शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Exclusive: आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री व्हावे ही मुख्यमंत्र्यांचीच इच्छा; कारण...

By यदू जोशी | Updated: October 31, 2019 07:52 IST

आदित्य उपमुख्यमंत्री व्हावेत यासाठी मुख्यमंत्री आग्रही

- यदु जोशी

मुंबई: सत्तेत समान वाटा द्या अशी मागणी करत अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मागणाऱ्या शिवसेनेचा सूर अखेर नरमला आहे. भाजपाकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदांची ऑफर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद दिलं जावं अशी आग्रही भूमिका देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्याची माहिती सूत्रांनी 'लोकमत'ला दिली आहे.उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास त्यावर लगेच आदित्य ठाकरेंची वर्णी लावू नये, असा मोठा मतप्रवाह शिवसेनेत आहे. त्याऐवजी सुभाष देसाई, एकनाथ शिंदेंना संधी देऊन ज्येष्ठत्वाचा मान राखला जावा, असं शिवसेनेतल्या अनेकांना वाटतं. याउलट मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत पाटील युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद दिलं जावं यासाठी आग्रही आहेत. आदित्य उपमुख्यमंत्री झाल्यास दोन्ही पक्षांचा सत्तेतील समन्वय अधिक चांगला होईल, असं त्यांना वाटतं.Exclusive: भाजपकडून सेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदांंची ऑफर; 2 दिवसाचा अल्टिमेटम अन्यथा...आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद द्यायचंच असेल, तर त्याआधी ते सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदेंना दिलं जावं, असं शिवसेनेतल्या एका गटाला वाटतं. देसाईंना सुरुवातीला उपमुख्यमंत्रीपद दिलं तर अडीच वर्षांनंतर ते सोडताना फारशी खळखळ होणार नाही, असं पक्षातील काहींना वाटतं. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं आणि नंतर त्यांच्याऐवजी आदित्य यांना आणल्यास राजी-नाराजीचे सूर उमटू शकतात हे लक्षात घेता देसाई यांना संधी देण्याची मागणी करण्यात येत आहे.अस्थिरता संपवा! स्थिर सरकारने लवकर सत्तारूढ होणे, हे राज्याच्या हिताचेएकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांच्यासोबतच तानाजी सावंत यांचंही नाव उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. तानाजी सावंत यांना शेवटच्या टप्प्यात ज्या पद्धतीनं मंत्रिपद मिळालं आणि नंतर ते मातोश्रीच्या ज्या प्रकारे निकट गेले, त्यावरून त्यांचं नावही चर्चेत आहे. आदित्य यांना लगेच उपमुख्यमंत्री करण्याऐवजी त्यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाऊ शकते, अशी शक्यतादेखील पक्षातील काहींनी वर्तवली आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेSubhash Desaiसुभाष देसाईchandrakant patilचंद्रकांत पाटील