शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून अद्याप मोदी, शहांकडून महाराष्ट्रात हस्तक्षेप नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 8:03 AM

Maharashtra Election Result 2019 हरयाणातला तिढा सोडवणाऱ्या अमित शहांचं महाराष्ट्राकडे दुर्लक्ष

मुंबई: हरयाणातील सत्तास्थापनेचा तिढा अवघ्या दोन दिवसांत सोडवणाऱ्या दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना महाराष्ट्रातील तिढ्याकडे मात्र दुर्लक्ष केलं आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 9 दिवस उलटले तरी राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस हे सत्तास्थापनेबाबत एकटे पडल्याची टीका करीत शिवसेनेनं आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मध्यस्थी करावी, असं एकप्रकारे सूचित केलं आहे. भाजपाच्या नेतृत्त्वानं महाराष्ट्रातील तिढ्याकडे दुर्लक्ष केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यात शिवसेना, भाजपानं एकत्र निवडणूक लढवली. मतदारांनी त्यांना स्पष्टपणे कौलही दिला. मात्र तरीही राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. याउलट हरयाणात भाजपा आणि जननायक जनता पार्टीनं स्वतंत्र निवडणूक लढवली. मात्र तरीही तिथे निकालानंतर अवघ्या दोनच दिवसात दोन्ही पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात अशाच पद्धतीने बहुमतासाठी शिवसेनेची गरज असल्याने अमित शहा मुंबईत येऊन चर्चा करतील, अशी अपेक्षा होती पण, ते अद्याप आलेले नाहीत वा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी फोनवरूनही चर्चा केलेली नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हाच धागा पकडून मुख्यमंत्र्यांना डिवचले आहे. मुख्यमंत्री एकटे पडल्याचे दिसतात या राऊत यांच्या वाक्याचा अर्थ शिवसेनेला आता मध्यस्थीसाठी अमित शहाच हवेत आणि त्या शिवाय चर्चा केली जाणार नाही असा घेतला जात आहे.राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम; शिवसेनेला हवी आहे अमित शहांची मध्यस्थीपंतप्रधान मोदी आणि अमित शहा महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत आहेत, मुख्यमंत्री फडणवीस एकाकी पडले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र शिवसेनेकडून सतत होत असलेल्या टीकेमुळे मोदी, शहा याबाबतीत लक्ष घालत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेकडून होणारी टीका जोवर बंद होत नाही, तोपर्यंत याबद्दल एक शब्दही बोलायचा नाही, अशी भूमिका भाजपा श्रेष्ठींनी घेतल्याचं समजतं.मुख्यमंत्रिपद आम्हालाच मिळायला हवे, राऊतांचा आग्रह कायमपंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा नेहमीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय हालचालींचा बारीसारीक तपशील ते रोज घेत आहेत. पण शिवसेनेनं आपल्यावर फक्त टीकाच करायची आणि आपण त्यांचे सर्व लाड पुरवायचे हे यापुढे होणार नाही, असा इशारा भाजपा श्रेष्ठींनी त्यांच्या कृतीतून दिला आहे.शिवसेना-भाजपामध्ये नेमकं काय आणि कधी बिनसलं?दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना, अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद ठरलेलं नव्हतं, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेनं त्याच दिवशी सत्तावाटपाच्या चर्चेसाठी होणारी बैठक रद्द केली होती. तेव्हापासून दोन्ही पक्षांमध्ये बोलणीच होऊ शकलेली नाही. मुख्यमंत्री पदाबाबत काय शब्द दिला होता हे अमित शहांकडूनच आता ऐकू, असा शिवसेनेत सूर आहे. या पदाबाबत काय करायचं, महत्त्वाची मंत्रिपदं मिळण्याबाबत घ्यायचा निर्णय हे सगळं काही अमित शहांबरोबरच बोलू, असं सांगत शिवसेनेनं भाजपला वेटिंगवर ठेवलं आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी