Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (२९ ऑक्टोंबर) रोजी तासगावात दिवंगत आर. आर. पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. '७० हजार कोटी सिंचनच्या चौकशीच्या फाईलवर आर आर पाटील यांनी सही केली होती', असं अजित पवार म्हणाले. पवार यांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा?; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका
खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत यावर प्रतिक्रिया दिली. खासदार सुळे म्हणाल्या, अजित पवार यांनी आर आर पाटील यांच्याबाबत केलेले वक्तव्य वेदनादायी होतं.याबाबत मी त्यांच्या कुटुंबियांना फोन करुन माफी मागितली. आमचे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध आहेत. गेलेल्या माणसाबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. राजकारण या पातळीवर गेले आहे का हे ऐकून वाईच वाटलं, असंही सुप्रिया सुळे म्हणाले.
" ७० हजार कोटींचा आरोप झाला तेव्हा आमचा पक्ष एक होता. आम्ही सगळेच एकत्र काम केलं, या घोटाळ्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. याची चौकशी झाली पाहिजे ही मागणी फडणवीस यांनी केली हे महाराष्ट्राने पाहिलं. आर आर पाटील यांना मानलं पाहिजे, विरोधी पक्षांनी जेव्हा घोटाळ्याचा आरोप केला तेव्हा चौकशी राज्याच्या हिताची झाली पाहिजे असं वाटतं असेल. ज्याला कर नाही त्याला डर कशाला. इनामदार व्यक्ती म्हणून आर आर पाटील यांनी सही केली असेल. आता या घोटाळ्यात काही होतं की नव्हतं हे सांगायला पाहिजे, अशी मागणीही सुळे यांनी केली.
चौकशी झाली पाहिजे...
"आरोप आधी झाले आणि त्यानंतर फाईलवर सही झाली. या फाईलच पुढं काय झालं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस देऊ शकतात. अजित पवार विरोधी पक्षात होते तेव्हा ही फाईल दाखवली, तेव्ही फडणवीस मुख्यमंत्री होते.कधी फाईल दाखवली, जेव्हा तुम्ही मंत्री होता, तेव्हा शपथ घेता तेव्हा गोपनीयतेची शपथ घेता.शपथेत फाईल दाखवायची मुभा नसते.या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. असंही सुळे म्हणाल्या.
फडणवीस यांना उत्तर द्यावे लागेल...
"आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले, त्यामुळे या सगळ्याचं उत्तर फडणवीस यांना द्याव लागेल. ७० हजार कोटींचा घोटाळा झाला की नाही झाला हे सांगायला पाहिजे. आमचा पक्ष एक होता, आम्ही त्या काळात अजित पवार यांच्या मागे ताकदीने उभा होता, असंही सुळे म्हणाल्या.