Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. राज्यातील २८८ विधानसभा जागांपैकी महायुतीने २३३ जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त ४७ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने १४९ जागांवर निवडणूक लढवली, त्यापैकी १३२ जागांवर विजयाचा झेंडा फडकवला. दणदणीत विजयानंतर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण या चर्चा सुरु आहेत. या चर्चे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांना त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा आहे. मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या गदारोळात देवेंद्र फडणवीस यांची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. शनिवारी निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर फडणवीस यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "बाज की असली उड़ान बाकी है...।"
या व्हिडिओची सुरुवात 2019 च्या भाषणाने होते यात ते म्हणाले होते, मेरा पानी उतरते देख किनारे पर घर मत बना लेना, मै समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा।" फडणवीस यांचे हे भाषण व्हायरल होत आहे.
निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, असा विश्वास त्यांच्या कुटुंबीयांना आहे. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांच्या आई यांनाही आपला मुलगा राज्याचा पुढील मुख्यमंत्री होईल, असा विश्वास आहे. त्यांची आई सरिता फडणवीस म्हणाल्या, "नक्कीच ते मुख्यमंत्री होतील. हा मोठा दिवस आहे कारण माझा मुलगा राज्यात मोठा नेता झाला आहे. तो २४ तास मेहनत करत होता, असंही त्या म्हणाल्या.