मुंबई: शिवसेना आणि भाजपानं सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्याचं दिसत आहे. मात्र यातूनही दोन्ही पक्षांनी दबावाचं राजकारण सुरू ठेवलं आहे. शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. शिवसेना, भाजपाचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर महायुतीतले दोन्ही मोठे पक्ष राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीगाठी घेत एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे सत्तेचं समान वाटप व्हावं, यावर शिवसेना ठाम आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना, भाजपामध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचले. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुंबईचा महापौर असल्यापासून आपण दिवाळीच्या दुसऱ्या देण्यासाठी राज्यपालांची भेट घेत असल्याचं रावते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, भाजपाकडून दबावाचं राजकारण; राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीगाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 10:46 AM