Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 12:55 PM2024-11-13T12:55:24+5:302024-11-13T12:56:57+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या जाहीरनामावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचारसभा सुरू आहेत, महाविकास आघाडीने जाहीरनामा जाहीर केला असून महिला, तरुणांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांवरुन भाजपानेकाँग्रेसवर आरोप केले आहेत. काँग्रेसने कर्नाटकात जाहीर केलेल्या योजना बंद पडल्याचा आरोप केला आहे, यावर आता काँग्रेसने भाजपाला प्रत्युत्तर देत आव्हान दिले आहे.
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
कर्नाटक काँग्रेसने आज वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमधून काँग्रेसने कर्नाटकातील योजनांची महिती घेण्यासाठी कर्नाटकात येण्यासाठी जाहीर आमंत्रण दिले आहे. जाहीर आमंत्रणाचे पत्र आज वृत्तपत्रांमध्ये छापण्यात आले आहे. या जाहिरातीवर कर्नाटक काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांची सही असल्याचे दिसत आहे.
भाजपच्या खोट्या जाहिराती आणि अपप्रचाराविरोधात काँग्रेस आक्रमक
— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) November 13, 2024
भाजपचा खोटारडेपणा उघडा पाडत भाजप नेत्यांना कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान
कर्नाटक सरकारच्या गॅरंटींच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी येणा-या शिष्टमंडळाच्या विमान, बस, प्रवास आणि… pic.twitter.com/Kgxow9IYhC
काँग्रेसने दिलेल्या जाहिरातीमध्ये काय आहे?
सप्रेम नमस्कार,
आपण सर्वजण उत्तम स्वास्थ्य आणि चांगल्या मनस्थितीत असाल, अशी अपेक्षा आहे.
अलीकडेच भाजपप्रणीत महायुती सरकारने वृत्तपत्रांत खोट्या जाहिरातीमधून कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या खात्रीशीर लाभ देणाऱ्या योजनांविषयी दिशाभूल करणारी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे सरकार पारदर्शक आहे.
कर्नाटकमधील आमच्या खात्रीशीर योजनांमुळे येथील जनतेला कसा सकारात्मक लाभ मिळतोय, हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी मी महाराष्ट्रातील मंत्री व वरिष्ठ नेतेमंडळींना कर्नाटक भेटीचे आमंत्रण देत आहे. या योजनांसाठी कर्नाटक सरकारने वार्षिक १५२,००० कोटींचा निधी मंजूर केला आहे.
आपल्या भेटीच्या सोयीसाठी, कर्नाटक प्रदेश कोग्रेस कमिटी आपल्या शिष्टमंडळाच्या सुखकर प्रवासासाठी विमान, बस व निवासाची व्यवस्था करेल.
अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या श्री. एच.एम. रेवण्णा (अध्यक्ष) हमी योजना अंमलबजावणी समिती, कर्नाटक सरकार यांच्याशी (फोन: ९९०११८४४६६) संपर्क करावा.
कर्नाटकमध्ये आपले स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत, तसेच या योजनांची माहिती आपल्याशी सामायिक करण्यात आम्हाला आनंद होईल, जेणेकरून खोट्या प्रचाराला पूर्णविराम देण्यात आम्हाला मदत होईल.
दरम्यान, आता काँग्रेस नेत्यांनी कर्नाटक काँग्रेसची जाहिरात सोशल मीडियावरुन शेअर करुन महायुतीवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनीही भाजपावर निशाणा साधला आहे. लोंढे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भाजपच्या खोट्या जाहिराती आणि अपप्रचाराविरोधात काँग्रेस आक्रमक आहे. भाजपचा खोटारडेपणा उघडा पाडत भाजप नेत्यांना कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान दिले आहे, असंही ट्विटमध्ये लोंढे यांनी म्हटले आहे.