Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 12:26 PM2024-11-22T12:26:01+5:302024-11-22T12:27:12+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेसला आव्हान दिले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांचे उद्या २३ नोव्हेंबर रोजी निकाल समोर येणार आहेत. एक्झिट पोलचे आकडेही समोर आले आहेत, काही एक्झिटमध्ये महायुतीचे सरकार येणार, तर काही काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेसला आव्हान दिले आहे.
कालपासून राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरु आहे. दरम्यान, आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदावर भाष्य केले. खासदार संजय राऊत म्हणाले, उद्या दहा नंतर मी मुख्यमंत्री कोण असणार हे सांगणार. महाविकास सरकार आले तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महाराष्ट्रात होईल. काँग्रेसचे जे प्रमुख नेते येथे येतील त्यांना दिल्लीतून मँडेट घेऊनच येथे यावे लागले, असं आव्हान खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिले. शरद पवार, उद्धव ठाकरे मुंबईत आहेत. आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ, नाहीतर भारतीय जनता पक्ष आमच्या हातातील ताट खेचण्याचा प्रयत्न करतील इतके ते क्रुर लोक आहेत, असा टोलाही राऊत यांनी भाजपाला लगावला.
सोलापुरातील वादावर बोलताना राऊत म्हणाले, दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसेनेला अधिकृत सुटल्यावर महाविकास आघाडीच्या सर्व जणांनी काम करणे अपेक्षित होतं, महाराष्ट्रात काही ठिकाणी असे प्रकार झाले आहेत,काही अपवाद आहेत उद्या निकाल लागल्यावर एकत्र बसून चर्चा करू. का घडतंय हे तपासून पहावं लागेल, असंही संजय राऊत म्हणाले.
"सरकार मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात. आमच्याबरोबर डावी पक्ष आहेत शेकाप आहे.हे सर्व महाविकास आघाडीचे घटक आहेत. काही अपक्षाने पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली आहे.जे पैशांचे बंडल डोक्याखाली ठेवून झोपतात त्यांना ५० -१०० कोटीची ऑफर अपक्षांना केली आहे. ज्यांना जिंकून येत नाही त्यांनी अपक्षांना बंडलांच्या थैल्या पाठवल्या जात आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला.