Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडीने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात १०० दिवसांचा अजेंडा जाहीर केला. पदवीधर आणि पदविका असलेल्या बेरोजगार तरुणांना दरमहा ४,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे, या जाहीरनाम्यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपाचे नेते सुधीर मनगुंटीवार यांनी यावरुन काँग्रेसवर टीका केली.
“...तर तो व्हिडिओ व्हायरल करु नका”; मनोज जरांगेंनी केली विनंती, पाटलांना कशाची भीती?
आज पत्रकारांसोबत संवाद साधताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेसला सरकार येणार नसल्याची खात्री असल्याने तसा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आधी ते लाडकी बहीण योजनेचा विरोध करत होते. काँग्रेसचा जाहीरनामा झुटनामा आहे. त्यांनी जनगणना करू असा उल्लेख केला, राज्य सरकारला जनगणना करता येते का?, असा सवालही सुधीर मुनगंटीवार यांनी केला. ते जाती जातीचे विष वापरत आहे हे दुःखद आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.
"महाविकास आघाडी सत्तेत येणार नाही, त्यांच्या मनातील आकडे आहेत त्यादिवशी तीन हजार आकडा आला, ते आकडे बहाद्दर आहेत, ते कधी ८००० सांगतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
आज सकाळी मल्लिकार्जुन खरगे यांनी ब्रिज कोसळल्यावरुन भाजपावर टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेसचे पंतप्रधान असताना अनेक ब्रिज पडले, रेल्वे अपघात झाले. गोसेखुर्द भूमिपूजन केले, मात्र पुढे काय झालं, यांना टीका करण्याचा वाईट गुण आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.