Maharashtra Vidhan Sabha: "बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार; ५० आमदारांनी साथ दिली ते माझं भाग्य"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 12:23 PM2022-07-03T12:23:25+5:302022-07-03T12:24:15+5:30

आज राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार स्थापन झाले आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन हे सरकार पुढे चाललं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Maharashtra Vidhan Sabha: "Balasaheb's thoughts will be carried forward; it is my good fortune that 50 MLAs supported him" Says CM Eknath Shinde | Maharashtra Vidhan Sabha: "बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार; ५० आमदारांनी साथ दिली ते माझं भाग्य"

Maharashtra Vidhan Sabha: "बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार; ५० आमदारांनी साथ दिली ते माझं भाग्य"

googlenewsNext

मुंबई - विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली त्याबद्दल सरकारच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. या सभागृहाचा अध्यक्ष झाल्यानंतर मोठी मानाची पदे भूषवणारे नेते आहेत. देशपातळीवर नेत्यांना गौरवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या घटनांची नोंद सगळ्यांनी घेतली आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक घटना आहे. कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करत होता. परंतु आता तुमची गरिमा वाढली आहे. सामाजिक जीवनातील व्याप्ती वाढली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील १२ कोटी जनतेचे प्रतिक असलेल्या सार्वभौमत्व सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी आपण विराजमान झाला आहात. राज्यातील गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या माध्यमातून सुटतील अशी अपेक्षा आहे. त्याचसोबत लोकप्रतिनिधींच्या हक्कांचे संरक्षण अबाधित राहील. आपण न्यायदान करता कायद्यासमोर सर्व समान तत्वाने काम कराल अपेक्षा. राज्याचा कारभार पारदर्शकपणे चालवायचा आहे. प्रसंगी आपण मुक्तपणे निर्णय घेऊन मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच तरूण आमदारांच्या व्यथा सोडवण्याचे तुम्ही प्रयत्न करावेत. आपण यापूर्वीही विधानसभा, विधान परिषदेत काम केले आहे. त्या कामकाजाच्या अनुभवाचा या सभागृहाला फायदा होईल. वकील म्हणून शिवसेना पक्षासाठी अनेक खटले लढवलेत. महिलांसाठी असणाऱ्या शक्ती कायदा मागील काळात संमत करण्यात आला. त्यातही आपला सहभाग होता. विरोधी बाकांवर बसून आपण सरकारला वेळोवेळी मार्गदर्शन केले. आपल्या सूचनांचा फायदा झाला आहे. या सभागृहातील कोणत्याही सदस्यांवर अन्याय न होता त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडण्यासाठी सहकार्य मिळेल. सभागृहात काही चुकीचा पायंडा पडण्यापूर्वी आपण समज द्याल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, आज राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार स्थापन झाले आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन हे सरकार पुढे चाललं आहे. आतापर्यंतच्या ज्या घटना घडल्या त्यात विरोधकांकडून सत्ताधारीत जाण्याच्या घडल्या आहेत. परंतु पहिल्यांदाच सत्तेतून पायउतार होण्याची घटना घडली. माझ्यासह ८ मंत्री सत्तेतून पायउतार झाले. मला ५० आमदारांनी साथ दिली. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आमदारांनी विश्वास ठेवला हे माझे भाग्य समजतो. कुणावरची जोरजबरदस्तीचा प्रयत्न झाला नाही. ज्याला वाटलं त्यांना विशेष विमानानं परत पाठवलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

भाजपा नेत्यांचे मानले आभार
मला काही नको होतं, माझी कुठलीही अपेक्षा नव्हती. परंतु लोकशाहीत भारतीय जनता पार्टीने सन्मान करत वैचारिक भूमिकेला पाठिंबा दिला. त्याचसोबत १०५ आमदार असूनही मुख्यमंत्रिपद देण्याचं काम केले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, जे.पी नड्डा आणि भाजपाच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha: "Balasaheb's thoughts will be carried forward; it is my good fortune that 50 MLAs supported him" Says CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.