Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'बेरोजगारांना ४ हजार रुपये देणार'; महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 01:27 PM2024-11-10T13:27:27+5:302024-11-10T13:28:37+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : महाविकास आघाडीनेही रविवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. विकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात १०० दिवसांचा अजेंडा जाहीर केला. पदवीधर आणि पदविका असलेल्या बेरोजगार तरुणांना दरमहा ४,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. जाहीरनाम्यात महाराष्ट्रात नवे औद्योगिक धोरण बनवण्याबाबत प्रसिद्ध करण्यात आले आहे.
लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय?
आज महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आमदार नाना पटोले, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आमच्या पाच हमी महाराष्ट्रातील सर्वांच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरतील. प्रत्येक कुटुंबाला अंदाजे ३ लाख रुपयांची वार्षिक मदत मिळणार आहे. आमची महालक्ष्मी योजना सर्व महिलांना आर्थिक मदत करेल. याअंतर्गत महिलांना दरमहा ३ हजार रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्रातील महिलांसाठी मोफत बससेवा सुरू करणार.
शेतकऱ्यांना ५०,००० रुपये प्रोत्साहनपर रक्कम
खरगे म्हणाले की, 'जे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करतात त्यांना ५०,००० रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल. महिलांना वर्षभरात सहा सिलिंडर दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गॅस सिलेंडरची किंमत ५०० रुपये असेल. राज्यात जात जनगणनाही होणार आहे. 'महाराष्ट्राचे भविष्य बदलण्याची ही निवडणूक आहे. महाविकास आघाडीने १०० दिवसांचा अजेंडाही जाहीर केला, असंही खरगे म्हणाले.
महाविकास आघाडीच्या पाच गॅरेंटी
१- महालक्ष्मी
महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन.
बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवासाची सुविधा.
२- समानतेची गॅरेंटी
जातिनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन.
५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार.
३- कौटुंबिक संरक्षण
२५ लाखांपर्यंत आरोग्य विम्याचे आश्वासन.
मोफत औषधांची सुविधा.
४- कृषी समृद्धी
शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन.
नियमित कर्ज परतफेडीवर ५०,००० रुपयांचे प्रोत्साहन.
५- तरुणांना वचन
बेरोजगारांना दरमहा ४,००० रुपयांची आर्थिक मदत