Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगेत सापडलं असं काही, अजितदादा म्हणाले,...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 01:48 PM2024-11-13T13:48:44+5:302024-11-13T13:58:29+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगांची तपासणी केली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 election officer Ajit Pawar's helicopter checking | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगेत सापडलं असं काही, अजितदादा म्हणाले,...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगेत सापडलं असं काही, अजितदादा म्हणाले,...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतींच्या नेत्यांच्या प्रचारसभा सुरू आहेत. काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यानंतर ठाकरे यांनी फक्त विरोधी पक्षांतील नेत्यांच्याच बॅगांची तपासणी सुरू असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही बॅगांची तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरची बारामती येथे निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी अजित पवार उपस्थित होते, यावेळी अधिकाऱ्यांनी बॅगांची तपासणी केली, यावेळी बॅगांमध्ये चकल्या मिळाल्याचे दिसत आहे, दरम्यान अजित पवार अधिकाऱ्यांना 'खा बाबा खा' सांगत असल्याचे दिसत आहे, तर दुसरा डबाही तपासण्यासाठी देत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. 

उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या,  ठाकरेंचा मोठा आरोप

दोन दिवसापूर्वी प्रचारासाठी उद्धव ठाकरे सोमवारी वणीत दाखल झाले होते. हेलिकॉप्टरमधून उतरताच माजी मुख्यमंत्री ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली. या तपासणीचा व्हिडीओ उद्धव ठाकरेंनी काढला आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. दरम्यान, काल सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी काल ठाकरेंच्या बॅगांची तपासणी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 


Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 election officer Ajit Pawar's helicopter checking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.