22 Nov, 24 11:28 PM
महायुतीला १६० ते १६५ जागा मिळतील, कैलाश विजयवर्गीय यांचा दावा
मध्य प्रदेश सरकारचे मंत्री कैलाश विजयवर्गीय म्हणाले, मतदानाच्या दिवशी महाराष्ट्रात १६०-१६५ जागा मिळतील असे सांगितले होते. पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव आहे. युतीच्या लोकांचाही आपापल्या भागात प्रभाव आहे. त्यामुळे तेथे भाजपाचे सरकार येणार आहे. झारखंडमध्येही शिवराज सिंह चौहान आणि हिमंता बिस्वा सरमाज यांनी मेहनत घेतली आहे, तिथेही भाजपचे सरकार येणार आहे.
22 Nov, 24 11:17 PM
लाडकी बहीण योजनेचा मतदानावर परिणाम
यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का आणि महिला मतदारांची वाढलेली संख्या हा परिणाम लाडकी बहीण योजनेचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तशी आकडेवारीही काही ठिकाणची आलेली आहे. परंतु, या वाढलेल्या मतदानाचा लाभ महायुतीला होणार की महाविकास आघाडीला होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अवघ्या काही तासांनी मतमोजणी सुरू होणार असून, महिलांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, हे समजणार आहे.
22 Nov, 24 11:14 PM
मतमोजणी केंद्र इमारतीच्या १०० मीटर परिसरात नागरिकांवर राहणार बंदी
विधानसभा निवडणूकीची मतमोजणी शनिवारी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील १४ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणी केंद्र इमारतीच्या १०० मीटर परिसरात नागरिकांना येण्याला प्रतिबंध घातले आहेत. याबाबतचा मनाई आदेश विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्त मीना मकवाना यांनी शुक्रवारी काढले आहेत.
22 Nov, 24 11:13 PM
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
22 Nov, 24 11:12 PM
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला
22 Nov, 24 11:11 PM
विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमिवर पोलीस प्रशासनाचे मनाई आदेश जारी
कोल्हापुरात 23 नोव्हेंबरला 10 विधानसभा मतदारसंघांत होत आहे मतमोजणी. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये मनाई आदेश. विजयी उमेदवारांची मिरवणुक किंवा रॅली काढण्यात मनाई. सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळण्यास मनाई. विजयी उमेदवारासाठी फटाके लावणे किंवा फोडण्यासही मनाई. कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची माहिती.
22 Nov, 24 11:10 PM
संभाजीनगरमध्ये विजयी मिरवणुकीला परवाणगी नाही; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
निवडणूक निर्णय अधिकारी तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राची पाहणी केली. सर्व तयारी झालेली आहे, मतपेट्या सीलबंद करुन ठेवल्या आहेत, स्ट्रॉंग रुमला डबल लॉक लावण्यात आले आहे. मोठा पोलीस बंदोबस्त स्ट्रॉंग रुमच्या बाहेर तैनात करण्यात आला आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला पोस्टल बॅलेटपेपरची मतमोजणी होईल त्यानंतर ईव्हीएमवरील मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर मायक्रो निरीक्षक असतील जे केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत. कायदा व सुव्यवस्थेसाठी विजयी मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे तशा सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती देत मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले आहे.
22 Nov, 24 11:08 PM
सर्वाधिक मतदान कोणत्या मतदारसंघात झाले आणि सर्वांत नीचांकी कुठे झाले?
288 मतदारसंघाचा मतदानाचा ताळेबंद पाहता, यावर्षी सर्वांधित मतदान हे करवीर मतदारसंघात म्हणजे 84.96 टक्के मतदान झाले तर सर्वांधिक कमी मतदान हे कुलाबा या मतदारसंघात झाले. कुलाबा या मतदारसंघात 44.44 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
22 Nov, 24 11:08 PM
राज्यातील किती कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला?
महाराष्ट्र राज्याच्या 288 मतदारसंघाकरिता राज्यात एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत. यात 5 कोटी 22 हजार 739 पुरूष मतदार, 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला मतदार तर 6 हजार 101 इतर मतदार म्हणून नोंदीत आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान केलेले 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदार आहेत. यात प्रत्यक्ष मतदानात 3 कोटी 34 लाख 37 हजार 57 पुरूष, 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिला तर 1 हजार 820 इतर मतदारांनी सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजावला.
22 Nov, 24 11:07 PM
कोणत्या मतदारसंघात महिलांचा सर्वाधिक सहभाग दिसून आला?
यावर्षीच्या निवडणुकीत मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता मतदार यादीतील नोंदीत महिलांमध्ये करवीर, चिमूर, ब्रम्हपूरी, नेवासा, कागल, आरमोरी, नवापूर, शाहूवाडी, कुडाळ तसेच पळुस-कडेगाव या मतदारसंघांत महिलांचा सहभाग सर्वांधिक दिसून येतो.
22 Nov, 24 11:07 PM
३० वर्षांत महाराष्ट्रात विक्रमी मतदानाची नोंद; टक्का वाढला
महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आदर्श आचारसंहिता लागू होऊन २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मतदान झाले. या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात मागील सुमारे ३० वर्षामध्ये या वर्षी सर्वांधिक ६६.०५ टक्के मतदान झाले. मागील पाच वर्षाच्या तुलनेत राज्याच्या मतदान टक्केवारीत सुमारे ५ टक्के वाढ झाली.