Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'काँग्रेसची आतापर्यंतची ही सर्वात वाईट कामगिरी', विधानसभेच्या पराभवावर पृथ्वीराज चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 01:08 PM2024-11-24T13:08:35+5:302024-11-24T13:29:31+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. काँग्रेसच्याही मोठ्या प्रमाणात जागा कमी झाल्या आहेत. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या निकालावर आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी आपल्या पक्षाचा पराभव धक्कादायक असल्याचे सांगितले आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील हा आतापर्यंतचा सर्वात वाईट पराभव असल्याचे म्हटले आहे.
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेने ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित केले, तर ध्रुवीकरणामुळे राज्याच्या शहरी भागात विरोधी महाविकास आघाडीच्या संभाव्यतेला धक्का बसला. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला. यावर बोलताना चव्हाण म्हणाले की, लाट होती की छेडछाड हे सांगणे कठीण आहे.
यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर निशाणा साधला होता, तर काँग्रेसवर निशाणा साधताना चव्हाण यांनी महाराष्ट्रातील पराभवाची कारणे सांगितली असून, आमची लीडरशीप खराब होती. हेही आमच्या पराभवाचे कारण असू शकते.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक महाविकास आघाडीचे दिग्गज निवडणुकीत पराभूत झाले. एमव्हीएचा एक भाग म्हणून १०१ जागा लढवणाऱ्या काँग्रेसला फक्त १६ जागा जिंकता आल्या, त्यांचा आतापर्यंतचा सर्वात वाईट पराभव झाला.
सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदारसंघात ५ ते ६ हजार मतांनी विजयी होण्याची अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली होती. पण जिल्ह्यातील सर्व महाविकास आघाडीचे उमेदवारांचा सुमारे ४०,००० मतांच्या फरकाने पराभव झाला.