मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास आठवडा होत आला तरी महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. शिवसेना सत्तेच्या समान वाटपावर ठाम आहे. पण अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास भाजपानं स्पष्ट नकार दिला आहे. याच परिस्थितीवर एनसीपीचे प्रवक्ते क्लायड क्रास्टोंनी चित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. क्लायड क्रास्टोंनी एक चित्र ट्विट करत शिवसेना, भाजपातील सुंदोपसुंदीवर भाष्य केलं आहे. क्रास्टोंनी शिवसेना आणि भाजपाची निवडणूक चिन्हं वापरुन एक चित्र ट्विट केलं आहे. यामध्ये खाली भाजपाचं कमळ दाखवण्यात आलं आहे. तर वर काही अंतरावर शिवसेनेचा धनुष्यबाण रेखाटण्यात आला आहे. कमळाच्या वर असलेला धनुष्यबाण कमळाच्या दिशेनं रोखलेला आहे. 'एक म्हण आहे, डोक्यावर टांगती...' असं शीर्षक क्रास्टोंनी चित्राला दिलं आहे.
महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रवादीचा भाजपावर 'बाण'; महायुतीमधील सुंदोपसुंदीवर चित्रातून निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 10:54 AM