Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही म्हणून पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा नाराज असल्याचे समोर आले होते. त्यांनी माध्यमांसोर येऊन नाराजी व्यक्त केली होती. यानंतर ते गेले काही तास नॉट रिचेबल होते. त्यांचा फोनही बंद होता यामुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनीही शोध सुरू केला होता. दरम्यान, आता श्रीनिवास वनगा घरी परतले आहेत. त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे.
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
आमदार श्रीनिवास वनगा आज १०० तासानंतर घरी परतले आहेत. त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी वनगा म्हणाले, पालघर विधानसभा किंवा डहाळूमध्ये मला डावलण्यात आले. माझ्या विरुद्ध ज्यांनी षडयंत्र केले, त्यामुळे मी नाराज होऊन भूमिका मांडली. शंत विचार करण्यासाठी मी अज्ञातवासात गेलो होतो. माझ्या कुटुंबाने माझ्यासोबत संपर्क साधला. मुलाची तब्येत बरी नाही, दिवाळी आहे. हे एढीच लाईफ नाही, त्यांनी मला हे सांगून धीर दिला. मी आता सुखरुप आहे. मी बाहेर कुठेही गेलो नव्हतो, पाच किलोमीटरच्या परिसरात होतो, असंही वनगा म्हणाले.
"मी माझ्या मित्रांच्या घरी होतो, त्यांनी मला खूप सांभाळला. धीर दिला. त्यांनीच माझ्या घरच्यांना माहिती दिली. रात्रीच त्यांनी मला आमच्या घरी आणले, असंही श्रीनिवास वनगा म्हणाले. 'माझ्याविरोधात जिल्हा प्रमुखांनीच षडयंत्र रचले.त्यांना त्यांची लॉबी चालवायची होती. माझ्यासारख्या प्रामाणिक इनामदार व्यक्ती नको होता.त्यांना बाहेरचे पक्ष बदलणारे, चोरी, लबाड्या करणारे हवे होते. त्यांना त्यांनी संधी दिली, असा आरोपही श्रीनिवास वनगा यांनी केला. अशी संधी गेल्यामुळे माझ मन खचले, माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होत होते. मी आजही प्रामाणिक आहे, माझ्याकडून भावनेत बोलून गेलो असेल, माझ्याशी जवळचे असलेले शंभुराजे बोलले आहेत. ते म्हणाले मी तुझ्यामागे आहे. मी त्यांना घरी थांबणार असल्याचे सांगितले. निवडणुकीत महायुतीचे साहेब सांगतील ते काम करणार असल्याचेही वनगा म्हणाले.
"माझे सगळ्याच राजकीय व्यक्तिसोबत चांगले संबंध आहेत. मी काम करत राहणार, आज कोणत्याही संकटाला सामोर जाण्यासाठी तयारी ठेवली आहे, असंही श्रीनिवास वनगा म्हणाले. माझ्याविरोधात ज्यांनी षडयंत्र रचले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही वनगा यांनी केली.