Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : महाराष्ट्र नव निर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी सातवी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत १८ उमेदवारांचा समावेश आहे. मनसेने आतापर्यंत १३५ उमेदवारांची घोषणा केली आहे. बाळापूरमधून मंगेश गाडगे, इंदापूर- अमोल देवकाते, पारनेर- अविनाश पवार ,खानापूर - राजेश जाधव या उमेदवारांची घोषणा केली आहे.
मनसेने पुरंदर विधानसभेतून उमेश जगताप, औरंगाबाद मध्य- सुहास दाशरथे, कर्जत खालापूर- जगन्नाथ पाटील, उरण- सत्यवान भगत यांना मैदानात उतरवले आहे.
या नेत्यांना मिळाली उमेदवारी
बाळापूर - मंगेश गाडगेमूर्तिजापूर-भिकाजी अवचरवाशिम- गजानन वैरागडे हिंगणघाट- सतीश चौधरीउमरखेड - राजेंद्र नजरधनेऔरंगाबाद मध्य- सुहास दाशरथेनांदगाव- अकबर सोनावाला इगतपुरी - काशिनाथ मेंगाळ डहाणू- विजय वाढियाबोईसर- शैलेश भुतकडेभिवंडी पूर्व- मनोज गुळवीकर्जत खालापूर- जगन्नाथ पाटीलउरण- सत्यवान भगतइंदापूर- अमोल देवकातेपुरंदार - उमेश जगताप श्रीरामपूर- राजू कापसेपारनेर- अविनाश पवार खानापूर - राजेश जाधव
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र या लढतीत आता मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे आपला उमेदवार मागे घेऊन अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची खेळी खेळण्याची तयारी शिवसेना शिंदे गटाकडून सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याबाबत येथील विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री चर्चा केल्याच वृत्त होते, पण आता सदा सरवणकर यांनी निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.