शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, ४ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
2
Video: धक्कादायक! जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
3
चीन सोबत डील, पॉलिसीमध्ये बदल; ट्रम्प यांनी हार मानली का? अचानक का बदलले त्यांचे सूर
4
करण जोहर दिवसेंदिवस होत चाललाय बारीक, अवस्था पाहून चाहते चिंतेत, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाला…
5
मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून...; मंत्र्यांचा दावा खोडत धनंजय मुंडेंनी प्रकृतीबाबत केला खुलासा
6
जगभर: मोकळा आणि प्रदूषणमुक्त श्वास, पॅरिसमधले ५०० रस्ते फक्त चालण्यासाठी!
7
अमेरिकेत भारतीय विद्यार्थी सरकारच्या टार्गेटवर, व्हिसा रद्द झालेल्या जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये ५० टक्के भारतीय
8
World Press Photo of the Year: आई, आता मी तुला मिठी कशी मारू?
9
हृदयद्रावक! ऑटोतून आईसोबत खाली उतरला अन ट्रकने चिमुकल्याला चिरडले; घटनेनंतर तणावाचे वातावरण
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२५: आजचा दिवस आनंदात जाईल, प्रत्येक कामात यश मिळेल
11
भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!
12
अग्रलेख: वक्फ कायद्याला झटका, ...तर नव्या कायद्याचा उद्देशच नष्ट होईल
13
राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?
14
टॅरिफ युद्धात सोन्याचा निर्विवाद विजय! मौल्यवान धातूचा भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर, सोन्याची आयात तब्बल १९२ टक्क्यांनी वाढली
15
ठाणे: 'पार्टीत चूक झाल्यास अप्पा मुलांना द्यायचा विजेचा शॉक'; खडवली बालआश्रमातून सुटका केलेल्या मुलांनी सांगितली आपबीती
16
सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
17
‘भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश
18
टॅरिफने अर्थव्यवस्था कमकुवत, महागाई वाढेल, पण मंदी नाही : जॉर्जीव्हा
19
विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारयुद्धाचे भारताला किती चटके?
20
नाशिक दर्ग्याचे पाडकाम प्रकरण : महापालिकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 09:31 IST

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपच्या विजयात राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचाही मोठा वाटा आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : मुंबई : महाराष्ट्र विधानसभेला महायुतीने मविआचा सुपडा साफ करत प्रचंड बहुमताने सत्ता राखली आहे. विधानसभेच्या २८८ पैकी २३५ जागा जिंकत महायुतीने प्रचंड बहुमताने विजय मिळविला. भाजपने १३२, शिंदेसेनेने ५७, तर अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या. तसेच, महायुतीच्या जागांमध्ये जनसुराज्य पक्षाचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष १, राजर्षी शाहू आघाडी १ व रासपच्या एका जागेचा समावेश आहे. 

दरम्यान, भाजपच्या विजयात राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचाही मोठा वाटा आहे. मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातही पक्षाचा विजय निश्चित करण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या जोडीने महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या वर्षी यादव-वैष्णव जोडीला मध्य प्रदेशात भाजपच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी मध्य प्रदेशातील २३० पैकी १६३ जागा जिंकून पक्षाने आपली सत्ता कायम ठेवली.

महाराष्ट्रातील भाजपच्या निवडणूक प्रचाराची कमानही भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपवण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पक्षाच्या खराब कामगिरीनंतर, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी राज्यात तळ ठोकला होता. अखेर त्यांच्या कामगिरीला यश मिळाले आहे. निवडणुकीच्या मतमोजणीचे निकाल समोर आल्यानंतर भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  भूपेंद्र यादव यांचे अभिनंदन केले.

सर्व मंत्री जिंकलेमहायुती सरकारमधील निवडणूक लढलेले सर्व मंत्री जिंकले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मोठ्या फरकाने विजयी झाले. सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांचा त्यात समावेश आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे, पटोलेंना महायुतीचा शह!२०१९ मधील मविआ सरकारचे शिल्पकार शरद पवार, त्यावेळी मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना महायुतीने तडाखा दिला. आम्हीच सत्तेत येणार असे हे नेते दावा करत होते आणि मविआमधून मुख्यमंत्री कोण होणार याबाबत दावे-प्रतिदावे करत होते. निकालाने मविआच्या स्वप्नांवर पाणी फेरले. मतमोजणीच्या पहिल्या तासापासून घेतलेली आघाडी महायुतीने वाढवत नेली आणि मविआ शेवटपर्यंत माघारलेलीच राहिली.

नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या सरकारचा शपथविधी सोहळा हा वानखेडेवर आयोजित हाेण्याची शक्यता आहे.महायुतीचे नेत्यांकडून सोमवारी वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरु झाली आहे. अद्याप मुख्यमंत्रीपदी कोण हे ठरले नसले तरी शपथविधी घेण्याची तयारी सुरु झाली आहे. २०१४ मध्ये सत्ता खेचून आणल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडिअमवर शपथ सोहळा आयोजित केला होता.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMahayutiमहायुतीAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस