20 Nov, 24 12:52 AM
संजय निरुपम यांच्या कारमध्ये सापडले पैसे? दिंडोशी पोलिसांनी कार घेतली ताब्यात
दिंडोशी मतदार संघ वार्ड क्रमांक 41 संतोष नगर येथील एका कारमध्ये पोलिसांना पैसे सापडले असून, हे पैसे महायुतीचे उमेदवार संजय निरुपम यांचे असल्याचा दावा केला जात आहे. दिंडोशी पोलीस स्टेशनने कार ताब्यात घेतली आहे. तर केवळ राजकीय दबावापोटी हे प्रकरण दाबण्याचा पोलिसांचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
19 Nov, 24 11:26 PM
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान?
अवघ्या काही तासांनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. राज्यातील संपूर्ण प्रशासन यंत्रणा निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान होणार आहे. राज्यभरात सकाळी ७ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी असणार आहे.
19 Nov, 24 10:46 PM
मुंबई: धोबी तलाव परिसरात भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचे नाव व फोटो असलेल्या बूथ क्रमांक आणि मतदान केंद्राचे नाव इत्यादी स्लिप्स वाटप करताना दोन जण आढळून आले आहेत. एमसीसीच्या उल्लंघनासाठी आझाद मैदानात एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पैसे सापडले नाहीत.
19 Nov, 24 10:21 PM
मनसेची शाखा पोलिसांनी केली बंद
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील कल्याण पूर्वेतील आडीवली ढोकळी परिसरातील मनसेची शाखा पोलिसांनी बंद केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. हा प्रकार मनसेचे उमेदवार आ. राजू पाटील यांना समजताच त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधा-यांच्या दबावाखाली पोलिसांनी हे कृत्य केले असून आम्ही देखील उदया आमची फौज उतरवू, कायदा सुव्यवस्था राखण्याचा ठेका फक्त आम्ही घेतलेला नाही. पोलिसांनी हा विभाग संवेेदनशील म्हणून जाहीर करावा अन्यथा आम्ही आहोतच असा इशारा दिला.
19 Nov, 24 09:48 PM
पराभव दिसून लागल्यानेच महाविकासआघाडीकडून विनोद तावडेंवर आरोप व हल्ला
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस यांच्या बचावासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर आले आहेत. महाविकास आघाडीला पराभव स्पष्टपणे दिसत असल्याने खोटे आरोप करत कव्हर फायरिंगचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी लावला. जेव्हा निवडणुकीत पराभव दिसू लागतो त्यावेळी जे प्रकार होतात, त्यातीलच हा प्रकार आहे. विनोद तावडे केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याजवळ कुठलाही पैसा किंवा आक्षेपार्ह गोष्ट आढळलेली नाही. त्यांनी कुठलेही पैसे वाटलेले नाहीत. उलट त्यांच्यावरच हल्ला झाला आहे. नालासोपारा येथील उमेदवार राजन नाईक यांच्यावरदेखील हल्ला झाला. महाविकास आघाडीच्या यंत्रणेनी पराभव पाहता कव्हर फायरिंग केले आहे, असा आरोप फडणवीस यांनी लावला.
19 Nov, 24 09:47 PM
अनिल देशमुखांवरील हल्ला ही सलिम-जावेदच्या चित्रपटांप्रमाणे रचलेली कथा: देवेंद्र फडणवीस
अनिल देशमुख यांनी सातत्याने सलिम जावेद यांच्या कथांप्रमाणे तथ्यहिन बाबींवर प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. अगोदर त्यांनी अशाच प्रकारे पुस्तक प्रकाशित केले. त्या पुस्तकाची पोलखोल झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी जी पत्रपरिषद घेतली त्यातून अनेक बाबी स्पष्ट होत आहेत. साडेसात किलो दगड मारल्यावरदेखील काच फुटली नाही, बोनेटला स्क्रॅच का आली नाही. एक दगड मागच्या काचेतून आला तर तो अनिल देशमुखांच्या कपाळावर समोरून कसा लागला. अशा प्रकारे केवळ रजनीकांतच्या चित्रपटात दगड फिरू शकतो. देशमुख यांच्याकडून पराभव दिसून लागल्याने भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनीदेखील त्याचे समर्थन केले ही दुर्दैवी बाब आहे. पोलीस सखोल चौकशी करतील व नेमके तथ्य समोर येईल, असे फडणवीस म्हणाले.
19 Nov, 24 08:49 PM
कल्याणमध्ये निवडणुकीसाठी नियु्क्त कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य केले वितरित
19 Nov, 24 08:49 PM
विष्णु भंगाळे यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश
19 Nov, 24 08:49 PM
सर्वांनी निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजवावा; पोलीस आयुक्त प्रविण पवार यांचे जनतेला आवाहन
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने संभाजीनगर उद्या दिनांक २० नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा निवडणुकीकरता छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये मतदान होणार आहे. मी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे कोणत्याही अफवा तसेच बळी न पडता शांततेच्या मार्गाने निर्भीडपणे स्वतःच मत, मतदानाचा हक्क हा त्यांनी बजावावा आणि लोकशाही सक्षम करण्याकरता आपला प्रतिसाद नोंदवावा. मतदान हा आपल्या सर्वांचा अधिकार नसून ते आपले कर्तव्य देखील आहे असे आवाहन पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी जनतेला केले आहे. तसेच मतदानाच्या अनुषंगाने सविस्तर नियोजन झाले आहे. आमच्या मतदान केंद्रावरचे अधिकारी आणि सर्व कर्मचारी, होमगार्डचे सविस्तर बुकिंग झाले आहे. मतदान केंद्रावर योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला आहे अशी माहिती देखील पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी दिली आहे.
19 Nov, 24 08:48 PM
येवला विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, येवला लासलगाव मतदारसंघात 328 मतदान केंद्र
येवला लासलगाव विधानसभा निवडणुकीसाठी उद्या प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी येवला प्रशासनाची लगबग सुरू आहे. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील 328 मतदान केंद्रावर साहित्य पोहोचविण्याकरता प्रशासनाचे काम युद्धपातळी सुरू असून ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट व इतर साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होणार आहेत. 15 पोलीस अधिकारी,270 पोलीस कर्मचारी, 250 गृहरक्षक दलाचे कर्मचारी, मतदान प्रक्रिया प्रसंगी बंदोबस्ताला असणार आहे.
19 Nov, 24 08:48 PM
नवी मुंबईत पोलिसांचा मतदान केंद्रावर तगडा बंदोबस्त
नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर मतदार संघाच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नवी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. यात शाळेतील मतदान केंद्र,सोसायटी मतदार केंद्र,आणि इतर ठिकाणी पोलीस उपलब्ध राहणार आहे. यावेळी गैरकृत्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल,असा इशारा पोलिसांनी दिला असून, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावावा आणि आपले कर्तव्य पार पाडावे असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. तर यावेळी नवी मुंबई पोलिसांनी एक ॲप प्रसिद्ध केले असून,ज्याद्वारे तुम्हाला तुमचे केंद्र आणि असलेली गर्दीची माहिती उपलब्ध होणार आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली आहे.
19 Nov, 24 07:44 PM
त्या हॉटेलमध्ये महिलांना लपवून ठेवलं होतं; क्षितीज ठाकूरांचा गंभीर आरोप
विरारच्या हॉटेलमध्ये काही महिला लपून बसल्या होत्या असा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. महिला तोंड लपवून बसल्या होत्या. त्यांना विचारले तर त्यांनी नाव सांगितले नाही, असेही क्षितीज ठाकूर यांनी सांगितले.
19 Nov, 24 05:33 PM
आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडिया पोस्टकरून नियमभंग केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या विरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी मुंबई भाजप सचिव प्रतिक कर्पे यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे.
19 Nov, 24 05:14 PM
बविआच्या उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश
डहाणूमध्ये हितेंद्र ठाकूर यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. बहुजन विकास आघाडीचे डहाणूमधील अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी यांनी मतदानाच्या आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
19 Nov, 24 04:37 PM
भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई
निवडणूक आयोगाने आता लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत विनोद तावडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तावडे यांच्यासह भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
19 Nov, 24 03:24 PM
'विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे': नाना पटोलेंची मागणी
विरार येथे एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करत बविआ कार्यकर्त्यांनी राडा घातला. मागील ३ तासांपासून विनोद तावडे त्या हॉटेलमध्ये अडकून होते. दरम्यान, आता यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपा नेते विनोद तावडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
19 Nov, 24 03:09 PM
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. विरार येथे एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करत बविआ कार्यकर्त्यांनी राडा घातला.
19 Nov, 24 02:50 PM
देशमुख हल्ला प्रकरणी ४ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ४ अज्ञातांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काटोलचे उपविभागीय पोलिस अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. प्रादेशिक न्यायवैद्यक पथक घटनास्थळी जाऊन तांत्रिक पुरावे गोळा करत आहे. लोकांनी अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा नागपूर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला.
19 Nov, 24 01:35 PM
देशमुख हल्ला प्रकरणी ४ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ४ अज्ञातांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काटोलचे उपविभागीय पोलिस अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. प्रादेशिक न्यायवैद्यक पथक घटनास्थळी जाऊन तांत्रिक पुरावे गोळा करत आहे. लोकांनी अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा नागपूर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला.
19 Nov, 24 11:13 AM
युगेंद्रच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम
राज्यातील बारामती मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अजित पवारांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले आहे. दरम्यान, सोमवारी रात्री अजित पवार यांचे बंधू आणि युगेंद्र यांचे वडील श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्सच्या बारामती शोरूम मध्ये रात्री पोलिसांनी मोठे सर्च ॲापरेशन केल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
19 Nov, 24 09:21 AM
अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल
नागपूर : काटोलमध्ये ष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनिल देशमुख यांच्यावर मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
19 Nov, 24 09:52 AM
माजी गृहमंत्र्यांना मारण्याचा प्रयत्न – संजय राऊत
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्याड खुनी हल्ला झाला. हा राजकीय हल्ला आहे. मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या होते आणि नागपुरात माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न होतो. फडणवीस मिंधे यांच्या काळात हे घडतंय, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले.
19 Nov, 24 10:49 AM
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक केल्याची घटना ताजी असतानाच सोलापूरमध्ये शरद पवार गटाच्या माजी आमदार रमेश कदम यांना धमकी देण्यात आली आहे. रमेश कदम यांचे अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न सुरू असल्याची ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. यासंदर्भात रमेश कदम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
19 Nov, 24 10:46 AM
कळमनुरीत वंचितच्या उमेदवारावर हल्ला
हिंगोली- कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के हल्लाप्रकरणी कळमनुरी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच अज्ञातांविरोधात कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा शिवारात रात्री 12:30 ते 01च्या हल्ला करण्यात आला.
19 Nov, 24 09:21 AM
राज्यात एकूण मतदार किती?
राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ एकूण मतदार असून यात ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष मतदार, तर ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. तर ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत. राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे.
19 Nov, 24 08:55 AM
राज्यात कोणाच्या किती सभा?
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारात भाजप आणि काँग्रेसचे देशपातळीवरील प्रमुख नेते, सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री प्रचारात उतरले होते. तर स्थानिक पातळीवरील पक्षांच्या राज्यातील नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यामुळे राज्यात कोणाच्या किती सभा झाल्या? हे पाहा..
नरेंद्र मोदी १०
अमित शहा १६
नितीन गडकरी ७२
देवेंद्र फडणवीस ६४
एकनाथ शिंदे ७५
अजित पवार ५७
मल्लिकार्जुन खर्गे ९
राहुल गांधी ७
प्रियांका गांधी ३
शरद पवार ६३
उद्धव ठाकरे ६०
19 Nov, 24 08:53 AM
मतदानाची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत
बुधवारी म्हणजेच उद्या (दि.२०) मतदानाची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असून संध्याकाळी ६ वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना टोकन देऊन मतदान करू देण्यात येणार आहे.
19 Nov, 24 08:52 AM
राज्यात प्रचारतोफा थंडावल्या
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी मागील २० दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या. आता बुधवारी मतांची तोफ मतदारांच्या हाती येणार असून, ती कोणासाठी चालते आणि कोणाविरुद्ध चालते हे २३ तारखेला म्हणजेच शनिवारी निकालाच्या दिवशी कळणार आहे.
18 Nov, 24 11:38 PM
येवल्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूटमार्च
सर्वत्र निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून मतदानाच्या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांकडून शहरातील मुख्य रस्त्यावरून रूट मार्च काढण्यात आला. यावेळी नागरिकांनी निर्भीडपणे मतदान करावे असे आवाहन देखील यावेळी पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी केले. या रूट मार्च प्रसंगी पोलीस अधिकाऱ्यांसह गुजरात राज्यातील होमगार्ड देखील उपस्थित होते.
18 Nov, 24 10:30 PM
आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर हल्ला
धामणगाव मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांची बहिणा अर्चना रोठे (अडसड) यांच्या वाहनावर सातेफळनजीक हल्ला. त्या जखमी झाल्या आहे.
18 Nov, 24 10:13 PM
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18 Nov, 24 09:14 PM
प्रचारादरम्यान वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, रुग्णालयात उपचारासाठी दाखल
नरखेड येथील सांगता सभा आटपुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तीने त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराचा करिता काटोलच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे.
18 Nov, 24 08:58 PM
माझा प्रचार माझे कार्यकर्ते करत आहेत त्यामुळे ही जागा बहुमतांनी निवडून येईल: नाना पटोले
भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शेकडो बाईक स्वार सहभागी झाले होते. साकोली विधानसभा क्षेत्रातील माझा निवडणूकीचा प्रचार माझे कार्यकर्ते करत असून ही सीट बहुमताने निवडून येईल यात काही शंका नाही. महाराष्ट्र मधील चित्र महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे. महाराष्ट्र द्रोही व भ्रष्टाचारी सरकार शेतकरी विरोधी आहे. तरुण, महिला, गरीब लोकं या सरकारच्या विरोधात आहे. या सरकारला सत्तेच्या बाहेर बसविण्याची आता लोकांनी मानसिकता तयार केली आहे अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
18 Nov, 24 08:58 PM
जरांगे पाटील यांचा आशीर्वाद मला मिळाला आहे: अतुल म्हात्रे
पेण विधानसभेतून पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शेकापचे अतुल म्हात्रे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. अतुल म्हात्रे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांचा आशीर्वाद माझ्या मागे असल्याचे सांगितले आहे.
18 Nov, 24 08:57 PM
निवडणूक अधिकाऱ्यांकडून एक कोटी 98 लाख रुपयांची रक्कम हस्तगत
नाशिकमध्ये एका नामांकित हॉटेलमध्ये मोठी रक्कम आढळून आली होती या संदर्भात निवडणूक आयोगाच्या पथकाने छापा टाकून तपास केला असता एकूण रक्कम ही 1 कोटी 98 लाख इतकी असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली तर ही रक्कम जयंत साठे यांच्याकडून हस्तगत केली असून या संदर्भात पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनीता कुमावत यांनी दिली.
18 Nov, 24 08:57 PM
अपक्ष उमेदवार राजू तिमांडे यांच्या प्रचारार्थ हिंगणघाट येथे गौतमी पाटीलचा रोड शो
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदार संघातील माजी आमदार राजू तिमांडे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राजू तिमांडे यांच्या प्रचारार्थ गौतमी पाटील यांचा रोड शो करण्यात आला होता.
18 Nov, 24 08:56 PM
भव्य प्रचार रॅलीने महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचाराची सांगता
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रचाराचा समारोप प्रचंड गर्दीच्या रॅलीने मुंब्र्यात केला. या शेवटच्या भव्य प्रचार रॅलीत हजारो नागरिक, महिला आणि अबालवृद्ध सहभागी झाले होते. ही रॅली ज्या ज्या रस्त्यावरून जात होती. त्या भागात नागरिकांकडून डॉ. आव्हाड यांचे जोरदार स्वागत केले जात होते. अनेक ठिकाणी नागरिकांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुष्पवृष्टी केली. ठिकठिकाणी डॉ. जितेंद्र आव्हाड हे माईक हातात घेऊन आपले निवडणूक चिन्ह सांगत होते.
18 Nov, 24 08:56 PM
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जवळपास दोन दिवसात 7 लाखाचा दारू साठा जप्त
छत्रपती संभाजीनगर शहरातील झाल्टा फाटा व सिडको एन 7 मधील आंबेडकर नगर मधून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जवळपास दोन दिवसात 7 लाखाचे मद्य जप्त केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला आंबेडकर नगर मध्ये अवैद्य पद्धतीने मद्य विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून त्या ठिकाणी विभागाने कारवाई करून जवळपास दोन दिवसात 7 लाखाचे मद्य जप्त केले आहे.
18 Nov, 24 08:56 PM
20 नोव्हेंबर रोजी होणार्या मतदानासाठी प्रशासन सज्ज
नांदेड मध्ये 25 वर्षानंतर लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र होत असून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानातून प्रतिसाद देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारी सर्व व्यवस्था करण्यात आली असून प्रशासन या निवडणुकी साठी सज्ज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
18 Nov, 24 08:49 PM
प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही धनंजय मुंडे स्वतः ऐवजी अन्य उमेदवारांच्या प्रचारात
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला सुरुवात केल्याननंतर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बहुतांश उमेदवार हे स्वतःच्या मतदारसंघातच सभा वगैरे आयोजित करून प्रचाराची सांगता करतात. मात्र कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी मात्र आज शेवटच्या दिवशी स्वतःच्या परळी मतदारसंघात थांबण्याऐवजी बाहेरील तीन उमेदवारांसाठी सभा घेतल्या. वेगवेगळ्या निवडणुकीत प्रमुख पक्षांचे नेते राज्यभर प्रचार करीत असले तरी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मात्र स्वतःच्या मतदार संघात थांबण्याकडे त्यांचा कल असतो, मात्र या गोष्टीला फाटा देत धनंजय मुंडे यांनी शेवटच्या दिवशी ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ देणे पसंद केले.
18 Nov, 24 07:36 PM
बारामतीकरांचा विकास करण्याची क्षमता युगेंद्र यांच्यात आहे, त्यांना संधी द्या; शरद पवार यांचं आवाहन
आधी इथल्या वडिलधाऱ्यांनी मला आमदार बनवले , मी काम केले . त्यानंतर अजित पवारांना निवडून दिले. अजित पवारांना संधी दिली. युगेंद्र उच्च विद्याभुषित आहे, परदेशात शिक्षण घेतले आहे. त्यांच्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याची धमक आहे. ठिकठिकाणी फिरुन माहिती घेत आहेत. ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आता पुढच्या पिढीची गरज आहे. बारामतीमध्ये ते समाजकार्य करतात. बारामतीकरांचा विकास करण्याची क्षमता युगेंद्र यांच्यात आहे. त्यामुळे त्यांना संधी द्या. युगेंद्रला निवडून द्या, असे आवाहन शरद पवार यांनी बारामतीकरांना केले.
18 Nov, 24 06:19 PM
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
जेपी नड्डा यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, 'बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, मी आपला पक्ष बंद करेल, पण काँग्रेसशी तडजोड करणार नाही. पण आज उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे नेले. सत्तेसाठी तुमच्या वडिलांच्या विचारांकडे दुर्लक्ष करून तुम्ही काँग्रेसशी ज्या प्रकारे तडजोड केली आहे, त्यासाठी महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही.'
18 Nov, 24 04:39 PM
सुप्रिया सुळेंच्या बॅगांची तपासणी
मांजर, कापूरहोळ मध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून खा. सुप्रिया सुळेंच्या बॅगांची तपासणी
18 Nov, 24 03:43 PM
निवडणूक आयोगाच्या पथकाने छापा टाकलेल्या रक्कमेशी माझा कोणताही संबंध नाही -सदानंद नवले
नाशिक शहरातील नामांकित हॉटेलमध्ये आज सकाळी निवडणूक आयोगाच्या पथकाने छापा टाकला या छाप्यामध्ये कोट्यावधी रुपयांची रक्कम मिळून आल्याची माहिती मिळाली होती. यावेळी शिंदे गटाचे पदाधिकारी सदानंद नवले यांची गाडी आणि नाव आल्याने सदानंद नवले यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे.
18 Nov, 24 03:41 PM
आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा.
मोदीजींच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये काम करण्याची नवीन पद्धत आपण पाहिली. आज आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा.
18 Nov, 24 02:00 PM
मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, निकाल फिरणार?
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) पक्षाने या मतदारसंघात स्वत:चा उमेदवार असूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. येथे राष्ट्रवादी अजितदादा गटातून मनोज देवानंद कायंदे यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेने शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी दिली आहे. पण आज शेवटच्या क्षणी अजितदादा गटाने पत्रक जारी करून आपल्या उमेदवाराऐवजी खेडेकर यांना पाठिंबा दिला आहे. सविस्तर बातमी येथे वाचा
18 Nov, 24 12:13 PM
"महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक आहे. १-२ अब्जाधीश मंडळी विरूद्ध गरीब अशी ही निवडणूक आहे. अब्जाधीशांना मुंबईची जमीन त्यांच्या हातात जावी अशी इच्छा आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, गरीब, बेरोजगार, तरुणांना मदतीची गरज आहे. म्हणून राज्यात काँग्रेस महाविकास आघाडीला विजयी करा," असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
18 Nov, 24 12:05 PM
राहुल गांधींची मुंबईत पत्रकार परिषद, जातनिहाय जनगणनेचा पुनरुच्चार
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, "महाराष्ट्रातील शेतकरी, गरीब, बेरोजगार, तरुणांना मदतीची गरज आहे. काँग्रेस मविआचे सरकार आले तर प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात ३ हजार रुपये जमा करू, महिलांसाठी बस प्रवास मोफत असेल, शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, सोयाबीनला प्रति क्विंटल ७ हजार रुपये भाव दिला जाईल आणि तेलंगणा, कर्नाटकात जशी जातनिहाय जनगणना होत आहे, तशीच महाराष्ट्रातही केली जाईल"
18 Nov, 24 11:25 AM
रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
'यापुढे मी निवडणूक न लढाविण्याचा निर्णय घेतला आहे. तब्येत ठीक नसते, पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल.आपण सर्वांनी रोहिणी खडसेंचा निवडून द्यावे',अशी भावनिक साद एकनाथ खडसे यांनी घातली आहे.
18 Nov, 24 10:19 AM
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन शेख (५०, रा. शेरा चौक, तांबापुरा परिसर, जळगाव) यांच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला. यावेळी तीन राउंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेत शेख यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या असून सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. ही घटना सोमवारी पहाटे घडली. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.
18 Nov, 24 08:23 AM
जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार
कोल्हापुरातील करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्तीचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर प्रचार आटोपून परतत असताना जीवघेणा हल्ला झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी संताजी घोडपडे यांचं वाहन अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात संताजी घोरपडे हे जखमी झाले आहेत.
17 Nov, 24 10:02 PM
अमरावतीच्या दर्यापूर मधील खल्लार गावात भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या सभेत झालेल्या राड्यानंतर दर्यापूरात महारॅलीचे आयोजन, रॅली ला प्रचंड प्रतिसाद
17 Nov, 24 09:29 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभेला येणे शक्य नसल्याने फोनद्वारे मतदारांशी संवाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभेला येणे शक्य नसल्याने फोनद्वारे मतदारांशी संवाद. नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदे यांना फोन लावला.
17 Nov, 24 08:57 PM
भाजप पदाधिकारी म्हणे, महाविकास आघाडीला विजयी करा...
महायुतीच्या भांडुप येथील गाढव नाका येथे सुरू असलेल्या प्रचार सभेत भाजपचे भांडुप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहीतुले यांना भाषणात पक्षाचा काहीसा विसर पडल्याचे दिसून आले. भाषणाच्या अखेरीस त्यांनी महाविकास आघाडीला विजयी करा असे तीन वेळा म्हणत भाषण संपविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. "अहो, साहेब तुम्ही युतीत...आघाडीत नाही" अशीही कुजबुज ऐकू आली. त्यानंतर चूक लक्षात आल्यानंतर निवेदकाद्वारे त्यांनी केलेल्या विधानाची दुरुस्ती करत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. दुसऱ्या एका प्रवक्त्याने थेट अशोक कदम यांना विजयी करण्याचे आवाहन केल्याने त्यांनाही वेळीच खाली बसविण्याची वेळ आली.
17 Nov, 24 08:28 PM
देवळी पुलगाव मतदार संघातून तिहेरी लढत
वर्धा जिल्ह्यातील देवळी पुलगाव मतदारसंघात तिहेरी लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. एक घर, एक नोकरी व देवळी पुलगाव मतदार संघाचा विकास करेल, अनेक विकास कामे प्रलंबित आहे, काही कामे अर्धवट करण्यात आली आहेत ती पूर्ण करणार अशी प्रतिक्रिया बहुजन समाज पार्टीचे उमेदवार उमेश म्हैस्कर यांनी दिली आहे. महायुतीचे उमेदवार राजेश बकाने, काँग्रेस पक्षाचे रणजीत कांबळे व बहुजन समाज पार्टीचे उमेश मैस्कर अशी तिहेरी लढत देवळी पुलगाव मतदार संघात होणार आहे.
17 Nov, 24 07:52 PM
उल्हासनगरात कलानी समर्थकांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी
निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात कलानी यांच्या दोघा समर्थकाच्या घरी आयकर विभागाच्या रविवारी धाडी टाकण्यात आल्याची कबुली कमलेश निकम यांनी दिली. तसेच कमलेश निकम यांच्यासह ३९ जणावर सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत निवडणूक काळात पोलिसांनी तडीपारीची नोटीसा बजाविली आहे. या कारवाईने कलानी समर्थकाकडून नाराजी व्यक्त होत आहे.
17 Nov, 24 07:37 PM
निवडणूक यंत्रणा सतर्क; उमेदवारांच्या वाहनांची तपासणी, पोलिसांकडून नाकाबंदी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून गाड्याची कसून तपासणी केली जात आहे. सावंतवाडीत उमेदवाराच्या गाड्या तपासल्या जात असून अपक्ष उमेदवार विशाल परब यांची गेल्या चार दिवसात तीन वेळा कार्यालय व गाडी तपासली गेली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून सहा उमेदवार उभे आहेत यातील दोन उमेदवार पक्षीय आहेत तर इतर उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.आता शेवटचे दोन दिवस राहिले असून पोलिस ही चांगलेच सर्तक झाले असून निवडणूक आयोगाकडून तर प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत असून.यातून उमेदवार ही सुटले नाहीत.
17 Nov, 24 07:23 PM
मविआचे उमेदवार दयानंद चोरगे यांची माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या उपस्थितीत भव्य बाईक रॅली
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. भिवंडी पश्चिमचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार दयानंद चोरगे यांच्या प्रचारासाठी भिवंडीत शहरात धोबी तलाम क्रिकेट ग्राउंड ते धामणकर नाका,वंजारपट्टी नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक व बाजारपेठ या भागातून भव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली होती, यावेळी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची उपस्थिती होती. या भव्य रोड शो मध्ये हजारो काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने बाईक रॅली सहभागी झाले होते.
17 Nov, 24 07:22 PM
खोट्या निरीटिव्हमुळे डॉ सुभाष भामरे यांचा पराभव: एकनाथ शिंदे
साखरी विधानसभा निवडणूक मतदार संघातील शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंजुळा गावित यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साखळी दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी मोठ्या मताधिक्याने मंजुळा गावित यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. लोकसभेच्या वेळी विरोधकांनी संविधान बदलणार असा खोटा निरीटिव्ह पसरवला होता, आणि या खोट्या निरीटिव्ह मुळेच पाच मतदार संघात आघाडीवर असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा एका मतदार संघामुळे पराभव झाला. त्यामुळे याचा बदला आता आपल्याला ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
17 Nov, 24 07:22 PM
गजानन काळेंनी भरवली घटक चाचणी परीक्षा; संदीप नाईक, मंदा म्हात्रे यांना पाठवल्या प्रश्न पत्रिका
नवी मुंबईतील बेलापूर मतदार संघाचे उमेदवार गजानन काळे यांनी मतदार संघाच्या प्रश्नांवर घटक चाचणी परीक्षा भरवली आहे. या चाचणी परिक्षेची प्रश्न पत्रिका महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक आणि महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांना पाठवली आहे. जर त्यांनी या 50 गुणांच्या प्रश्न पत्रिकेचे उत्तर द्यावे असे आवाहन गजानन काळे यांनी केले आहे.
17 Nov, 24 06:44 PM
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशातच, राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सूरू आहे. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण मुख्यमंत्री महायुतीचाच होणार,' असं एकनाथ शिंदे म्हणाले.
17 Nov, 24 05:44 PM
नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधींना दाखवले झेंडे
नागपूर- प्रियंका गांधी यांचा आज नागपूरमध्ये रोज शो होत आहे. या दरम्यान बडकस चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधींना झेंडे दाखवले. यानंतर त्यांनी झेंडं दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आणि निवडून मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार येणार असल्याचे म्हटले. या ठिकाणी काँग्रेस-भाजपची रॅली समोरासमोर आल्यामुळे प्रचंड तणावाचे वातावरण आहे. यावेळी अनेक कार्यकर्त्यांची पोलिसांसमोबत बाचाबाचीदेखील झाली आहे.
17 Nov, 24 04:22 PM
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे काँग्रेसचे धोरण : योगी आदित्यनाथ
इंग्रजांनी ज्या प्रमाणे ‘फोडा आणि झोडा’ नीती वापरली. त्यांचाच अंश असलेल्या कॉंग्रेसने जातीजातीत भांडणे लावण्याचे धोरण आखले आहे, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.
17 Nov, 24 03:59 PM
ऐरोलीत गणेश विसर्जन नक्की : संजय राऊत
मुंबई-महाराष्ट्र गुजरातचे दोन व्यापारी खेचून घ्यायला आले पण आम्ही तसं होऊ देणार नाही. महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे, २० तारखेला गणेश विसर्जन नक्की आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
17 Nov, 24 03:43 PM
| 23 तारीखला जनता मला मोठ्या मताधिक्याने निवडून देईल: प्रताप सरनाईक
जे लोकांना हवं आहे ते दिलेलं आहे त्यामुळे सामान्य जनता प्रभावित झाली आहे त्यामुळे विजय निश्चित आहे. मला येत्या 23 तारीखला जनता मला मोठ्या मताधिक्याने निवडून देईल, असंही प्रताप सरनाईक म्हणाले.
17 Nov, 24 03:23 PM
मविआ व महायुतीने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा फायदा होणार- सुगत चंद्रकापुरे
राष्ट्रीय पक्षांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा फायदा होत आहे, मला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया सुगत चंद्रकापुरे यांनी दिली आहे.
17 Nov, 24 03:08 PM
राणा यांच्या बाबतीत झालेली घटना अतिशय चीड आणणारी : अनिल बोंडे
नवनीत राणा यांच्या बाबतीत झालेली घटना अतिशय चीड आणणारी आणि संताप जनक आहे. निषेधाच्या करण्या पलीकडची ही घटना आहे, अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली.
17 Nov, 24 02:46 PM
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बनणार - राजीव रंजन सिंह
महायुती किती जागा जिंकेल हे आम्ही सांगू शकत नाही, पण महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बनणार, असंही राजीव रंजन सिंह म्हणाले.
17 Nov, 24 02:42 PM
निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
पारनेर मतदारसंघात आज मोठी घडामोड झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेतच काशिनाथ दाते यांना लंके यांचे कट्टर विरोधक विजय औटी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
17 Nov, 24 02:17 PM
लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आपली भूमिका मांडली आहे.'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी', अशी स्पष्ट भूमिका लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली आहे.
17 Nov, 24 01:56 PM
"कोकणने शिवसेनाप्रमुखांना भरभरून प्रेम दिले"
कोकण आणि शिवसेनाप्रमुख यांचे वेगळे नाते होते. कोकणने शिवसेनाप्रमुखांना भरभरून प्रेम दिले. त्यामुळेच आम्ही खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. यासाठी मला मंत्री केसरकर यांनी खंबीर साथ दिली. माझ्या खांद्याला खांदा लावून काम केले - मुख्यमंत्री
17 Nov, 24 01:50 PM
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"
मला दहा दिवसांत जेलमध्ये टाकणार असे म्हणतात, पण मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका आणि हलक्यात पण घेऊ नका. मी संघर्षातून वर आलेलो आहे, जेलची भाषा माझ्यासाठी नवीन नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेवर नाव न घेता टीका केली.
17 Nov, 24 01:36 PM
अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये चार प्रचार सभांचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी अमित शाह शनिवारी रात्रीच नागपुरात दाखल झाले होते. मात्र, आज अमित शाह हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्या सभा भाजपचे इतर नेते घेणार आहेत.
17 Nov, 24 01:15 PM
राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
अनपेक्षितपणे उमेदवारी करणाऱ्या दिनकर पाटील यांच्यासाठी पायघड्या घालणाऱ्या मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकाच मतदारसंघात दोन सभा घेऊन डबल धमाका केला. त्यांनी राज्यातील विरोधकांवर घाव घातले खरे; मात्र, त्यांना लागलेला माजी महापौर अशोक मूर्तडकांचा घाव मात्र त्यांनी लपवून ठेवला आणि अनुल्लेखानेच मूर्तडक विषयाची बोळवण केली. दुसरीकडे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरणारे येथे सभा घेऊन आमदार सरोज आहिरे याच महायुतीच्या उमेदवार असल्याचे स्पष्ट करून त्यांचा भाव वाढवला आहे.
17 Nov, 24 01:03 PM
"लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"
नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नाने लोकसभेत इतिहास घडविला आहे. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता बागलाणमध्ये प्रहारच्या माध्यमातून करावयाची आहे. दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी आपण एकमेव लढत आहोत - बच्चू कडू
17 Nov, 24 12:53 PM
"स्टेज खचला! संकेत कळला?"; शेलारांचा ठाकरेंना टोला
स्टेज खचला! संकेत कळला? जनता जेव्हा होती कोरोनात तडफडत, हे सगळे बसले होते नातेवाईकांना कंत्राटे वाटत. रिक्षा, टँक्सी, फेरिवाल्यांना दिला एक रुपया. ना आठवण झाली कधी लाडक्या बहिणींची, घरे भरली स्वतःची, दारुवाले आणि बिल्डरांची. नुसते सावत्र नाही हे भाऊ तर आहेत भलतेच लबाड, अडीच वर्षात लुटले खूप मोठे घबाड. त्यांचे एक टोक होते १०० कोटीची ती वसूली, या कफन चोरांना लाज नाही कसली. काल उबाठा सेनेच्या सभेचा स्टेज ठाण्यात खचला, यांच्या प्रत्येक पराभवाचा इतिहास ठाण्यानेच तर रचला! यांच्या भाषणांचा प्रभाव पाहा किती? भाषण संपताच खचते पायाखालची माती!! - आशिष शेलार
17 Nov, 24 12:35 PM
"ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा"
मी लोकसभेला सांगितलं होतं आणि आताही सांगतोय की, ज्याला निवडून आणायचं आहे त्याला निवडून आणा. ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा. मी तुम्हाला बंधनमुक्त केलं आहे. मी जात कुणाच्याही दावणीला बांधलेली नाही. मालक तुम्हाला ठेवलंय. मतदान तुम्हाला करायचं आहे. मालकपण तुम्हीच आहात. मी तुमचा मालक नाही - मनोज जरांगे पाटील
17 Nov, 24 12:27 PM
मला आठ दिवसांनी, पंधरा दिवसांनी कायम सलाईन लावावं लागतंय. मी हे तुम्हाला सांगतोय कारण शेवटी हे शरीर कधी जाईल काही सांगता येत नाही. मी तुमच्यात किती दिवस राहीन हेही सांगता येत नाहीये. शरीर कधी धोका देईल हे सांगता येत नाही. मी केलेल्या कठोर उपोषणांमुळे आता मला चालताना, चढता उतरतानाही चार चार पोरांना धरावं लागतंय - जरांगे पाटील
17 Nov, 24 12:13 PM
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’
नाशिकमधील लासलगाव येथे मराठा आंदोलकांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर आता मला साथ देत नाही. तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहू नये. माझा समाज आरक्षणापासून लांब राहू नये.
17 Nov, 24 11:49 AM
"निवडणूक झाली की, मी काकींना याविषयी विचारणार"
१९९१ पासून मला खासदार-आमदार केले, पण प्रतिभाकाकी कधी बाहेर आल्या नाहीत. आता त्या घरोघरी फिरत आहेत. त्यांना एवढा काय नातवाचा पुळका आला आहे माहीत नाही, मी खाताडा-पेताडा, गंजाडी असतो, तर गोष्ट वेगळी होती. मी बारामतीचे वाटोळे केले असते, तर गोष्ट वेगळी होती. निवडणूक झाली की, मी काकींना याविषयी विचारणार आहे - अजित पवार
17 Nov, 24 11:36 AM
"साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात"
मी कोणाला कमी लेखत नाही, पण तुम्ही जर तुलना केल्यास ‘साहेबां’च्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात झाली. पण तसे बोललो, तर म्हणतील बघा साहेबांना कमी लेखतो. त्यामुळे माझी सगळीकडूनच अडचण होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
17 Nov, 24 11:26 AM
प्रचाराचा जोर आज वाढणार
मतदानाच्या आधीचा रविवार आज असल्याने राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या प्रचाराचा जोर वाढणार आहे.गेले पंधरा दिवस प्रचार सुरु असून रविवार सुटीचा दिवस असल्याने तो सत्कारणी लावण्यासाठी उमेदवारांनी जय्यत तयारी केली आहे.
17 Nov, 24 11:24 AM
हिंगोली आणि परभणीच्या सीमेवर रोकड जप्त
हिंगोली जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास मुंबईहून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स मध्ये रोकडची वाहतूक केली जात होती तपासणी केल्यानंतर पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम एक कोटी रुपये पर्यंत असू शकते.
17 Nov, 24 10:59 AM
बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
निवडणूक आयोगाकडून बारामती येथील हेलिपॅडवर शरद पवारांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. बारामतीहून करमाळ्याकडे रवाना होताना ही तपासणी करण्यात आली आहे.
17 Nov, 24 10:53 AM
सदाभाऊ खोतांचा जयंत पाटलांना टोला
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूरमध्ये शनिवारी (दि.१७) सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेत आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चेची खिल्ली उडवलीय. इस्लामपूरच्या जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून काहीजण भावनिक राजकारण करत आता संधी आल्याचे सांगत आहेत. पण तिथे मुख्यमंत्री व्हायला 145 गडी लागतात, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
17 Nov, 24 10:05 AM
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा
कोल्हापूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज रविवारी सकाळी १०:३० वाजता तपोवन मैदानावर सभा होणार आहे. या सभेसाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू असून, योगी यांची ही कोल्हापूरमधील पहिलीच सभा आहे. योगी यांची याआधी लोकसभा निवडणुकीवेळी इचलकरंजीला सभा झाली होती.
17 Nov, 24 09:42 AM
उद्धव ठाकरेंची आज बोईसरमध्ये सभा
उद्धव ठाकरे यांची आज पालघरच्या बोईसरमध्ये जाहीर सभा होणार आहे. पालघर विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि बोईसर विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विश्वास वळवी यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा होत आहे. दुपारी दोन वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे यांचे खैराफाटा येथील मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
17 Nov, 24 09:13 AM
नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न!
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदार संघातील खल्लार येथे युवा स्वाभिमानचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेचे शनिवारी (दि.१६) आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेत जमलेल्या काही विरोधकांनी अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली आणि राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला.
17 Nov, 24 08:31 AM
'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
शिर्डी : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकशाहीत विकासाची चर्चा झाली पाहिजे. मात्र विष पेरणारी चर्चा केली जात आहे. सर्वांनी बटेंगे तो कटेंगेचा विरोध केला पाहिजे. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. त्यावर हे बोलायला तयार नाहीत, अशा काहीतरी घोषणा दिल्या तर आपोआप मते पडतील असे त्यांना वाटते. अजित पवारांना हे मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावे. फक्त विरोध करून गप्प बसणे योग्य नाही, असा सल्ला त्यांनी अजित पवारांना दिला.
16 Nov, 24 09:24 PM
"विक्रोळी गुंडगिरी मुक्त करायची संधी आहे"; मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
विक्रोळीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांच्यावर निशाणा साधला.
16 Nov, 24 08:30 PM
महिलांच्या पाठीशी एकनाथ शिंदे; विक्रोळीत सुवर्णा करंजेनी मानले आभार
आपण सगळ्या लाडक्या बहिणी आहोत. अशाच लाडक्या बहिणीला मुख्यमंत्र्यांनी संधी दिली. महिलांच्या पाठीशी एकनाथ शिंदे आहेत. सुनील राऊतने एकही विधायक काम केलेले नाही. मी आजही सुनील राऊत यांना खुले चॅलेंज देते. आपण एक व्यासपीठावर यावे आणि केलेल्या कामाचा आढावा मांडावा. विक्रोळीकराना कळायला हवे काय काम केले ते, असं सुवर्णा करंजे यांनी म्हटलं आहे.
16 Nov, 24 07:51 PM
बहिणीचा अपमान सहन करणार नाही - मनोज कोटक
बहिणीचा अपमान सहन करणार नाही आणि विक्रोळीकर देखील सहन करणार नाही. सातत्याने महिलांचा अपमान करणाऱ्या राऊत बंधूना जागा दाखवून देऊ. - माजी खासदार मनोज कोटक
16 Nov, 24 07:33 PM
हे सरकार अनैतिकतेने आलेलं सरकार- एकनाथ खडसे
ज्या बाळासाहेब ठाकरेनी शिवसेना आणि धनुष्यबाण वाढीसाठी उभा आयुष्य घातले त्यांचा पक्ष फोडला शिवसेना चोरली. या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या वाढीसाठी उभे आयुष्य खर्ची घातले त्यांचा पक्ष फोडला आणि हे सरकार बनले. खोक्याच्या जीवावर हे सरकार बनलं हे सरकार अनैतिकतेने बनलेले सरकार आहे - खडसे
16 Nov, 24 07:17 PM
कोल्हापुरात योगी आदित्यनाथ यांची सभा, अमल महाडिक यांची माहिती
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची सभा होणार
16 Nov, 24 06:29 PM
मनोज जरांगे पाटील मतदार संघात सांत्वन करण्यासाठी आले होते ही चांगली गोष्ट - भुजबळ
आम्ही कोणीच आरक्षणाला विरोध करत नाही. त्यामुळे आमचा प्रश्न नाही. आम्ही फक्त मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावे अशी मागणी करतोय -भुजबळ
16 Nov, 24 05:59 PM
अजित पवार यांनी काकाच्या छातीत चाकू भोसकला - तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी
अजित पवार यांनी काकाच्या छातीत चाकू भोसकला - तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी
16 Nov, 24 05:36 PM
सक्तीच्या धर्मांतर विरोधी कायदा आम्ही करणार आहोत - केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
सक्तीच्या धर्मांतर विरोधी कायदा आम्ही करणार आहोत - केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
16 Nov, 24 05:06 PM
ही लढाई विचारधारेची : राहुल गांधी
ही लढाई विचारधारेची आहे, एकीकडे महायुती दुसरी कडे महाविकास आघाडी आहे. देश संविधानाने चालला पाहिजे, प्रधानमंत्री म्हणतात हे केवळ पुस्तक आहे, संविधान देशाचा डीएनए आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.
16 Nov, 24 04:27 PM
प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
‘जय भवानी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘साईबाबाजी की जय’ अशी घोषणा देत काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी भाषणाला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, आज येथे सभा होत आहे, त्या मैदानाजवळ साईबाबा बसत होते. आज पहिल्यांदा मला साईबाबांच्या मंदिरात जाण्याचे सौभाग्य मिळाले.
16 Nov, 24 03:54 PM
अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
'मला काय पाडता, मीच सारा कार्यकर्त्यांचा फौज फाटा घेऊन संभाजीनगर जिल्ह्यात उबाठाचा बिस्मिला करणार आहे. त्यांच्या पक्षाचा एकही आमदार आता निवडून येणार नाही. उबाठाचा सुपडा साफ करणार आहे. मला काय जेल मध्ये टाकता उद्धव ठाकरे यांच्या अजून ४ चौकशा बाकी आहेत. युतीचे सरकार आल्यावर आम्हीच त्यांना जेलमध्ये टाकू', असा इशारा अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.