Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 12:48 PM2024-11-24T12:48:08+5:302024-11-24T12:51:05+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights; मतदारसंघामध्ये चांगला संपर्क असूनही कोणत्याही पक्षाची साथ न घेणे हे आसिफ शेख यांना काही प्रमाणामध्ये महागात पडले.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - AIMIM candidate Maulana Mufti Ismail wins for the second time in Malegaon Central constituency | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली

नाशिक - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीच्या त्सुनामी लाटेमुळे मविआसह इतर छोट्या पक्षांनाही धक्का बसला. त्यात मालेगाव मध्य मतदारसंघात AIMIM च्या उमेदवाराने १६२ मतांनी विजयी होत एकमेव खातं उघडलं. निवडणुकीचे निकाल समोर आले त्यात सुरुवातीच्या कलापासून मालेगाव मध्य मतदारसंघातून इस्लाम पक्षाचे उमेदवार माजी आमदार आसिफ शेख पुढे होते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांच्यावर मात करून एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी सलग दुसऱ्यांना आमदारकी मिळवली. 

सकाळी ८ वाजता संगमेश्वर येथील शिवाजी जिमखाना येथे मतमोजणीला प्रारंभ झाला होता. पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर मतदान यंत्रातील मोजणीला सुरूवात झाली. सुरुवातीच्या मतमोजणीत माजी आमदार आणि इस्लाम पक्षाचे उमेदवार आसिफ शेख यांनी आघाडी घेतली. काही फेऱ्यांपर्यंत त्यांची आघाडी वाढताना दिसत होती. मात्र त्यानंतर मौलाना मुफ्ती यांना मिळणारी मते वाढू लागली आणि मताधिक्य कमी होत गेले तरी आसिफ शेख हेच आघाडीवर होते. मात्र शेवटच्या ३-४ फेऱ्यांमध्ये मौलानांनी आघाडी घेतली आणि चुरशीच्या लढतीत मौलना मुफ्ती यांनी बाजी मारली. 

या मतदारसंघात लढत असलेल्या शान ए हिंद आणि एजाज बेग या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना फारशी मते मिळवता आली नसल्याचे दिसून आले. या मतदारसंघामध्ये उभ्या असलेल्या अनेक अपक्षांनाही अपेक्षेएवढे मतदान न झाल्याने अनामत रक्कम गमवावी लागली. मालेगाव मध्य मतदारसंघात मौलाना मुफ्ती यांना १ लाख ९ हजार ३३२ मते मिळाली तर इस्लाम पक्षाचे आसिफ शेख यांना १ लाख ९ हजार २५७ मते मिळाली. या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार एजाज बेग यांना अवघी ७४८५ मते मिळवता आली. 

दरम्यान, हा मतदारसंघ महाविकास आघाडीने समाजवादी पक्षाला द्यावा अशी मागणी केली होती मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने समाजवादी पक्षाने येथून त्यांचा स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरवला. त्यानंतर मविआतर्फे काँग्रेसने एजाज बेग यांना उमेदवारी दिली. मात्र या २ उमेदवारांना मतदारांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. अपक्ष असलेले माजी आमदार आसिफ शेख यांनी चांगली लढत दिली असली तरी त्यांना काही प्रमाणात कार्यकर्त्यांची साथ कमी पडल्याचे दिसून आले. काही अपक्षांनीही काही प्रमाणात मते घेतली. मतदारसंघामध्ये चांगला संपर्क असूनही कोणत्याही पक्षाची साथ न घेणे हे आसिफ शेख यांना काही प्रमाणामध्ये महागात पडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले, मात्र उमेदवारी मिळणार नाही, हे दिसताच वेगळा पक्ष काढला.

विजयाची तीन कारणे...

आपल्या मतदार संघाशी राखलेला सातत्यपूर्ण जनसंपर्क हे मतदारांना भावलेले प्रमुख कारण ठरले आहे.

पाच वर्षांच्या कालावधीमध्ये मतदारसंघामध्ये केलेली सर्वांगीण कामे यामुळे मतदारांनी पसंती दिली.

एमआयएम पक्षाने बरीच लवकर जाहीर केलेली उमेदवारी पथ्यावर पडली. त्यामुळे प्रचाराला अधिक वेळ मिळाला. 
 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - AIMIM candidate Maulana Mufti Ismail wins for the second time in Malegaon Central constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.