Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 04:46 PM2024-10-28T16:46:55+5:302024-10-28T16:48:09+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : उमेदवारी अर्ज भरण्यास काही तासच बाकी राहिले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारांच्या यादी जाहीर होत आहेत. दरम्याम, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. या यादीत सात नावांचा समावेश आहे. सलील देशमुख यांना काटोल विधानसभा तर खानापूरमधून वैभव पाटील, दौंडमधून रमेश थोरात यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आज चौथ्या यादीची घोषणा करण्यात आली. या यादीत सात उमेदवारांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या यादीची घोषणा केली.
माण विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराविरोधात शरद पवार गटाने प्रभाकर घारगे यांना मैदानात उतरवले आहे, तर दौंडमधून रमेश थोरात यांना उमेदवारी दिली आहे.वाई विधानसभा मतदारसंघात अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी दिली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
या नेत्यांना मिळाली संधी
१. काटोल विधानसभा- सलील देशमुख
२. माण विधानसभा- प्रभाकर घारगे
३. खानापूर विधानसभा- वैभव पाटील
४. वाई विधानसभा- अरुणादेवी पिसाळ
५. दौंड विधानसभा- रमेश थोरात
६. पुसद विधानसभा- रमेश मैंद
७. सिंदखेडा विधानसभा- संदीप बेडसे