दीपक भातुसेमुंबई - विधानसभा निवडणुकीत शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना ५१ मतदारसंघांत आमनेसामने होते. यातील ५६ मतदारसंघांत शिंदे सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून शिवसेना कुणाची या लढाईत एकनाथ शिंदेंनी बाजी मारली आहे. ५१ पैकी केवळ १४ मतदारसंघांत उद्धवसेनेला यश मिळाले आहे, तर शिंदेसेनेचे ३६ मतदारसंघांत उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका मतदारसंघात दोन सेनेच्या लढतीत शेकापने बाजी मारली आहे. या निकालामुळे एकनाथ शिंदेंचे मनोबल वाढले आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा एकनाथ शिंदे करत होते. विधानसभेच्या निकालानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खरे वारसदार आपणच असल्यावर शिक्कामोर्बत झाल्याची प्रतिक्रिया या निकालावर बोलताना एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
सहा विद्यमान आमदारांचा लढाईत झाला पराभव शिंदे विरुद्ध ठाकरे लढाईत उद्धवसेनेच्या सहा विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे. या पराभूत आमदारांमध्ये रमेश कोरगावकर (भांडुप पश्चिम), ऋतुजा लटकरे (अंधेरी पूर्व), प्रकाश फातर्पेकर, राजन साळवी (राजापूर), वैभव नाईक (कुडाळ), शंकरराव गडाख (नेवासा). शिंदेसेनेच्या चार विद्यमान आमदारांना पराभवाचा फटका बसला आहे. यात मनीषा वायकर (आमदार आणि विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी, जोगेश्वरी पूर्व), सदा सरवणकर (माहिम), यामिनी जाधव (भायखळा), ज्ञानराज चौगुले (उमरगा) यांचा समावेश आहे.
शिंदेसेना विजयी उमेदवार
चोपडा - चंद्रकांत सोनावणे, पाचोरा - किशोर पाटील, मागाठाणे - प्रकाश सुर्वे, भांडुप (पश्चिम) - अशोक पाटील, अंधेरी (पूर्व) - मुरजी पटेल, चेंबुर - तुकाराम काते, कुर्ला- मंगेश कुडाळकर, कर्जत-महेंद्र थोरवे, महाड-भरतशेठ गोगावले, रत्नागिरी-उदय सामंत, राजापूर- किरण सामंत, दापोली-योगेश कदम, कुडाळ- नीलेश राणे, सावंतवाडी-दीपक केसरकर, पालघर- राजेंद्र गावित, बोईसर- विलास तरे, भिवंडी ग्रामीण- शांताराम मोरे, कल्याण (पश्चिम) -विश्वनाथ भोईर, अंबरनाथ-डॉ. बालाजी किणीकर, कल्याण ग्रामीण-राजेश मोरे, ओवळा-माजीवडा-प्रताप सरनाईक, कोपरी-पाचपखाडी-एकनाथ शिंदे, राधानगरी-प्रकाश आबिटकर, पाटण-शंभूराजे देसाई, नेवासा- विठ्ठल लंघे, नांदगाव-सुहास कांदे, मालेगाव बाह्य- दादाजी भुसे, कन्नड- रजनीताई जाधव, औरंंगाबाद (मध्य) - प्रदीप जयस्वाल, औरंगाबाद (पश्चिम) - संजय शिरसाट, वैजापूर-रमेश बोरणे, सिल्लोड-अब्दुल सत्तार, पैठण- विलास भुमरे, बुलडाणा- संजय गायकवाड, कळमनुरी- संतोष बांगर, रामटेक- आशिष जयस्वाल
उद्धवसेना विजयी उमेदवार
विक्रोळी - सुनील राऊत, जोगेश्वरी (पूर्व) - अनंत नर, दिंडोशी- सुनील प्रभू, माहिम- महेश सावंत, वरळी-आदित्य ठाकरे, भायखळा-मनोज जामसुतकर, गुहागर-भास्कर जाधव, बार्शी-दिलीप सोपल, उमरगा-प्रवीण स्वामी, उस्मानाबाद -कैलास पाटील, परभणी- डॉ. राहुल पाटील, मेहकर-सिद्धार्थ खरात, दर्यापूर-गजानन लवाटे, बाळापूर-नितीन देशमुख.