Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विधानसभेसाठी ही पहिलीच निवडणूक होत आहे. दोन्ही गट एकमेकांविरोधात निवडणूक लढत आहेत. तर दुसरीकडे पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
“शक्यतो पाडापाडी कराच, पण मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या”; मनोज जरांगेचे आवाहन
आज सुरु असलेल्या सुनावणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचे पालन करतोय असे सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ते पुरावे मिटवत असून जुने व्हिडीओही वापरक असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, आम्ही जुने व्हिडीओ वापरत नसल्याचा दावा अजित पवार गटाने केला.
दरम्यान, आता सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिन्हाबाबत २४ ते ३६ तासामध्ये वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महत्वाचे निर्देश दिले आहेत.
मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस उभी फूट पडल्याचे समोर आली आहे. ४० हून जास्त आमदार अजित पवार यांच्या सोबत गेल्याचा दावा करण्यात आला. . त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि घड्याळ चिन्ह यावर शरद पवार आणि अजित पवार यांच्या निवडणूक आयोगापुढे संघर्ष सुरू झाला. त्यात अजित पवारांना पक्षाचं नाव आणि चिन्ह आयोगाकडून बहाल करण्यात आले. या निर्णयाला शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. 'घड्याळ' चिन्ह वापरण्याबाबत शरद पवार गटाने आक्षेप घेतला आहे.