Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी सरकार येण्याचा दावा केला जात आहे.माजी मंत्री आमदार नवाब मलिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढत आहेत. मलिक यांनी सरकारबाबत मोठे विधान केले आहे. 'निकालानंतर काहीही होऊ शकते', असं विधान त्यांनी केले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
नवाब मलिक यांनी काही दिवसापूर्वी खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता. दरम्यान, माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांनी टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी निकालानंतर काहीही होऊ शकते, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
Maharashtra Election 2024: विधानसभेचा पहिला ओपिनियन पोल, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
"भाजपाचे लोक माझ्याविरोधात लढत आहे, जनतेने मला उमेदवारी घ्या म्हणून सांगितले आहे. या मतदारसंघात एक वेगळाच निकाल समोर येणार आहे. जनतेचा आम्हाला भरगोस पाठिंबा मिळणार आहे. आम्ही महायुतीमध्ये असलो तरीही आम्ही विचारधारा कधीही सोडली नाही. टफ फाईट असताना किंग मेकर आम्ही ठरणार आहे, अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहेत, असा दावा माजी मंत्री नवाब मलिक यांनी केला.
नवाब मलिक म्हणाले, बारामतीमधून अजित पवार निवडून येतील. पवार कुटुंबाने एकत्र यावे अशी सर्वांची इच्छा आहे, असंही मलिक म्हणाले. भाजपाच्या 'बटोगे तो कटोगे' या स्लोगनवर बोलताना मलिक म्हणाले, ही वाह्यात स्लोगन आहे. या स्लोगनमुळे यांचा फायदा होणार नाही, उलट याचा तोटा होणार आहे. उत्तर प्रदेशमधील निकाल या राजकारणामुळे असे निकाल आले आहेत. आता 'एक है तो सेफ है', मला वाटतंय भाजपाचा दृष्टीकोण बदलत आहे. आम्ही हिंदू, मुस्लिम, शिख सर्वांनी एक राहिले पाहिजे. जाती, धर्मा, भाषा असताना सर्व लोक एक राहिले पाहिजे अशी आमची विचारधारा आहे. जर भाजापाची विचारधारा बदलत असेलतर चांगली गोष्ट आहे, असंही नवाब मलिक म्हणाले.
'निकालानंतर काहीही होऊ शकते'
"माझ्या शर्तीवर पाठिंबा राहिलं. काही वेगळ्या गोष्टी होत असेल तर आमचा पाठिंबा राहणार नाही. आम्ही सरकारमध्ये किंगमेकर राहणार आहे. २३ तारीख येऊद्या कोण कोणासोबत राहते हे त्यावेळी कळेल, असं मोठं विधान नवाब मलिक यांनी केले. सगळ्यांनीच आता पॉलिटीकल अॅडजस्टमेंट केली आहे, २०१९ च्या निवडणुकीत जसं झाले तसे याही निवडणुकीत निकालानंतर काहीही होऊ शकते, असा दावा नवाब मलिक यांनी केला.