शहरं
Join us  
Trending Stories
1
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
2
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
3
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
5
“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
6
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
7
"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा
8
"राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी..."; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा
9
'माझे सरकार पाडले नसते, तर शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी दिली असती'- उद्धव ठाकरे
10
"पाच प्रश्नही सांगता येत नाही असा चेहरा कुणाला हवाय?"; सरवणकरांच्या लेकीचा अमित ठाकरेंवर हल्लाबोल
11
IPL मेगा लिलावाआधी Arjun Tendulkar चा 'पंजा'; यावेळी तरी लागेल का विक्रमी बोली?
12
“सत्तेसाठी भाजपा दाऊदला निवडणुकीत उभे करेल, त्याला सत्ता जिहाद म्हणायचे का?”: नाना पटोले
13
'सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य...', सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर यूपी सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
"दीपक केसरकर अदानींसाठी जागा शोधत होते"; सावंतवाडीत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
15
“फडणवीसांनी मोठे काम काय केले? पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का?' उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले
17
ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप
18
जिंकलंस मित्रा! घरची परिस्थिती अत्यंत बेताची; भाजी विकून घेतलं शिक्षण, जिद्दीने झाला IAS
19
उद्धव ठाकरे वैभव नाईकांच्या घरातून बाहेर पडणार, इतक्यात गर्दीतून विचारले,"दौऱ्याची सुरुवात कशी झाली"
20
स्टेडियम परिसरात 'लॉकडाउन' सीन; त्यातही किंग कोहलीचा प्रॅक्टिस सेशनमधील फोटो लीक

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "नियम फक्त विरोधी पक्षांनाच, सत्ताधाऱ्यांना मोकळं ..." बॅग तपासणीवरुन अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 6:04 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज वणी येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :  विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वणी येथे जाहीर सभा होती. यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तर दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे यांच्या बॅगचीही तपासणी करण्यात आल्याचे समोर आले. यावरुन आता अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करुन 'नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही, अशी टीका केली. 

नेते म्हणजे 'गुप्त मित्र' अन् कार्यकर्ते 'उघड शत्रू';एकमेकांशी भिडणाऱ्यांना मिळतोय सल्ला

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत निवडणूक अधिकारी बॅग तपासत असल्याचे दिसत आहे. कोल्हे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'आज पुन्हा एकदा बॅग तपासली गेली, विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांचीही तपासणी झाली. नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे !, असं या पोस्टमध्ये लिहिले आहे. 

बॅगांची तपासणी; ठाकरे संतापले

हेलिपॉडवर उतरताच ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक अधिकाऱ्यांना तपासल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यानंतर सभेत उद्धव ठाकरे संतापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. 

सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी हेलिकॉप्टरने आलो तेव्हा आठ, दहा जण माझ्या स्वागतासाठी आले होते. म्हटलं काय करायचं आहे. ते म्हणाले, बॅग तपासायची आहे, मी म्हणालो तपासा. त्यांचा व्हिडीओ काढला आहे. एक लक्षात घ्या तुम्हाला कुठेही चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवले तर त्यांचीही चौकशी करा. ते कुठे नोकरीला आहेत हे तपासा. जसे ते आपले खिसे तपासतात तसे त्यांचेही तुम्ही खिसे तपासा कारण हा आपला अधिकार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे