मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेले एक्झिट पोल समोर आले असून नावाजलेल्या सात संस्थांपैकी पाच संस्थांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविला आहे. सातपैकी चाणक्य स्ट्रॅटेजीज, मॅट्रिझ आणि जेव्हीसी या तीन संस्थांनी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तविली असून पी मार्क आणि मराठी रुद्र या दोन संस्थांनी महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघेही बहुमताच्या जादुई आकड्यापर्यंत पोहचत असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तथापि, महायुतीच्या जास्त जागा असतील असेही या दोन संस्थांच्या अंदाजांत म्हटले आहे.
पाचही एक्झिट पोलनुसार भाजप हा सगळ्यात जास्त जागा जिंकून सगळ्यात मोठा पक्ष असेल तर अजित पवार गटाला सर्वात कमी जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. भाजपखालोखाल काँग्रेस हा राज्यात दोन नंबरचा पक्ष असेल तर तिसऱ्या नंबरसाठी शरद पवार गट आणि शिंदे सेनेत चुरस असल्याचे या अंदाजांवरून दिसते. सहा पक्षांत उद्धवसेना पाचव्या क्रमांकावर राहील असा अंदाज या पाच एक्झिट पोलनी वर्तवला आहे.
पक्षफुटीनंतर कोणाला पसंती?
शिंदेसेना की उद्धवसेना
चाणक्या स्ट्रॅटेजीज आणि मॅट्रिज यांच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार उद्धवसेनेपेक्षा शिंदेसेनेला अधिक जागा मिळतील.
अजित पवार की शरद पवार
चाणक्या स्ट्रॅटेजीज आणि मॅट्रिज यांच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार अजित पवार गटापेक्षा शरद पवार यांच्या गटाला अधिक जागा मिळतील.
वंचित अन् तिसरी आघाडी
कोणत्याच एक्झिट पोलमध्ये वंचित आणि तिसऱ्या आघाडीतील पक्षांचा उल्लेख नाही. इतरमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे त्यांचा फारसा प्रभाव दिसले असे कुणीही म्हटले नाही.
कोणाला किती जागा?
भाजप
चाणक्य स्ट्रॅटेजीज नुसार ९० तर मॅट्रिझनुसार ८९-१०१ जागा मिळतील.
शिंदेसेना
चाणक्य स्ट्रॅटेजीज नुसार ४८ तर मॅट्रिझनुसार ३७-४५ जागा मिळतील.
अजित पवार गट
चाणक्य स्ट्रॅटेजीज नुसार २२ तर मॅट्रिझनुसार १७-२६ जागा मिळतील.
चाणक्य स्ट्रॅटेजीज नुसार ६३ तर मॅट्रिझनुसार ३९-४७ जागा मिळतील.
उद्धवसेना
चाणक्य स्ट्रॅटेजीज नुसार ३५ तर मॅट्रिझनुसार २१-३९ जागा मिळतील.
शरद पवार गट
चाणक्य स्ट्रॅटेजीज नुसार ४० तर मॅट्रिझनुसार ३५-४३ जागा मिळतील.
मनसेला किती जागा?
सर्वच एक्झिट पोलमध्ये मनसेला अपक्ष आणि इतर यांमध्ये स्थान देण्यात आले. इलेक्टोरल एजनुसार, मनसे, वंचित, एमआयएम अपक्ष इतर मिळून २० जागा येऊ शकतात. 'चाणक्य'नुसार, अपक्ष, मनसे, वंचितच्या उमेदवारांचा ६ ते ८ जागांवर विजय मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या वेळी कोण-कोण खरे ठरले?
२०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर ६ ‘एक्झिट पोल’मध्ये भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकार पुन्हा स्थापन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. हा अंदाज जरी खरा ठरला, जागांबाबत इंडिया टुडे-ॲक्सिसचा अंदाज निकालाच्या जवळ पोहोचला.
या संस्थेने भाजप युतीला १६६-१९४, तर काँग्रेस आघाडीला ७२-९० जागा मिळतील असा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात भाजप युतीला १६१, तर काँग्रेस आघाडीला ९८ जागांवर विजय मिळाला होता. शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या.
मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने भाजपसोबत फारकत घेऊन काँग्रेस आघाडीसोबत हातमिळवणी केली होती. इतर सर्व एक्झिट पोलनी भाजप युतीला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, निकालातील आकडे वेगळे होते.
काय सांगतात एक्झिट पोल?
संस्था - महायुती - मविआ - इतरमॅट्रीझ १५०-१७० ११०-१३० ८-१०चाणक्य १५२-१६० १३०-१३८ ६-८आयसीपीएल १२४-१५६ १२९-१५९ ०-१०जेव्हीसी १५८-१५९ ११५-११६ १२-१३मराठी रुद्र १२८-१४२ १२५-१४० १८-२३पी-मार्क १३७-१५७ १२६-१४६ २-८पीपल्स पल्स १८२ ९७ ९
पोल ऑफ पोल्स
महायुती - १३५-१५७
मविआ - १२३-१४०