Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:08 PM2024-10-28T23:08:56+5:302024-10-28T23:08:56+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी पाचवी यादी जाहीर केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे, तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात उमेदवार बदलण्यात आला आहे. याआधी कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या उमेदवारीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे आता कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर कुलाबा विधानसभा मतदारसंघात हिरा देवसी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात साजिद खान, सोलापूर मध्य चेतन नरोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये ९०-९०-९० असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. त्याप्रमाणे उमेदवार यादी जाहीर करण्यात येत आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ८० तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ४५ उमेदवार जाहीर केले आहेत. तर काँग्रेसकडून ९९ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
Congress released a list of 2 candidates for Jharkhand and 4 candidates for Maharashtra, for the upcoming Assembly elections in both states
— ANI (@ANI) October 28, 2024
Heera Devasi fielded against Maharashtra Assembly speaker and BJP candidate Rahul Narvekar pic.twitter.com/nMS5pADn1z