मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. वरळीतून मिलिंद देवरा, कुडाळमधून नीलेश राणे तर रिसोडमधून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत २० उमेदवारांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मिलिंद देवरा उमेदवारी जाहीर केली आहे, तर कोल्हापूर उत्तरमधून राजश श्रिरसागर यांना उमेदवारी दिली आहे. तर दोन दिवसापूर्वी निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना कुडाळ विधानसभेसाठी तिकिट देण्यात आले आहे.
या उमेदवारांना मिळाली संधी
१.अक्कलकुआ- आमश्या फलजी पाडवी
२.बाळापुर- बळीराम भगवान शिरसकर
३.रिसोड- श्रीमती भावना पुंडलीकराव गवळी
४.हदगाव- संभाराव उर्फ बाबुराव कदम कोहळीकर
५.नांदेड दक्षिण- आनंद शंकर तिडके पाटील (बाँडारकर)
६.परभणी- आनंद शेशराव भरोसे
७.पालघर- राजेंद्र वेडया गावित
८.बोईसर (अज)- विलास सुकुर तरे
९.भिवंडी प्रामिण (अज)- शांताराम तुकाराम मोरे
१०.भिवंडी पूर्व- संतोष मंजव्या शेंडी
११.कल्याण पश्चिम- विश्वनाथ आत्माराम भोईर
१२.अंबरनाथ (अजा)- डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर
१३.विक्रोळी- श्रीमती सुवर्णा सहदेव करंजे
१४.दिडोशी- संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम
१५.अंधेरी पूर्व- मुरजी कानजी पटेल
१६.चेंबूर - तुकाराम रामकृष्ण काते
१७.वरळी-मिलींद मुरली देवरा
१८.पुरंदर- विजय सोपानराव शिवतारे
१९.कुडाळ- निलेश नारायण राणे
२०.कोल्हापुर उत्तर-राजेश विनायक क्षिरसागर