील 8 विधानसभा मतदार संघातील सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान किती झालं त्याची टक्केवारी खालीलप्रमाणे :

- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ 7.44 टक्के मतदान.
- पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ 5.53 टक्के मतदान.
- हडपसर विधानसभा मतदारसंघ 4.45 टक्के मतदान.
- पर्वती विधानसभा मतदारसंघ 6.30 टक्के मतदान.
- खडकवासला विधानसभा मतदारसंघ 5.44 टक्के मतदान.
- कोथरूड विधानसभा मतदारसंघ 6.50 टक्के मतदान.
- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ 5.29 टक्के मतदान.
- वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ 6.37 टक्के मतदान.

20 Nov, 24 10:36 AM

राज ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

मुंबई : राज ठाकरेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी, नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी जनतेला केले.

20 Nov, 24 10:25 AM

राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार

राजेश टोपे यांच्यासह यांच्या पत्नी मनीषा टोपे यांनी पाथरवाला गावातील जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावला.

20 Nov, 24 10:16 AM

संगमनेरात पहिल्या दोन तासात २० हजार ६१ मतदारांनी केले मतदान

संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघात पहिल्या सत्रात सकाळी ७ ते ९ या दोन तासात ६.९४ टक्के इतके मतदान झाले. १४ हजार २४० पुरुषांनी तर ५ हजार ८२१ महिला अशा एकूण २० हजार ६१ मतदारांनी मतदान केले, अशी माहिती संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.

20 Nov, 24 10:15 AM

बुलढाणा जिल्ह्यात सकाळी ९ पर्यंत ६़ १६ टक्के मतदान

बुलढाणा : विधानसभेच्या सात मतदार संघातील २ हजार २८८ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदानास प्रारंभ झाला़ सकाळी ७ ते ९ या दरम्यान जिल्ह्यात ९. १६ टक्के मतदान झाले.

जिल्ह्यात मतदार संघ निहाय झालेले मतदान (सकाळी ७ ते ९ )
मलकापूर : ७.१२ टक्के 
बुलढाणा : ५. ९१ टक्के 
चिखली : ४.९१ टक्के 
सिंदखेडराजा : ६.४९ टक्के 
मेहकर : ६.५४ टक्के 
खामगाव : ६.९७ टक्के  
जळगाव जामाेद : ५.२३ टक्के

20 Nov, 24 10:07 AM

रायगडमध्ये ९ वाजेपर्यंत ७.५५ टक्के मतदान

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघात बुधवारी २० नोव्हेंबरला सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ७.५५ टक्के मतदान झाले आहे. सात ही विधानसभा मतदार संघात सकाळच्या वेळी मतदानाला सौम्य प्रतिसाद मिळाला आहे.

20 Nov, 24 10:06 AM

मुंबईतील दहा विधानसभा मतदारसंघात ९ वाजेपर्यंत ०६.२५ टक्के मतदान

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ०९.०० वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के मतदान झाले आहे.

20 Nov, 24 09:46 AM

राज्यात आतापर्यंत ६.६१ टक्के मतदान

राज्यात आतापर्यंत ६.६१ टक्के मतदान झालेले आहे. सर्वाधिक मतदान भांडुप आणि मुलुंड येथे झाले आहे. तर सर्वाधिक कमी मतदान वांद्रे येथे झाले आहे.
 

20 Nov, 24 09:35 AM

उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा अधिकार

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी अनंत इंग्लिश स्कूल येथे मतदान केले.

20 Nov, 24 09:33 AM

सकाळी ९ वाजेपर्यंत वाशिम जिल्ह्यात सरासरी ५.२७ टक्के मतदान

वाशिम : विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण ११०० मतदान केंद्रांत सरासरी ५.२७ टक्के मतदान झाले. गत पंचवार्षिक निवडणुकीत सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ५.३३ टक्के मतदान झाले होते.

20 Nov, 24 09:26 AM

शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी पत्नीसह मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी महाराष्ट्राच्या जनतेवर माझा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

20 Nov, 24 09:20 AM

धनंजय महाडिक यांनी बजावला मतदानाचा हक्क

कोल्हापूर : भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावला. महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात कल्याणकारी योजना आणल्या, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुती कार आणण्यासाठी राज्यभरातील लोक उत्सुक आहेत. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

20 Nov, 24 09:03 AM

बुलढाणा जिल्ह्यात घाटाखाली मतदानाला शांततेत सुरूवात

खामगाव (बुलढाणा) : घाटाखालील खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद मतदारसंघात मतदानाला शांततेत सुरूवात झाली. दरम्यान, जळगाव जामोद मतदारसंघातील मनसगावात मतदानयंत्रात बिघाड झाल्याने तेथे काही वेळ मतदान थांबले.
 

20 Nov, 24 08:56 AM

गोंदिया जिल्ह्यात मतदानाला सुरूवात

गोंदिया : जिल्ह्यात सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. थंडी असली तरी मतदान करण्यासाठी मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नक्षल प्रभावित भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजोली भरनोली येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. यात महिला मतदारांची संख्या अधिक होती. तर शहरी भागातील मतदान केंद्रावर सुद्धा गर्दी दिसून आली. नवमतदारांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजाविला.
 

20 Nov, 24 08:53 AM

अकोला, वाडेगावात ईव्हीएममध्ये बिघाड!

अकोला :जिल्ह्यातील पाचही  विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून, बाळापूर मतदार संघातील वाडेगाव, तसेच अकोला पश्चिम मतदारसंघातील बी. आर. स्कूल येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम यंत्रणेतील बिघाड तत्काळ दूर करून मतदान सुरळीत सुरू करण्यात आले आहे.

20 Nov, 24 08:44 AM

सचिन तेंडुलकरने बजावला मतदानाचा हक्क

सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांच्यासह वांद्रातील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

20 Nov, 24 08:41 AM

एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार बजावला आहे.

20 Nov, 24 08:38 AM

समीर भुजबळांसह शेफाली भुजबळांनी बजावला हक्क

समीर भुजबळ आणि शेफाली भुजबळ यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी छगन भुजबळ हे येवला तर समीर भुजबळ हे नांदगाव या विधानसभा मतदारसंघातून विजय होतील, असा विश्वास दोघांनी व्यक्त केला.

20 Nov, 24 08:35 AM

बाळासाहेब थोरातांनी कुटुंबीयांसोबत बजावला मतदानाचा अधिकार

बाळासाहेब थोरात यांनी कुटुंबीयांसोबत मतदानाचा अधिकार बजावला आहे. मुलगी जयश्री थोरात आणि पत्नीसोबत मतदान केले आहे.

20 Nov, 24 08:34 AM

सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा अधिकार

सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी, सर्व जनतेने बाहेर पडून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. 

20 Nov, 24 08:20 AM

अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर दाखल होत मतदानाचा हक्क बजावला.

20 Nov, 24 08:15 AM

नांदेडमध्ये ईव्हीएम बंद

नांदेड : रवी नगर भागात मतदान केंद्र क्रमांक 182 मध्ये एक तासापासून ईव्हीएम बंद असून मतदार प्रतीक्षेत आहेत. याठिकाणी दोन मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
 

20 Nov, 24 08:07 AM

प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला

जळगाव जामोद : विधानसभा मतदारसंघाचे जन स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर पहाटे ५ वाजता शेगाव- मनसगाव रोडवर कालखेड फाट्याजवळ अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलवले.

20 Nov, 24 07:57 AM

कोल्हापुरात १२१ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात चुरशीच्या लढती असून, चार मतदारसंघांतील बंडखोरीमुळे तेथे आघाडी व युतीअंतर्गत संघर्ष वाढला आहे. या हा मतदारसंघात १२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 
 

20 Nov, 24 07:53 AM

मोहन भागवत यांनी केले मतदान 

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाऊजी दफ्तरी शाळेमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

20 Nov, 24 07:48 AM

भूषण गगराणी यांनी बजावला मतदानाचा हक्क 

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

20 Nov, 24 07:44 AM

पनवेलमध्ये मतदानाला सुरुवात

पनवेलमध्ये मतदानाला सुरुवात झाली असून अनेक ज्येष्ठ नागरिक व तरुण आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहेत.

20 Nov, 24 07:42 AM

मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव

राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी मतदान करायला जाताना मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करण्यासाठी, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

20 Nov, 24 07:30 AM

सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ

सोलापूर : सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ झाला असून बूथ प्रमुख, नेतेमंडळी व पक्षाच्या प्रमुखांसोबत कार्यकर्त्यांचे मतदान सुरू आहे.

20 Nov, 24 07:29 AM

मतदानाची वेळ कधीपर्यंत? 

आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे. मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्रं ग्राह्य धरली, जातील असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.