Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. काल निवडणूक अधिकाऱ्यांनी वणी येथील सभेपूर्वी ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी केली. आज दुसऱ्या दिवशीही ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी औसा येथे केली, यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आज जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची देखील बॅग तपासण्याचे आव्हान दिलं.
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औसा येथे जाहीर सभा घेतली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या सभेपूर्वी सलग दुसऱ्या दुवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅग तपासली. कालही ठाकरे यांची बॅग तपासली होती, राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोप झाले. आज औसा येथील ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 'मला शिंदे फडणवीस यांच्या सांगण्यावरुन चेकिंगवर टाकल असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. "माझी बॅग तुझ्याकडेच देतो, ती घेऊन येत जा. फक्त त्यातील कपडे चोरु नकोस, असा निशाणाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले, बॅग तपासायला हरकत नाही, माझं मन आणि बॅग दोन्हीही स्वच्छ आहे. माझी बॅग तपासल्याबद्दल माझा आक्षेप नाही, मी आजही त्यांना विचारलं तुम्ही आतापर्यंत किती जणांच्या बॅगा तपासल्या, त्यावेळी ते म्हणाले तुमचीच पहिली बॅग तपसाली आहे. उद्धव ठाकरेंची बॅग त्यांनी ऑटोचेकींगवर ठेवली आहे. मी तर म्हणतो माझी बॅग तुझ्याकडेच देतो, रोज घेऊन ये. फक्त एक काम करायचे माझा पक्ष चोरला तसा माझी कपडे चोरायची नाहीत. कारण चोर तो चोरच असतो. एकदा का चोरीची सवय लागली की चोरी मारी करुन जगायची सवय लागते, असा टोलाही ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावर ठाकरेंनी टीका केली
"माझी बॅग तपासल्यानंतर औसावरुन इकडे यायला तयार झालो. हेलिकॉप्टरमध्ये बसलो, पण हेलिकॉप्टर उडायला तयार नाही. मी कारण विचारले तर त्यांनी सांगितले की मोदीजी सोलापूरला येत आहेत ते पोहोचल्याशिवाय आपल्याला उड्डान करता येणार नाही. म्हणजे ही कुठली बेबंदशाही आहे, हीच लोकशाहीची थट्टा सुरु आहे. मोदींनी पंतप्रधानावरुन खाली उतरायला पाहिजे. मी जसा माझ्या पक्षाचा स्टार प्रचारक आहे, तसे तेही त्यांच्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे मला जो कायदा आहे तो त्यांनाही लागू असायला पाहिजे, सगळ्या यंत्रणा त्यांनी गुलाम केल्या आहेत, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.