मुंबई - राज्य विधानसभा निवडणुकीत दिग्गजांना मतदारांनी धक्के दिले. अनेक तगडे उमेदवार पराभूत झाले. यावेळी सर्वच पक्षांनी आपल्या विद्यमान आमदारांवर विश्वास टाकला होता. त्यामुळे २५० आमदार रिंगणात होते. त्यापैकी जवळपास एक चतुर्थांश आमदार पराभूत झाले आहेत. त्यापैकी सहा आमदारांची तर अनामत रक्कम जप्त झाली आहे.
कोणत्या पक्षाचे किती आमदार हरले?
१९ काँग्रेस I १० अजित पवार गट I ०८ शरद पवार गट I ०७ उद्धवसेना I ०६ शिंदेसेना I ०५ भाजप I ०३ बविआ I ०३ अपक्ष I ०२ प्रहार I ०१ एआयएमआयएम I ०१ मनसे I ६५ एकूण.
जिल्हानिहाय संख्या
०७ पुणे०६ मुंबई उपनगर०५ सोलापूर०४ पालघर०४ अहिल्यानगर०४ अमरावती०३ बुलढाणा ०३ कोल्हापूर०३ सातारा
०२ जालना०२ यवतमाळ०२ ठाणे०२ बीड०२ नांदेड०२ धुळे०२ सांगली०२ मुंबई शहर०१ रत्नागिरी
०१ सिंधुदुर्ग०१ छ. संभाजीनगर०१ धाराशीव०१ लातूर०१ परभणी०१ नंदुरबार०१ चंद्रपूर०१ गडचिरोली०१ वर्धा
यांचे डिपॉझिट जप्त
- राजकुमार पटेल (मेळघाट)
- देवेंद्र भुयार (मोर्शी)
- गीता जैन (मीरा भायंदर)
- नवाब मलिक (मानखुर्द)
- लक्ष्मण पवार (गेवराई)
- बाळासाहेब आजबे (आष्टी)