६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 08:37 AM2024-11-27T08:37:45+5:302024-11-27T08:38:41+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. सभागृहात निवडून आलेल्या आमदारांवर एडीआरचा रिपोर्ट आला आहे.
मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या २८८ पैकी २७७ (९७ %) आमदार करोडपती आहेत. निवडून आलेल्या आमदारांची सरासरी संपत्ती ४३.४२ कोटी रुपये असल्याचे द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालातून समोर आले आहे. निवडून आलेल्या १८७ (६५ %) आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल असून, ११८ आमदारांवर गंभीर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. हे प्रमाण ४१ टक्के आहे. २०१९ मध्ये २८५ पैकी १७६ आमदारांनी आपल्यावरील फौजदारी गुन्हे जाहीर केले होते तर २०१९ मध्ये २८५ पैकी ११३ आमदारांनी (४०%) आपल्यावरील गंभीर फौजदारी गुन्हे जाहीर केले होते.
पक्षनिहाय करोडपती
अजित पवार गट - ४१ आमदार (१०० टक्के)
समाजवादी पक्ष - २ आमदार (१०० टक्के)
जनसुराज्य शक्ती - २ आमदार (१०० टक्के)
शिंदेसेना - ५६ आमदार (९८ टक्के)
भाजपा - १२९ आमदार (९८ टक्के)
उद्धवसेना - १९ आमदार (९५ टक्के)
काँग्रेस - १५ आमदार (९४ टक्के)
शरद पवार गट - ७ आमदार (८८ टक्के)
सर्वाधिक संपत्ती असलेले श्रीमंत आमदार
३३८३ कोटी - पराग शाह, भाजपा
४७५ कोटी - प्रशांत ठाकूर, भाजपा
४४७ कोटी - मंगलप्रभात लोढा, भाजपा
सर्वात कमी संपत्ती असलेले आमदार
९ लाख - साजिद खान, काँग्रेस
३१ लाख - श्याम खोडे, भाजपा
६५ लाख - गोपीचंद पडळकर, भाजपा
कसे वाढले करोडपती?
२००९ - १८६ आमदार
२०१४ - २५३ आमदार
२०१९ - २६४ आमदार
२०२४ - २७७ आमदार
यंदाच्या विधानसभेत १६३ आमदारांकडे १० कोटीहून अधिक संपत्ती आहे. ५ ते १० कोटी संपत्ती असणाऱ्यांमध्ये ६३ आमदारांचा समावेश आहे. १ ते ५ कोटी संपत्ती असलेल्या आमदारांची संख्या ५१ इतकी आहे. २० लाख ते १ कोटी संपत्ती असणाऱ्यांची संख्या ८ आहे. तर २० लाखांहून कमी संपत्ती असलेले एकमेव आमदार आहेत.
गंभीर गुन्हे
११ आमदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत
१० आमदारांवर महिलांवरील अत्याचारसंबंधित गुन्हे घोषित केलेत.
शिक्षित आमदार किती?
साक्षर - २
५ वी पास - ६
८ वी पास - २०
१० वी पास - ३१
१२ वी पास - ४८
पदवीधर - ६५
पदवीधर व्यावसायिक - ५४
पदव्युत्तर - ३९
डॉक्टरेट - ७
डिप्लोमा - १४
सर्वात तरुण आमदार कोण?
रोहित पाटील - २५ (शरद पवार गट)
करण देवतळे - २९ (भाजपा)
राघवेंद्र पाटील - ३१ (भाजपा)
वरूण सरदेसाई - ३२ (उद्धवसेना)
श्रीजया चव्हाण - ३२ (भाजपा)
सर्वात वयस्क आमदार कोण?
छगन भुजबळ - ७७ (अजित पवार गट)
दिलीप सोपल - ७५ (उद्धवसेना)
गणेश नाईक - ७४ (भाजपा)
रवीशेठ पाटील -७३ (भाजपा)
प्रकाश भारसाकळे - ७२ (भाजपा)
महिला-पुरुष आमदार किती?
यंदाच्या विधानसभा सभागृहात २६४ इतके पुरुष आमदार आहेत तर २२ महिला आमदारांचा समावेश आहे.